मन माझे सैराट... भाग ४

Submitted by दिपक ०५ on 8 June, 2017 - 14:50

भाग ३ पासून पुढे....

सागर ते पेकेट उघडूतो, त्यात तिकिट व राधाचा नंबर होता.. सागरने लगेच तो नंबर डायल केला...
रिंग होऊ लागते.. २-३ रिंग होताच एक कोमल आवाज त्याच्या कानी पडला...

हँलो... तो नाजुक आवाज ऐकून सागरच्या तोंडून शब्दच निघेनासे झाले..

हँलो.. कोण बोलतयं?.. राधा..

सागर अडखळत्या शब्दात उत्तर देतो...
मी मी सागर...

कोण सागर.. राधा..

मी गँलेक्सी सॉफ्टवेअर कडून सागर बोलतोय.. दिक्षित सर नि तुम्हाला माझ्याबद्दल सांगितले असेल... सागर..

ओ.. आय एम सॉरी सागर.. मी तुम्हाला ओळखु शकले नाही.. दिक्षित सर नी मला आपल्या प्रोजेक्ट बद्दल सगळी माहिती दिली आहे.. तर तुम्ही उद्या येताय ना?..

हो राधा मला अत्ताच तिकीट व तुझा नंबर मिळाला.. उद्या संध्याकाळ पर्यंत मि तिथे असेन.. सागर..
ओके.. सागर, तुम्ही लॅन्ड झाला कि मला फोन करा..

ओके राधा.. सागर..

चला उद्या भेटू मग.. शुभरात्री.. राधा..

हो.. शुभरात्री राधा.. सागर..

त्या कॉल नंतर सागरच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य व मनात उत्साह पसरला होता.. का? ते बहुतेक सागरला सुद्धा माहित नसेल..

सागर आपली पॅकिंग करु लागला.. त्याला राधाला भेटण्याची जनु ओढ लागली होती.. रात्री झोपताना सुद्धा त्याला उद्याची कल्पना येत होती..

त्याच विचारात गुंग होवुन तो झोपी जातो...
........................

शनिवार, ९ एप्रिल सकाळी १० वा.
सागर आपल्या गाडीतून एयरपोर्टकडे निघाला.. त्याने रेडियो लावला.. गाणं लागलं...

" छु कर मेरे मन को, किया तुने क्या इशारा..
बदला ये मौसम, लगे प्यारा जग सारा"

गाणं ऐकून सागराच्या तोंडून आपोआप शब्द निघाले..
"व्वाह"...

गाणं गुणगुणत सागर एयरपोर्टवर पोहोचला..
...................................

दुपारचे १२:३० वाजले होते.. सागरची फ्लाइट लॅन्ड झाली.. बाहेर येताच त्याने राधाचा नंबर फिरवला..

हॅलो.... -राधा..
हॅलो राधा मि सागर बोलतोय.. -सागर..
........................
.
(क्रमशः)...

Group content visibility: 
Public - accessible to all site users