या कामशिल्पांचं करायचं काय?

Submitted by वरदा on 19 June, 2017 - 10:25

खरं तर धागा काढण्याएवढं मटेरियल या विषयात नाही, फक्त वादंग तयार करायचं सामर्थ्य आहे. पण राहावलं नाही म्हणून काढते आहे. मी कुठल्याही एका राजकीय विचारसरणीचं अथवा पक्षाचं समर्थन करत नाही. पण टोकाचे विचार करणारे सगळ्याच पक्षांमध्ये असतात, त्यातून मोठे आणि छोटे कुणीच राजकारणी, नेते सुटत नाहीत एवढंच मला म्हणायचं आहे.

खजुराहो च्या प्रसिद्ध मंदिरांपाशी कामसूत्र विकलं जातं यावरून सध्या सगळीकडे तावातावाने चर्चा चालू आहे. आपली संस्कृती, इतिहास याची अर्धवट, भगव्या चष्मातून माहिती व छ्द्मज्ञान (pseudo-knowledge) असलेल्या काही माथेफिरूंनी या सर्वावर बंदी घालावी असं आग्रहाने सुचवलं आहे (त्यांना शक्य असेल तर शक्तीचा वापर करूनही अंमलात आणायचा प्रयत्न करतील, कुणी सांगावे?).... गेल्या तीनचार वर्षांमध्ये आपल्या संस्कृती आणि इतिहासाविषयी लोकपातळीवर छद्मज्ञान पद्धतशीरपणे पसरवलं जात आहे ते फार चिंताजनक आहे.

पण खजुराहो बिचारं कायमच वादाच्या भोवर्‍यात असतं. त्याविषयी नाराजी दर्शवणार्‍यांमधे सध्याचे उजव्या विचारसरणीचेच कशाला, खुद्द गांधीजींचाही समावेश होता. गांधीजी या मंदिरांच्या पूर्णतया विरोधी होते. त्यांच्या मते ही मंदिरं परत मातीच्या ढिगार्‍यात झाकून टाकणेच जास्त योग्य होते. अखेर रवींद्रनाथ टागोरांना यात मध्ये पडून ही मंदिरे आपली आपला राष्ट्रीय वारसा आहेत हे गांधीजींना ठामपणे सांगावं लागलं होतं...
तेव्हा टू सेट द रेकॉर्ड स्ट्रेट - आपल्याला सामाजिक मानसिकतेमध्ये कामशिल्पं ही आपल्या समृद्ध वारशाचा एक भाग आहेत हे कधीच मोकळेपणे मान्य करता आलेले नाही. जसा बहुसंख्येने समाज तसेच त्यांचे नेते.
मात्र खजुराहो हे एकमेव कामशिल्पे असलेले मंदिर नाही. आठव्या नवव्या शतकानंतर उभारल्या गेलेल्या बहुसंख्य मंदिरांमधे कमी-जास्त प्रमाणात कामशिल्पं कोरली जायची. अगदी वेरूळच्या कैलासातही कामशिल्पे आहेत.

तेव्हा आपला सामाजिक दांभिकपणा आणि त्याहूनही ढोंगी नीतीमत्तेची आवरणे बाजूला करून जेव्हा आपण हे मान्य करू तेव्हा सुदिन!!

त.टी. - यावर नेहेमीच्या यशस्वी उखाळ्यापाखाळ्या काढणे, वचावचा भांडणं करणे असं न होता चर्चा झाली तर खूप बरं होईल. तसं चर्चा करण्यासारखंही यात फारसं काही नाही. पण इतरत्र कुठे पोस्ट केली असती तर कदाचित कुणाच्या लक्षात आली नसती. म्हणून इथे वेगळं लिहिलं. तेव्हा वाचा, पोस्ट लिहिलीच पाहिजे असं काही नाही. पण विसरून जाऊ नका Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

एकूणच कामसूत्रावर (विकण्यावर/वाचण्यावर इ.) बंदी सुचवलेली नाही ना? स्पेसिफिकली खजुराहोला विकल्याने नक्की काय प्रॉब्लेम होत होता? मला नीटसं कळलेलं नाही लॉजिक.

