आम्ही नगरकर....

Submitted by suddhir_sonawane on 4 July, 2009 - 10:10

मी मुळचा नगरमधील जामखेड तालुक्यातला...
म्हणुन पक्का नगरी...
ज्यावेळी पहिल्या॑दा पुण्यात आलो ना..
अगदी वेड लागायची पाळी आलेली...
कुणीही ओळखीच॑ नसलेल॑..
अशावेळी कुठल्याही तालुक्यातील..
कुठल्याही गावातील...
एखाद॑ माणुस॑ जरी भेटल॑ ना! तरी फक्त "नगरकर"एवढी ओऴखदेखील पुरेशी होते.
..आणि मनात कुठेतरी आपलेपण जाग॑ होत॑.
म्हणुन मनात एक विचार आला की,
मायबोलीच्या माध्यमातुन आपण सगळे जर एकत्र आलो तर...
ख्ररच नुसती कल्पनादेखील मनाला खुप आन॑द देऊन गेली.
मायबोलीवर असणार्‍या नगरकरा॑चा
असा एखादा ग्रुप असावा
जिथ॑ त्या॑ना हक्कान॑ भेटता येईल..

असा ग्रुप होऊ शकतो का ?

खर॑तर हे कुठे लिहु हेच कळत नव्हत....
मग वाटल॑ एकमेका॑ना नुसत्या बोलण्यावरुन ओळखणारे आपण
कुठेही लिहल॑ तरी एकमेका॑ना नक्की शोधुन काढु...
काय बरोबर॑ ना !!!!!!
तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतोय...

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार ..खरतरं मधल्या या काळात मायबोलिवर येण सोडलंच होतं,असु द्या ..काहिही झालं तरी गाववाल्यांची आठवण येणारचं कि रावं ...

म्या बी नगर ची हाय...फिरोदिया
ला ११,१२ ला होते..२००० पास आउट...

हो सध्या मुपो मोत्यांचे शहर! Happy

निझामाने अहमदनगर हुन हैदराबाद ला राजधानी हलविलेली ना! Wink

इतर नगरकरांची संख्या रोडावलेलिये फार!

हुरडा, अरे वा! Happy

मागच्यावर्षी आम्ही जेजुरीला गेलेलो हुरड्यासाठी! Happy

पण आमच्या तालुक्यात नाही ज्वारी फारशी त्यामुळे हुरडा नसतो! Sad

आणि यंदा तर हैदराबाद त्यामुळे नुसते लांबुनच आस्वाद! Happy

हं ....हैद्राबादेत कुठला हुरडा?
इथे बर्‍याच ठिकाणी हुरडा पार्ट्या चालू आहेत सध्या.
पांजरापोळ, रानवारा, औ बाद रोड्वरही बर्‍याच ठिकाणी.

सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!

आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984

SamajikUpakram2016.jpg

श्रीमन्नृप शालिवाहन शके १९३८.
दुर्मुखनाम संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा!!
नूतन वर्षाभिनंदन!!

राम राम नगरकर्स!

सगळी कडे पाऊस पण आमच्या नगरात कायमच दुष्काळ!

matadan.pngलोकहो, यांनी तर मतदान केलेय!! तुम्हीही केले नसेल तर लवकर करा!
आपल्या आवडीच्या प्रवेशिकांना विजयी करा!! --
मायबोली गणेशोत्सव २०१७ - मतदान