तेंव्हाही... आताही

Submitted by डॉ अशोक on 6 June, 2017 - 21:54

तेंव्हाही... आताही
*------------------*
तू होतीस तशीच आहे,तेंव्हाही... आताही
पाठीशी माझ्या अशी, तेंव्हाही... आताही
*
वर्षे सरली किती, अजून कळले नाही
अंतर नाही आले, तेंव्हाही... आताही
*
कितीक श्रावण आले, भिजवून आणिक गेले
ग्रीष्मातही भिजलो आपण, तेंव्हाही... आताही
*
तू खळाळून हंसली, मीही स्मित केले
मौनातही सारे कळले, तेंव्हाही... आताही
*
रदीफ होती नव्हती, पर्वा कुणास आहे?
तू एक गझल माझी, तेंव्हाही... आताही
*
-अशोक

(ह्या गीताची ध्वनीफीत मागणी केल्यास मिळेल)

Group content visibility: 
Use group defaults

@मीनल
रदीफ ही गझल मध्ये आपल्याला भेटते. मतल्याच्या (पहिल्या) शेर मध्ये दोन्ही ओळीत आणि इतर शेर मध्ये दुसऱ्या मिसर्यात (ओळीत) शेवटी येणाऱ्या समान शब्द किंवा शब्द समूहास रदीफ म्हणतात. हा स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याचा खरा अर्थ "उंटावर स्वाराच्या मागे त्याला चिकटून बसलेली स्त्री " असा होतो

Mastach..!!
Khup chan lihilay..