पेन्सिल स्केच

Submitted by अश्विनी के on 1 July, 2017 - 00:56

कॉलेजनंतर बऱ्याच वर्षांनी 2B, 4B वापरून पेन्सिल स्केच काढलं आहे (अपवाद : आपल्या एका हितगुज दिवाळी अंकासाठी घाईघाईत काढलेले सेल्फ पोर्ट्रेट).

खालच्या पोर्ट्रेटमध्ये बऱ्याच त्रूटी आहेत. पण पेशन्स संपल्यावर आपण बाबा पुढे एक रेघही ओढत नाही! Proud

मूळ फोटोही शोधून टाकला आहे आता. फोटोतली डार्क शेड पेन्सिल मिडियमने इतपतच डार्क करता आली मला. तसेच नजरेचा ॲंगल वेगळा आला आहे. पण कायम एकाच ठिकाणी बघत अश्रूपात करणं तिला त्रासाचंच ना! Wink

तर ह्या अश्या चुका/त्रूटींसहित हे स्केच आहे Happy

tmp-cam-1318021745.jpgFB_IMG_1496756495412.jpg

Group content visibility: 
Use group defaults

व्वा ! मस्तच.

उर्मिला मातोंडकर आहे का ती ??

उर्मिला मातोंडकर आहे का ती ?? >>> नाही नाही. स्केच फ्लॉप म्हणायचं म्हणजे Lol

थांबा मूळ फोटो शोधून टाकते इथे.

खुप छान काढलय स्केच
आठवी नववी मधली एलीमेंट्री आणि इंटरमिडिजेट मध्ये घवघवीत यशानंतर चित्रकला माझ्या खुप जिव्हाळ्याचा विषय बनलेला पण पुढे कॉलेजमध्ये सायन्सच्या प्रयोगवह्या पुरतीच चित्रकला मर्यादित राहिली Lol ...
ह्यामुळेच तुम्ही जोपासलेली आणि कंटिन्यू ठेवलेली चित्रकलेची आवड़ विशेष उलेखनीय म्हणावी अशीच आहे.
श्रीराम.

छान!

हे पेन्सिल स्केच preserve कसं करायचं असतं? हाताळलं की हाताला पेन्सिलीचं काळं लागतंय. चित्रच खराब होईल अशाने.

डाव्या डोळ्याभोवतालचे गोलाकार वर्तुळ कोणीतरी पंच मारून सुजवल्यासारखे आलेय.
तेच उजव्या भुवयाखालील पापणीची शेडींग मस्तच जमली आहे.
हे आपले उगाचच नुसते मस्त प्रतिसाद काय लिहायचे म्हणून, बाकी असली कला आमच्या गेल्या चार पिढ्यात कोणाला येत नव्हती. त्या आधीचे माहीत नाही Happy

हे पेन्सिल स्केच preserve कसं करायचं असतं?
>>>>
लॅमिनेट करून होत असेल का?
बाकी माझ्या शाळेतल्या सुंदर(!) अक्षराच्या वह्या आजही आपले अक्षर राखून आहेत, त्यातली पाने रद्दीवालाही घेत नाही Happy

Pages