न्हाव्यासारखी हजामत घरच्या घरी कशी करावी?

Submitted by मानव पृथ्वीकर on 27 May, 2017 - 03:13

भारतात केशकर्तन न करुन घेणारा, केशभूषा न आवडणारा माणूस विरळाच! किंवा केसांनी तरी विरळा.
बाहेर केशकर्तनालयात केली जाणारी हजामत झटपट, सुबक असते खरी पण तितकीच आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यात वापरलेले वस्तरे, कात्र्या, कंगवे अस्वच्छ असतात. डोक्याला, मानेला इन्फेक्शन होऊ शकते.

हे सगळे टाळण्यासाठी आम्ही घरी फिस्कर्सची कात्री आणि सिंगरची दोरी वापरुन घरी हजामत करतो, तर तिला नीट आकार येत नाही.

न्हावी कुठली खास (आपल्याला न दिसणा‍‍‍र्‍या दोरीची बनवलेली) टेम्प्लेट वापरतात काय? अनेक न्हाव्यांना याविषयी विचारले तर कोणीही काही सांगितले नाही. अर्थातच त्यांचे ट्रेड सिक्रेट का उघड करतील म्हणा.

तर मायबोलीकरांनो,
घरी केलेली हजामत सुबक होण्यासाठी काय करावे?
यासाठीच्या कर्तनकृती, टिप्स असतील तर सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

??????????

माझ्या माहीती प्रमाणे दाढी करण्यासाठी "ब्लेड" या शस्त्राचा वापर केला जातो. "दोरीने दाढी करतात" हा प्रकार माझ्याकरीता नविन आहे.

दोरी ने मुलींच्या आयब्रो बनवतात ते माहीती आहे.

आधी तर हसून घेते Rofl
काका तुम्हाला पण अश्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत Lol ह.घ्या. Light 1

गजोधर, हेअर कट हो:

Noun - 1 Sense Found
हजामत, केशकर्तन, केस कापणे, मुंडण, श्मश्रू, क्षौर
केस कापण्याचे काम
"हजाम हजामत करत आहे."
Relations and Languages

वापरलेले वस्तरे, कात्र्या, कंगवे अस्वच्छ असतात. डोक्याला, मानेला इन्फेक्शन होऊ शकते. >>>>

आमचा न्हावी आमच्या समोर कात्र्या वस्तरे डेटॉलच्या पाण्याने धुतो. मग वापरतो.

हे सगळे टाळण्यासाठी आम्ही घरी फिस्कर्सची कात्री आणि सिंगरची दोरी वापरुन घरी हजामत करतो, तर तिला नीट आकार येत नाही >>>>>

एक जालिम उपाय आहे... झिरो मशिन येते.. त्याने एकसाथ केस काढून टाका. न रहेगा बांस न बजेगी बांसुरी.. वापरायला सुध्दा सोप्पे. Wink

मानव, अश्याच विषयावर धागा मध्यंतरी पाहिलेला!
मला वाटते ते पुर्वी दगडावर घासून वापरले जाणारे वस्तरे जास्त योग्य होते आज काला न्हावी सर्रास ब्लेड तोडून वापरतात!
आणि योग्य कोनात लावलेले आरसे हा एक महत्वाचा घटक असावा. कंगवा एका बाजुला निमुळता होणारा वापरून पहा...

पण विषय चांगला आहे! तज्ञांकडून जास्त उपयुक्त माहितीच्या प्रतिक्षेत! Wink

एक जालिम उपाय आहे... झिरो मशिन येते.. त्याने एकसाथ केस काढून टाका. न रहेगा बांस न बजेगी बांसुरी.. वापरायला सुध्दा सोप्पे.>>>>
गजोधर चांगला सल्ला, पण सध्या उन खूप आहे. हेलमेट खूप तापते आणि मग चटके बसतात, भाजल्या सारखे डाग येतात.

पण सध्या उन खूप आहे. हेलमेट खूप तापते आणि मग चटके बसतात, भाजल्या सारखे डाग येतात.>>>

ते क्रिकेटर वापरतात ना तसे हेल्मेट वापरता येईल... ते नाही का बर्‍याचदा वरून दाबतात हेल्मेट तर पाण्याची धार लागते!

(हा प्रतिसाद विषयाला धरून आहे! हेल्मेट श्मश्रू केलेल्या डोक्यावरील उपायांसाठी सुचवलयं. नाही तर पुन्हा विषयांतर केले म्हणाल) Wink

तज्ञांकडून जास्त उपयुक्त माहितीच्या प्रतिक्षेत >>> तज्ञ म्हणजे तुम्हाला काय वाटते मायबोलीकर घरी केस कापत बसतात ? Uhoh

आवडारा माणूस विरळाच! किंवा केसांनी तरी विरळा. Lol

भारीच स्टार्टिंग
------------

मस्त धागा मानवजी
उपयोगी ठेवणीतली जाणकारांकडून आलेल्या माहीतीच्या प्रतिक्षेत !

