http://www.maayboli.com/node/62663 पुढे -
इतक्यात फोनची रिंग वाजली...
आईच्या चेहर्यावरचे भाव झरझर बदलत होते.. काळजीची जागा आता भितीने घेतली होती. तिने पटकन रिक्षा बोलावून घेतली.
आमची रिक्षा हॉस्पिटल समोर थांबली.. समोर राजूकाका उभा होता...
आईने त्याच्याकडे संतापाने पाहिलं तसं तो म्हणाला ,"वहिनी ऐकुन तरी घ्या"
"एक शब्द बोलू नका भाऊजी.तुम्हाला आपलं समजुन सगळं सांगितलं आम्ही. तुम्ही खोटं बोललात आमच्याशी? लाज वाटते का? खोटे फोन केलेत.पळवून आणलंत माझ्या नवर्याला ? का ? कशासाठी? काय विचार केलात नेमका? चांगले चालत बोलत होते. कसेही असले तरी माणसांमधे होते ते. आता ? बेशुद्ध? आयसीयू मधे? काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? आम्हाला आधीच त्या बाबाने सांगितलं होतं की घराबाहेर गेला की हातचा गेला माणुस... कोणा कडे पासू आम्ही?" आई फाडफाड बोलत सुटली होती.
काकाने आमच्याकडे पाहिलं. म्हणाला "मुलींसमोर नको हे सगळं.. प्रिया तू प्रितीला घेऊन दुसरीकडे बैस"
"काही गरज नाहीये, तुम्ही आमच्या आयुष्यात लुदबुड करणं बंद करा" आई कडाडली. "तुमचा स्वत:चा संसार नीट झाला नाही म्हणुन तुम्ही...."
"बास वहिनी, हे सगळं बंद करा आणि माझ्या सोबत चला" काकाच्या आवाजात जरब होती... आम्ही सगळेच काका मागे गेलो..
______________________________
डॉक्टर माधुरी! नावाप्रमाणेच चेहर्यावर गोडवा. आवाज मृदु!
"काही झालं नाहीये तुमच्या मिस्टरांना ताई. घाबरू नका. शांत बसा इथे, पाणी प्या" त्या आईला सांगत होत्या. आई खुर्चीवर बसली.
"थायरॉईड..म्हणाल तर साधा आजार म्हणाल तर मोठा.. वेळेत उपचार मिलाले की माणुस अगदी ठणठणीत रहातो बघा. दुर्लक्ष करून चालत नाही" आमच्या हातात कागद देत त्या म्हणाल्या.
पुढे चार तास त्यांनी आम्हाला बाबांना नेमकं काय झालंय आणि त्यावर उपाय काय ते समजावलं.
"शरीर थंड पडणं,बेशुद्ध होणं,आवाज घोगरा होण,वजन अचानक कमी होणं, काहीही खाता पिता न येणं ही सगळी थायरॉईडची प्रायमरी लक्षणं आता तुमच्या मिस्टरांना जे काही झालंय त्याला फक्त छोट्याश्या ऑपरेशनची आणि मग औषधांची गरज आहे. त्यानंतर त्यांना कधीच काही त्रास होणार नाही"
"तुम्ही अनेक वर्षांपासून त्या जागे बदल काहीबाही ऐकत आलाय. अचानक आलेल्या स्ट्रेसने त्यांची थायरॉईड डिफिसिएन्सी ट्रिगर होणं आणि नेमकं त्याच वेळी तुम्हाला भुताबद्दल कोणी तरी सांगणं यामुळे या इतका उशीर झालाय. आपण वेळीच ट्रिटमेंट केली तर त्यांना काहीच होणार नाही. थोडा विश्वास ठेवा"
" अहो पण ते सांगतायेत ना त्यांना कोणीतरी बाई दिसली' आईने विचारलं.