चिदंबरमला नटराजच्या मूर्ती,आग्र्याला ताजमहाल छोटे विकतात.
दिल्लिच्या औरंगझेब रोडचं नाव का बदललं? इतिहास नव्हे का?सफदरजंग,हजरत निझामुद्दीन आहे ना नावं?

@स्वाती - ते आमचं मन्दिर , श्रध्दास्थान आहे म्हणून तिथे विक्री नको असं काहीतरी म्हणणं आहे. मुळात या अशा छोट्या संघटनांना काहीतरी मुद्दा हवा असतो पब्लिसिटीसाठी, त्यातला प्रकार वाटला.
पण त्यावरून समस्त राईट विंग, नॉन लेफ़्ट, हिंदू लोकांचा खजुराहोलाच विरोध आहे असा गैरसमज नको, असं वाटतं फक्त. इथे थेट तालिबान वगैरे उल्लेख आहेत. वास्तविक या संघटनेनेही म्हटलंय की ते आमचं श्रध्दास्थान आहे.

@वेमा - जी पोस्ट माझ्या आयडीवर पर्सनल हल्ला नवीन नियमानुसार आहे, ती एडिट केली जाऊ शकते का? मी उत्तर न देता सोडून देतच आहे...

Such things affect the image of Indian culture and traditions in the eyes of the foreigners,” said Agarwal. >>>
Rofl ह्यांना ग्रीक, रोमन स्क्रिप्चर्स दाखवली पाहिजेत एकदा. Proud

“Whatever has been depicted can’t be allowed to happen here now. What sort of moral values are we passing on to our younger generation?” Jyoti Agarwal, a Bajrang Sena member. >>>
तिथे बघण्यासारखे असे नेमके काय आहे जे ईच्छा असलेल्या कुणाही यंगर वा ओल्डर जनरेशनला हाताच्या बोटांवर कैक पटींनी ईंटेन्स फॉर्ममध्ये बघण्याकरता ऑलरेडी अ‍ॅक्सेसिबल नाहीये. Lol

ह्या ज्या फ्लॉड मानसिकतेवर आधारित, ऊपद्रव मुल्य दाखवत शक्तिप्रदर्शन करणार्‍या ऊपटसुंभ पॉलिटिकल पार्ट्या आहेत त्यांना तुम्ही ईथे कितीही तात्विक चर्चा केली तरी काही फरक पडत नाही. त्यांनी एकदिवस येवून पाडापाडी वा मुर्त्यांचे विद्रुपीकरण केल्यास दंगे ऊसळणार, मिडियामध्ये गरमगरम चर्चा होणार, मायबोलीवर धागे येणार. सगळ्याच पॉलिटिकल पार्ट्यांचे तुष्टीकरणाचे धोरण असल्याने काहीही होणार नाही.
कुणी तरी वर म्हंटलंच आहे की आपण वेगाने भूतकाळाकडे प्रवास करत आहोत.... ते काही बाबतीत खरंच आहे .
विज्ञानावर आधारित भविष्यकाळाच्या वेगाशी जुळवून न घेवू शकणारे आणि समाजात महत्वं हरवून बसलेले लोक ही असली खुस्पटं काढतात.

तोडल्या जाणार्‍या झाडांना मिठी मारून बसणारे सुंदरलाल बहुगुणा आठवले. अर्थात ऑनसाईट अशी आंदोलन करणारे ग्रूप आणि माणसेही असतीलंच. पण बरोबर बोलणार्‍या अ‍ॅक्टिविस्ट लोकांना आजकाल कोणी भाव देत नाही, चुकीचे पण अरेरावीने बोलणार्‍याचे मात्रं लोक ऐकतात, त्यांचे फॉलोअर्स होतात.
सरकारकडूनच संरक्षण आणि अवेअरनेस असे दोन्ही ईफेक्टिवली पुरवता येण्यासाठी वा पुरवले जावेत ह्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा.
मध्यप्रदेश आणि केंद्र सरकार ह्यांची भुमिका काय आहे ह्या वादा बाबतीत?
परकीयांच्या बुतशिकन मानसिकतेच्या आक्र्मणाला तोंड देत काही हुशार, व्यापक डृष्टीकोनाच्या लोकांच्या प्रयत्नाने तगलेले हे हेरिटेज स्वकीयांच्या स्वार्थी मनोवृत्तीच्या आक्र्मणाला पुन्हा धैर्याने तोंड देईल अशी अपेक्षा.

