पेन्सिल स्केच

Submitted by अश्विनी के on 1 July, 2017 - 00:56

कॉलेजनंतर बऱ्याच वर्षांनी 2B, 4B वापरून पेन्सिल स्केच काढलं आहे (अपवाद : आपल्या एका हितगुज दिवाळी अंकासाठी घाईघाईत काढलेले सेल्फ पोर्ट्रेट).

खालच्या पोर्ट्रेटमध्ये बऱ्याच त्रूटी आहेत. पण पेशन्स संपल्यावर आपण बाबा पुढे एक रेघही ओढत नाही! Proud

मूळ फोटोही शोधून टाकला आहे आता. फोटोतली डार्क शेड पेन्सिल मिडियमने इतपतच डार्क करता आली मला. तसेच नजरेचा ॲंगल वेगळा आला आहे. पण कायम एकाच ठिकाणी बघत अश्रूपात करणं तिला त्रासाचंच ना! Wink

तर ह्या अश्या चुका/त्रूटींसहित हे स्केच आहे Happy

tmp-cam-1318021745.jpgFB_IMG_1496756495412.jpg

Group content visibility: 
Use group defaults

हे पेन्सिल स्केच preserve कसं करायचं असतं?>>>

मला वाटतं एक स्प्रे मिळतो तो पेन्सिल स्केचवर मारायचा त्यामुळे ते जागच्या जागी बसतं. नंतर फ्रेम करून टाकावे.

डाव्या डोळ्याभोवतालचे गोलाकार वर्तुळ कोणीतरी पंच मारून सुजवल्यासारखे आलेय. >>>> Biggrin
तेच उजव्या भुवयाखालील पापणीची शेडींग मस्तच जमली आहे.>>>> Thanks

चीकू, स्प्रे बद्दल विचारते दुकानात. धन्यवाद Happy

भुईकमळ, 8b पण असते हेच माहित नव्हतं मला. आता हे सगळंच कलासाहित्य मिळणाऱ्या दुकानात जाऊन विचारते. Thanks.

अतिशय सुंदर स्केच आहे.
नुसतं स्केच बघुन, मुळ फोटो न बघताच कळलं की मीनाकुमारी आहे ते.
१९-२० आहे पण उर्मिला नाही दिसत. काहीही. Lol

डाव्या डोळ्याभोवतालचे गोलाकार वर्तुळ कोणीतरी पंच मारून सुजवल्यासारखे आलेय. >>>>रडुन सुजले अस्तील.

मस्त स्केच अश्विनी.

स्प्रे मिळतो स्केच साठी. तो फवारलास कि होइल ते प्रिझर्व.

छान जमलंय.
मला वाटते स्केच मध्ये ओठ किंचित उघडे वाटतात.
त्यामुळे दु:खीभाव स्केचमध्ये कमी दिसतोय.

सुंदर

छान

Pages