शेत- करी एक सन्मान......

Submitted by वि.शो.बि. on 8 June, 2017 - 03:32

Read
सध्या महाराष्ट्राची लोकसंख्या 112,374,333 आहे.तरीही महाराष्ट्राची परीस्थीती म्हणजे नाम बडे दर्शन खोटे असे.
औद्योगिक क्षेत्रात नाव खुप मोठे परंतु शेतकरी ला मान सम्मान नाहि.
त्या मानवाला आज हक्क आणि आपली बाजु मांडण्यासाठि रस्त्यावर उतराव लागत आहे. हे खुप लाजिरवाणि गोष्ट आहे.
आपन टीव्हि पाहुन या गोष्टी वर comment करत बसलो आहे.
सरकार ने हे केल पाहीजे.....ते केल पाहीजे....
असे intervew पाहुन मला या लोकांची दया व हस्य येत असुन यांना काय बोलाव तेच समजत नाहि..
शेतकरी मरो किंवा वाचो..... हे कुणालाच घेण देण नाही.फक्त बोलुन आपल काम संपले हिच वृती यातुन दिसुन येते.
याच कारण फक्त "अहम"
माझ चांगल झाल बस्स.....
कुणाच काहिहि हो.....
हि आपलि अपंग मानसिकता.
शेतकरी रस्त्यावर का उतरला याच संशोधन केल्यास खुप मोठा उद्रेक ज्वालामुखिच्या रुपाने आपल्याला दिसेल.
आज हि ज्या शेतकरीने आत्महत्या केली असेल त्याची बायको,मुलगी,मुलगा संपुर्ण परिवार काय हाल अपेष्टा सहन करत असेल. हे विचार करुणच अगांवर काटे येतात. हे काटे त्यालाच येतात ज्याला शेतकरी बद्दल अभिमान असेल.
फक्त बोलुन मोकळ होण. हे त्या लोंकाना मस्त जमते ज्यांना आपली मानसिकते च्या आड लपता येते.
असो......
सरकार हे करेल.... ते करेल........
यात शेतकरी ने आपला वेळ वाया घालुन चालनार नाहि. आपणच आपली मार्ग शोधत एक नविन रस्ता तयार करु अशी जिद्द अंगि बाळगली कि सर्व प्रश्न हळुहळु सुटतील नंतर सरकारला जाग आली कि करेल मदत.
परंतु आपन असे खचुन चालनार नाहि.
पावसाने हजरे लावली आहे.
प्रत्येक शेतकरी एकमेंकाना मदत करेल असे एक वचन घेउन नव्याने सुरुवात करुया.
अगोदर सघंटित व्हा. नंतर सघर्ष.
कोंत्याहि शेतकरी ला दु:ख आले कि ते एकत्र येउन सोडवल पाहिजे.
शेतकरी ने शेतकरी ला समजुन घेतल पाहिजे.
धनी शेतक-याने गरीब शेतक-याला स्वत: हुन मदत केली पाहिजे हि मदत खुप मोल्यवान व लाभ दायक अशी ठरेल.
आपला माल चांगल्या भावाने विकला जावा अशि प्रत्येकाची अपेक्षा असते.
म्हणुन सरकारने online भाव संपुर्ण महाराष्ट्रात लागु करुन हमी भाव द्यावा हिच एक सरकार कडुन अपेक्षा.
आणि राहिली गोष्ट गरिब शेतक-याची त्यांना पैसा व भांडवल उपलब्ध करुन देन हे महाराष्ट्राच्या जनतेच काम आहे. शेतकरी च्या भाजी पाल्या ला १/२ रुपयाने कमी खरेदी करन सहसा टाळा.
आज १/२ रुपयाने त्यांच्या मुलाला पेन येउ शकतो.
असे करनीने कथनी होत असते.
आज पासुन जी किंमत भाजीची असेल मि तीच किंमत देउन ती भाजी खरेदी करेल. हा मुलभुत मंत्र अंगि बाळगा.
फक्त बोलुन सहभाग नोंदवु नका. तर कृती करा. तरच महाराष्ट्राची शान राहिल. म्हणजे शेतकरी खुश राहील. कोंत्याही सरकारला आपली कामगिरी चांगली ठेवावी असच वाटत. कारन त्यांना शासक म्हणुन आपनच नेमतो.
सरकार लगेच कर्ज माफ करेल हि आशा फोल ठरते. सरकार कर्ज माफ करेल हि परंतु हे अजुन किती वर्ष चालनार. हे समजुन घेन खुप महत्वाची बाब आहे.
म्हणुन दुरदृष्टि ठेउन एक कायम स्वरुपाचा पाउल सरकारने उचलावा हिच अपेक्षा.
एक ही शाळेच्या मुलांने शेतकरीच्या आत्महत्ते वर निंबध लिहु नये. हिच त्या निसर्गाला प्राथना.
आपणच शेतक-याच्या आत्महत्याला कारणीभुत आहोत हे समजुन एक नविन पाउल नव्या दिशेने उचलुन जे शक्य असेल ते करुन आपले रस्त्यावरचे शेतकरी सन्मानाने शेतात पाठवु.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वि.शो.बि.
तुमचा शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा कळला ..
पण बाकीचे मुद्दे ? तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ?