(एकूणच कामसूत्रावर (विकण्यावर/वाचण्यावर इ.) बंदी सुचवलेली नाही ना? स्पेसिफिकली खजुराहोला विकल्याने नक्की काय प्रॉब्लेम होत होता? मला नीटसं कळलेलं नाही लॉजिक.)

They have to make a start somewhere.

They have to make a start somewhere.
नवीन Submitted by चिनूक्स on 20 June, 2017 - 21:42

>> स्लोली स्लोली... Happy

जी पोस्ट माझ्या आयडीवर पर्सनल हल्ला नवीन नियमानुसार आहे
<<
तुमच्या मतांबद्दल बोलणे = तुमच्यावर पर्सनल हल्ला! वाह.

Why don't you simply accept that it is your given task to defend whatever nonsense is going on under the name of "sanskruti" in this country? People like you are defending the extremist and backward views with pseudo logic and 'संयत, अभ्यासू' replies. And this is destroying my great country. I don't like it.

My personal advice : you should really look into your own logic and your own mind Happy

Why don't you simply accept that it is your given task to defend whatever nonsense is going on under the name of "sanskruti" in this country?

because it is not true , doc ! What proof do you have when you say such stuff about others? This amounts to personal accusation.

>या लिटिल नोन आउटफिटांना सपोर्ट होईल, असे करणार्‍या पोस्टी टाकणार्‍या सनव सारख्या आयडीजची खरेच कीव येते.
आरारा,
मुद्देसूद बोलून योग्य शब्दात लिहण्याची क्षमता असतानाही , त्या शब्दांना पुरेसे वजन देणारे मुलभूत विचार त्यामागे असतानाही, पुन्हा पुन्हा वैयक्तिक पातळीवर उतरण्याची तुमची गरज तुम्हाला आवरता येत नाही म्हणून इतरानीही तुमची कीव करावी का?
>People like you are defending the extremist and backward views with pseudo logic
If you are focusing on "people" rather than points, you are no different than the very people whose views you are trying to object.

तेव्हा आपला सामाजिक दांभिकपणा आणि त्याहूनही ढोंगी नीतीमत्तेची आवरणे बाजूला करून जेव्हा आपण हे मान्य करू तेव्हा सुदिन!!..>>>>>>>>
म्हणजे नक्की काय करायचं????
इथे मी मुक्त लैंगिकता गरजेची आहे यावर एक धागा काढला होता ,त्यावर एकही विदुषी फिरकली नाही,का हो असे ?? हा दांभिकपणा नाही का?
लैंगिकता हा बायलॅटरल इश्यु(?) असताना फक्त पुरुषांनी त्यावर चर्चा केली पाहीजे का?
भारतापुरतं बोलायचं झालं तर लैंगिकतेच्या बाबतीत स्त्रीया ह्या पुरुषांपेक्षा जास्त दांभिक असतात हे निखालस सत्य आहे.मुलगी वयात आली की लैंगिकता हे फार मोठं ओझं आहे हे तिच्या मनावर बिंबवणार्या तिच्या घरातल्या स्त्रीयाच असतात.
हा स्त्री दांभिकपणा जेव्हा कमी होईल तेव्हाच निकोप चर्चा होऊ शकेल.

