न्हाव्यासारखी हजामत घरच्या घरी कशी करावी?

Submitted by मानव पृथ्वीकर on 27 May, 2017 - 03:13

भारतात केशकर्तन न करुन घेणारा, केशभूषा न आवडणारा माणूस विरळाच! किंवा केसांनी तरी विरळा.
बाहेर केशकर्तनालयात केली जाणारी हजामत झटपट, सुबक असते खरी पण तितकीच आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यात वापरलेले वस्तरे, कात्र्या, कंगवे अस्वच्छ असतात. डोक्याला, मानेला इन्फेक्शन होऊ शकते.

हे सगळे टाळण्यासाठी आम्ही घरी फिस्कर्सची कात्री आणि सिंगरची दोरी वापरुन घरी हजामत करतो, तर तिला नीट आकार येत नाही.

न्हावी कुठली खास (आपल्याला न दिसणा‍‍‍र्‍या दोरीची बनवलेली) टेम्प्लेट वापरतात काय? अनेक न्हाव्यांना याविषयी विचारले तर कोणीही काही सांगितले नाही. अर्थातच त्यांचे ट्रेड सिक्रेट का उघड करतील म्हणा.

तर मायबोलीकरांनो,
घरी केलेली हजामत सुबक होण्यासाठी काय करावे?
यासाठीच्या कर्तनकृती, टिप्स असतील तर सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पण नीट नसेल तर अजागळ व अस्वच्छ दिसते.
>>>>
डिपेण्डस! ते एक्स फॅक्टरवर अवलंबून आहे. सरसकट सर्वांनाच शोभते वा शोभत नाही असे बोलू शकत नाही. तसेच शोभली तरी असे पुरुष सर्वांनच आवडतील असेही नाही. यांचा एक टारगेट प्रेक्षक वर्ग असतो, आणि त्यांना आकर्षित करण्यातच अश्यांना ईटरेस्ट असू शकतो. अर्थात हे प्रत्येक स्टाईल बाबत लागू..
तसेच स्टाईल फॅड नुसारही फॉलो केली जाते. त्यामुळे लेटेस्ट ट्रेण्ड काय आहे हे महत्वाचे.

Pages