सध्या महाराष्ट्राची लोकसंख्या 112,374,333 आहे.तरीही महाराष्ट्राची परीस्थीती म्हणजे नाम बडे दर्शन खोटे असे.>>>>
लोकसंख्या आणि स्थिती ... काय संबंध .. ते स्पष्ट कराल का ?

भाजी पाल्या ला १/२ रुपयाने कमी खरेदी करन सहसा टाळा.>>>
अहो बरेचदा भाजीपाला विकणारे व्यापारी असतात .. शेतकरी नाही ... या किरकोळ विकेत्यांनी शेतकऱ्यांकडून आधीच खरेदी केलेली असते ...

आणि राहिली गोष्ट गरिब शेतक-याची त्यांना पैसा व भांडवल उपलब्ध करुन देन हे महाराष्ट्राच्या जनतेच काम आहे.>>>
महाराष्ट्रातील जनता? नक्की काय अभिप्रेत आहे ?

सध्या एव्हढच पुरे ...

भाजी पाल्या ला १/२ रुपयाने कमी खरेदी करन सहसा टाळा.>>>
अहो बरेचदा भाजीपाला विकणारे व्यापारी असतात .. शेतकरी नाही ... या किरकोळ विकेत्यांनी शेतकऱ्यांकडून आधीच खरेदी केलेली असते ...

होहो.. नक्कीच शेतकर्यांची सर्वाधिक पिळवणूक व्यापार्यांच्याकडूनच होते. किरकोळ भाजीविक्री करणारे शेतकरी उलट झुकतं माप देऊन भाजीपाला विकतात असा अनुभव बरेचदा येतो.

खुप काहि प्रश्न आहे......
तुमच्या मनात....
मि लोकसंख्या टाकली आहे. यावरुन दिसुन येते कि किती लोक आपले पोट भरतात. ते याच शेतकरीच्या जिवावर......
अन
राहिली गोष्ट व्यापारीची.....
एक मुलमंत्र आहे तो तुम्हाला समजावा लागेल.
मला फायदा झाला म्हणजे माझ्या मागच्या लोंकाना फायदा झाला.
उदाहरण:-
एक व्यापारी शेतकरी जवळुन त्याचा माल खरेदि करतो. तो माल म्हणजे किरकोळ भाजीपाला.
अता समजा एखादि वस्तु आपण MRP वरुन खरेदि करतो तेव्हा व्यापारी व कंपनी ला नक्कि फायदा होतो. तेच आपन किरकोळ भाजीपाल्या विकणा-याला भाव करुन विकत घेतो.
आता शेतकरी हि याच महाराष्ट्राचा त्याला माहित असत कि एखादि भाजि कितिला हा व्यापारी विकेल.
मग तो तसाच भाव ठरवुन आपला माल व्यापारी ला विकुन मोकळा होतो.
अता आपन विचार करु. जर व्यापारी ला तोच माल बाजारात आणण्यासाठी काहि खर्च लागतो मग तो सर्व नफा पाहुन ति भाजी विकतो.
आणि आपण फक्त ति भाजी ला भाव करुन खरेदि करुन निघुन जातो.
अता आपन समजा भाव न करता १/२ रुपये त्या व्यापारिला दिला म्हणजे. व्यापारीला फायदा न त्या भाजीला एक MRP येइल म्हणजे
कुणीच भाव नाही करनार. शेतकरी बाजारात जात असतांना त्याला भाव समजेल मग तोच आपला माल विकतांना निट भाव मागेल.
म्हणजे किती मोठा फायदा आहे आपल्या एका सवयीचा.हे सर्व हळुहळु होइल. परंतु सुरुवात आपन करु..........................हिच आपेक्षा
आणि तुमचे काहि सुंदर विचार असतील ते मला नक्कि सांगा. मला ते करायला हि आवळेल.

>>>>राहिली गोष्ट व्यापारीची.....
एक मुलमंत्र आहे तो तुम्हाला समजावा लागेल.<<<<<

तुमचा व्यापाराचा मूलमंत्र ऐकून हसावे कि रडावे तेच कळेनासे झाले आहे

----------- अठरा वर्षे सेल्स व मार्केटिंग मध्ये काढलेला एक अभागी MBA

अमर विश्वास>>>>>>
हेच सत्य आहे. एकाला फायदा झाला तरच दुसर्याला फायदा होतो यात व्यापारी मधे आहेत.
सरकार एखादा पाउल उचलेल.....
याची तुम्हि अपेक्षा करु शकतात.
नाहि तर निसर्गाला गवसनी घाला......
हसण्या पेक्षा हे शेतकरी अन्नदात्याला उपयोगी असेल.

अमर विश्वास>>>>
धन्यवाद....
तुम्हि तुमचा नविन दृष्टीकोन मांडु शकतात.