सिंथेटिक जिनियस
थोडं विषयांतर होतंय. दांभिकपणाबद्दलचे तुमचे विधान विषयाला धरून असले तरी मायबोलीवरचे धागे, स्त्री वि. पुरूष यांच्या दांभिकतेतला फरक या मुद्द्यामुळे धागा भरकटतोय.

फोनवरून आहे म्हणून जास्त लिहित नाहीये. तसंही जे लिहायचं होतं ते बहुतांशी वरती संक्षिप्तात लिहिलं आहेच.

अतुल ठाकूर यांनी अतिशय मुद्देसूद आणि उत्तम पोस्ट लिहिली आहे. धन्यवाद, अतुल.

Please explain something to me.

When I type something, it is ME. My thoughts. For examplए, the scenario of ppl with CHILD visiting a curio shop with so called porn, is not an established विचारधारा. Like communisम for example.

NOW, HOW DO I GENERALIZE THIS?

How can one differentiate a thought from a person that thinks it?

You are going to show me ppl circumventing the mean point and asking this id if they are supporting the extremist view. And the id circumspectly saying no.

But then the original insinuating and विकृत post remainस there.

The BJP and supporters are using the stratagy of discrediting the persoन who puts forward a thought.

I'm just naming a person's thought process for what it is.

How does that qualify as personal attack?

उदा. मी जर म्हटलो की कुणी "तर्रकीर्तन" करतो आहे, अर्थात, असे सुचवितो आहे ही हा माणूस दारू पिउन इथे पोस्टी लिहितो आहे. (हा माबोच्या लाडक्या राजकवींचा आवडता, व त्यांनी खास माझ्यासाठी निर्माण केलेला शब्दप्रयोग आहे) तर तो व्यक्तिगत हल्ला होत नाही ना?

असो.

तुमचा कामाचा वेळ आहे. आम्ही रिकामे आहोत. शुभरात्री.

या वरून (मला वाटते वाजपेयींच्या पं.प्र. काळातली -चूभूद्याघ्या.) एक घटना आठवली. मोहेनजोदरो येथे सापडलेले सुप्रसिद्ध ब्रॉन्झ नर्तकीशिल्प असेच वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. हे चित्र भारतीय पुरातनतेचे आणि कलावैभवाचे प्रतीक म्हणून मानचिह्न स्वरूपात वापरले जाते. एका मंत्रालयाने त्यांच्याकडून अभिरुचिपूर्ण सदिच्छा भेट म्हणून छापलेल्या डायर्‍यांवर या नर्तकीशिल्पाचा मिनिएचर फोटो पानांवर छापला. त्यावरून ससदेत गहजब उडाला. आपल्या खासदारांना साक्षात्कार झाला की त्या शिल्पातली नर्तकी नग्न असल्याने असे चित्र सरकारी डायर्‍यांवर छापणे हे भारतीय संस्कृतीस लज्जास्पद आहे. शेवटी त्या डायर्‍या मागे घेतल्या गेल्या.
हे चित्र शाळेतल्या यत्ता पाचवीपासून डोळ्याखालून जात असते. पण त्यातली नग्नता कधीच जाणवली नव्हती ती या गहजबामुळे जाणवली.

There is absolutely no need for this
>या लिटिल नोन आउटफिटांना सपोर्ट होईल, असे करणार्‍या पोस्टी टाकणार्‍या सनव सारख्या आयडीजची खरेच कीव येते.
हे एक वाक्य काढले असते तर तुमच्या प्रतिसादावर काहीही फरक पडला नसता.
>I'm just naming a person's thought process for what it is.
Not really. You are naming a person's thought process as you think it was. And To an extent it is fine as long as you don't say "सनव सारख्या आयडीजची खरेच कीव येते" That Just says I don't have any points to counteract so I am going against the person who said.

>The BJP and supporters are using the stratagy of discrediting the persoन who puts forward a thought
We have tried (and continue to try) to stop that. It has happend to many ids. And we are not looking at BJP vs non BJP. Anyone going to personal level is not welcomed here as basic rule of conduct.