फारच जिव्हाळ्याचा विषय आहे हो हा.... इथे (लिहिल्या)काढल्या बद्दल धन्यवाद

कायेना, मला बघितलेला, भेटणारा प्रत्येक जण आयुष्यात किमान एकदा तरी विचारतोच, की
"काय हो लिंबाजीपंत?? तुम्हाला केशकर्तनाचा खर्च बराच कमीच येत असेल ना? नै, म्हणजे न्हावि तुमच्याकडुन निम्मेच किम्वा त्याहुन कमी पैसे घेत असेल ना? आहो आहेतच कुठे फारसे केस उरलेले कापायला? बरय बोवा तुमचं..... "

अन अस कुणी विचारलं की माझ्या तळपायाचि आग मस्तकाला पोहोचते....

एकतर कोणताही न्हावी मला केस कमी आहेत म्हणून "डिस्काऊंट " देत नाही, पुरेपुर साठ रुपये वसुल करतो.
अन मुळातच केस कमी असल्याने जरा कुठे डोईवर थोडेसे इकडे तिकडे वाढले उगवले तरी ते विचित्र दिसु लागते म्हणून इतरांपेक्षा मला लौकरच परत कटिंगला जावे लागते... Sad

मानव,
जी मशिन्स मिळतात त्याला लेंग्थ ची अडजस्टमेंट असते,
सरसकट 0 नम्बर मारावे लागत नाही, हवी तितकी लांबी ठेऊ शकता,

त्यानंतर डोक्याला बंदना बांधून हेल्मेट घालू शकता,
बंदना (उर्फ रुमाल)कोणत्या ब्रँड चा बरा,या बाबत कु ऋन्मेष टिप्स देईल

नेहमीचे थंड बिसलेरीचे पाणी घ्या . त्यात एवरेस्टचा पाणीपुरी मसाला टाका. नतर पुदीना कोथिबीर, पादेलोन, च्याट मसाला, हिरव्या मिरच्या एकत्र पाट्यावर वाटा . मिक्सर नको. हे सर्व माठात मुरवत ठेवावे. त्याला लाल फडके गुन्डाळावे दोन तासानी डोक्यावर थापावे.

अ3 Lol

अ३ Proud

पण ही तर भेजा मसाल्याची पाकृ झाली.
मसाला खायला उंदरं येतील आणि केस पण कुरतडतील अशी आयडिया आहे का?

गजोधर, सिम्बा ओके झिरो मशीनला शक्यता यादीत घेतो. अर्थात 'हजामचीची शस्त्रे' असा धागा काढून त्यात 'झिरोमशीन कुठली घ्यावी?' हे विचारणे आले.

न्हाव्यासारखी हजामत घरच्या घरी कशी करावी?
>>>>>
बेसिकच गंडलेय.
न्हावी हजामत दुसर्‍याची करतो, आपण आपली स्वतःची करायचे विचारत आहात.
थोडक्यात वस्तरा पकडलेल्या हाताचा अँगल १८० च्या कोनात वळला.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तो जर वस्तरा ईसतरा पकडत असेल तर आपल्याला वस्तरा उसतरा पकडावा लागतो.
मग शेम टू शेम कशी जमणार?
जर तुम्ही एक दाढी पार्टनर निवडला आणि घरच्या घरी एकमेकांची हजामत करू लागलात तर ते न्हाव्यासारखे समोरच्या अँगलने होईल आणि हा प्रश्न लागू होईल आणि चर्चा पुढे नेता येईल ..

असो,
बाकी विषय माझ्या आवडीचा.. आणि दाढीचे काम तेवढेच आळसाचे .. त्यामुळे सरासरी दोन पावणेदोन महिन्यांनी मी दाढी करतो. एवढी वाढलेली दाढी घरी करणे जिकीरीचे काम. म्हणजे बघा हं, रविवारी नाश्त्याला घरी गोडाचा शिरा करणे वेगळे आणि सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद करणे वेगळे. त्यामुळे मग न्हावीच गाठतो. शिरा करायला नाही, वाढलेली दाढी करायला. मागे माझ्या न्हाव्यांच्या अनुभवावर मी इथे दोन सत्यलेख लिहिले होते. त्यांच्या लिंक्स आता परोपकाराच्या हेतूने द्याव्याच लागणार. त्यातून काही मिळाले तर शोधा ..

गप्पा १ - एसी सलून - http://www.maayboli.com/node/53197
ब्यूटी पार्लर - लेडीज अ‍ॅन्ड जेन्ट्स सलून! - http://www.maayboli.com/node/60646

मला सत्यनारायण वाचून आधी लिंबुदा यांचा प्रतिसाद आहे असेच वाटले. खाली बघतोय तर ऋ बाळ.

पावणेदोन महिन्यांनी दाढी
एकतर मग हा शाळेत जातो किंवा याला गफ्रे नाहीये.
ऋ बाळ तू एकपे रेहना

? पावणेदोन महिन्यांनी दाढी
एकतर मग हा शाळेत जातो किंवा याला गफ्रे नाहीये.
>>>>>
यामागे काय लॉजिक आहे?

Pages