आरारा, अहो तो जोक होता, मला क्वीन मधील सीन आठवला दॅट्स ऑल. क्वीन मधील सीनही विनोदी होता. असे इतपत विनोद माबोवर वाहत्या पानावरही केलेले पाहिले आहेत.
आपला मुक्त लैंगिक संस्कृतीवाला पास्ट आणि आताची स्थिती, यातला विरोधाभास दाखवून देण्याचा व रेग्युलेशन का गरजेचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न होता. तुम्हाला आक्षेपार्ह वाटल्यास तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकत होतात. पण तुम्ही त्या जोकशी अनरिलेटेड अनेक पर्सनल आरोपही केले आहेत.

Anyone going to personal level is not welcomed here as basic rule of conduct.
<<
Sir,
With due respect to the policies of the website.

I have given an example of "personal" attack.

I dont see any action taken. AND I get censured Happy

Makes me real happy.

Shall add this id to the list of "mabo protected" ids now, and wont comment again. Thanks.

आरारा,
तुम्ही पहिल्या पानावर सिम्बा यांची जी विनोदी (??) पोस्ट टाकली आहे त्यात अशी शिल्पे असलेल्या मंदिरात १८ वर्षांवरील मुलांनाच प्रवेश द्यावा असं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे सध्या १८ खालील मुलांना प्रवेश मिळतो का, आणि मग मी विनोदात लिहिलेला scenario plausible आहे का , की ही गोष्ट individual parental discretion वर सोडावी हाही एक प्रश्न आहे. पण ते फारच विषयांतर होईल.

असो. मी माझी मूळ पोस्ट एडिट केली आहे. माझा डोक्यात क्वीन चा रेफरन्स असला तरी वाचताना दुसर्या व्यक्तीला ती पोस्ट खटकू शकते हे तुमच्या पोस्टमुळे जाणवलं. धन्यवाद.

इतक्यातच खजुराहोला जाऊन आले. (माझी साडेचार वर्षाची मुलगी सोबत होती, ती गाईडचं बोलणं ऐकण्यापेक्षा हिरवळीवर खेळत होती.) एकूण शिल्पांपैकी फार तर 10% कामशिल्पं आहेत, मुद्दाम दाखवल्याशिवाय त्यातली कितीतरी दिसणारही नाहीत. या प्रमाणात कामशिल्पं कोणार्क आणि अन्य मंदिरातही आहेत. पण "अशी शिल्पं बघायला" येणारे लोक खजुराहोला येतात, कोणार्क वगैरेला जात नाहीत. तिथले गाईड पण कामशिल्पांविषयी विशेष माहिती सांगत नाहीत. खजुराहोचं मार्केटिंग वेगळं आहे, पर्यटकही.

खजुराहोचं मार्केटिंग वेगळं आहे, पर्यटकही.
>>>>>>>>

थोडक्यात नग्नता विकली जातेय. मग ती संस्कृती आहे की नाही हा मुद्दा गौण. बाकी जिवंत लोकं जगताहेत की मरताहेत याची पर्वा न करणारी माणसं दगडी शिल्प जतन करायला का आटापीटा करतात हे समजत नाही. दगडंच ती तुटली फुटली हरवली भूकंप येऊन जमिनीत गडप झाली तर पुढच्या पिढीचे काय असे नुकसान होणार आहे. मी तर बोलतो जर भारत सरकार माझ्या टॅक्सच्या पैश्यातून त्यांन जतन करायचा खर्च करणार असेल तर तोडून टाका, आम्हाला काही गरज नाही.

अर्थात हे माझे वैयक्तिक मत असले तरी ते एका फार मोठ्या गटाचे प्रतिनिधीत्व करते जे शिल्पकलेबाबत अरसिक आहेत आणि त्या शिल्पातील नग्नताही ज्यांना एंटरटेन करत नाही.

>>>> कामसूत्र विक्रीला विरोध का असावा असं तुम्हाला वाटतंय?
फक्त कामसूत्र विक्रीला विरोध आहे की सरसकट सगळ्याच souvenir ना विरोध आहे? <<<
याच चर्चिला जाणारा शब्द "कामसुत्र" म्हणजे काहि गंडादोरा-ताईत वगैरे विकतात का? मंत्रवुन वगैरे? Proud

मी पूर्वी पण माबोवर लिहिले होते, परत रिपिट करतो की आमच्याकडे बोवा नग्नता नविन नाही.
साधी देवपुजा घ्या, इष्ट देवतेला/देवाला आवाहित केल्यावर त्याला हात पाय धुवायला पाणि दिल्यावर, स्नान घातल्यावर, लगेचचा पहिला उपचार तो "वस्त्र" देणे, अंगरक्षण/लज्जा रक्षणासाठी ! मग नंतर जानवे फुल दिवा उदबत्ती वगैरे.....
पण आधी वस्त्र.......

जर आत्ता कुणि तिकडे गेले, तर तिथल्या स्थानिक लोकांना असला काहि वाद चर्चा आंदोलन वगिअरे चाललय हे माहितही नसेल.... बाकी सर्व मिडियाने उठवलेला धुरळा.... ! कधी या बाजुने, तर कधी त्या बाजुने...

ऋन्मेश, तू चुकीचा मुद्दा उचलतो आहेस,
बाकी जनता मरत असताना दगडी शिल्पे जतन करावीत का ? हा मुद्दा नाहीच आहे (तसे वाद घालायचा असेल तर बाकी जनता मारत असताना चांद्र मोहिम काढावी का? हा पण मुद्दा येऊ शकतो पण धाग्याचा तो विषय नाही )
शतकानुशतके उभी असलेली एखादे देऊळ आपल्या संस्कृती भाग आहे असे लोक अभिमानाने सांगतात,
त्या देवळावर अंकित केलेय शिल्प आकृतीं विषयी अभिमानाने बोलतात. (किंबहुना त्या शिल्पकृतीन मुळेच ते मंदिर जगभर ओळखले जाते)
मात्र त्यावर अंकित असणाऱ्या काही आकृती जर सोवेनीर स्वरुपात विकल्या जात असतील तर त्यामुळे आपल्या पवित्र आणी उच्च संस्कृतीचा अपमान कसा होतो?

हा कळीचा मुद्दा आहे.

आज ज्यांना वाटते मंदिर प्रांगणात (जिथे ते सनाग्ल्यात जास्त रेलेवंत आहे )कामसूत्र पुस्तक विकल्याने संस्कृती भ्रष्ट होते, त्यांना उद्या क्रॉस वर्ड मध्ये कामसूत्र दिसल्याने त्रास होणार नाही याची काय खात्री? परवा माझ्या घरी हे पुस्तक दिसले तरी यांना त्रास होणार नाही याची काय खात्री?
तेरवा तू तुझ्या मोबाईल वर / laptop वर काम्सुत्राशी रेलेटेड documentry/ पोर्न क्लीप बघितलीस तर त्यांना प्रोब्लेम होणार नाही याची काय खात्री? (पोर्न वर सरसकट बंदी घालण्याचा प्रयत्न या आधी करून झालाच आहे )

दुसरा मुद्दा सनव ताईंच्या लहान मुले आणि शिल्प या संदर्भात,
तर ताईंना हा प्रश्न फक्त खजुराहो बद्दल पडतो, क्रॉस वर्ड मध्य ठेवलेली पुस्तके, TV वरच्या कंडोम , napkins च्या जाहिराती, कॅम्पौंड च्या भिंतींवर एक्स्पिसित भाषेत लिहिलेल्या सेक्स क्लिनिक च्या जाहिराती या सगळ्यांनी मुले पालकांना प्रश्न विचारतील अशी शंका त्यांना वाटत नाही , गम्मतच आहे.

(पोर्न वर सरसकट बंदी घालण्याचा प्रयत्न या आधी करून झालाच आहे )

पुन्हा चालू झाला आहे. प्रयत्न करून बघा.

Pages