"वहिनी, होळकर ब्रिज! कॉलेजकुमार आणि आर्मीवाल्यांचा अड्डा.. अर्थातच कॉल गर्ल्सचं रोजचं ठिकाण... तुमच्या डोक्यात असतं ते दृष्य तुम्हाला प्रत्यक्षात दिसतं, त्याने एकदा तरी आरशात पहायचं ना दिसतेय का ती ते"
" मग नेमकं त्याच वेळेस स्तोत्र बंद पडणं?" आई विचारात पडली होती.
" अहो किती दिवसांपासून सांगतोय तो की गाडीत प्रॉब्लेम आहे... टेप चालत नाहीये नीट. मशीन आहे ते बंद पडलं"
" आणि अमावस्या?' या वेळेला प्रश्न मी विचारला... आम्ही खरंच गोंधळून गेलो होतो.
"चंद्र बिचारा एखाद्या दिवशी सुट्टीवर जायचाच.. नेमका तो दिवस तोच असावा हा योगायोग आहे बाळा" काकाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला..
"मला भिती वाटतेय डॉक्टर... चुकलं काही आपलं तर?" आईला सगळं पटत होतं पण माणसाचं मन असच असतं.
"तुम्ही सगळे उपाय करतच आहात ना ताई? यालाही एकदा ट्राय देऊन बघायला काय हरकत आहे? इतक्या सुशिक्षित आहात तुम्ही. सगळ्याचा भुताखेता पलिकडे जाऊन विचार करून बघा की"
_______________________________________________
पुढे महिना भराने आई बाबा आल्या गेलेल्याला हा किस्सा सांगत होते. सगळे मांत्रिक तोंडात मारल्यासारखे गप्प झाले होते. काहींच्या म्हणण्यानुसार ती बाई पुन्हा येऊ शकली असती वगैरे वगैरे. पण आमच्यासमोर आमचे बाबा ठणठणीत उभे होते आणि आम्हाला झपाटलेलं 'अविचाराचं' भुत केंव्हा पळून गेलं होतं. ऑपरेशन नंतर त्यांना होणारा त्रास बंद झाला होता. आम्ही त्या घटनेपासून शहाणे झालोय. किमान या बाबतीत तरी शाहनिशा केल्यापासून आता विश्वास ठेवत नाही कारण भुतामुळे नाही पण स्वत:च्याच मुर्खपणामुळे बाबांना गमवणार होतोत आम्ही.बाबांना होणार्या त्रासाची खरंच शारिरीक त्रासाशी डायरेक्ट संबंध असू शकतो हे आम्ही पार विसरलो होतोत... घडणार्या प्रत्येक घटनेचा संदर्भ सोयीस्कर रित्या भुताशी जोडून मोकळे झालो होतोत. आधीच शारीरीक दुखणं त्यात कामाचं ओव्हर प्रेशर, अपुरी झोप आणि टेंशनचा ओव्हरडोस... शरीर आणि मन थकणारच की. त्यात असलेला एक आजार आणी त्यावर न झालेले उपचार. पण आम्ही तेच चित्र बघत होतोत जे बाकीचे दाखवत होते...
राजूकाका तेंव्हा नसता तर?
बरं एक सांगायचं राहिलं.... त्या नंतर राजु काका कुठे गेला ते कोणालाच कळालं नाही.... त्याचा आमचा कॉण्टॅक्टच नव्हता काही...
आता मागच्या ६ महिन्यांपुर्वी बाबांना तो बेळगावात असल्याचं कळालं... बाबा त्याला भेटुन आले पण हे सगळं घडलेलं त्याला आठवत नाही म्हणे... आणि गेल्या १० वर्षांपासून तो पुण्यात आलाच नाहीये हे तो शपथेवर सांगतोय.. आम्ही फार खोलात शिरत नाहीये कारण भुतांवर नसला तरी देवावर आमचा आंधळा विश्वास आहे 
** समाप्त**
______________________________________________________
मायबोलीवर बरेच भुतांचे अनुभव वाचले, भुतं, आत्मे आहेत की नाहीत यावर चर्चा करण्या इतकी मी मोठी नाही आणि ती माझी इच्छाही नाही. मला इतकंच म्हणायचंय की आपल्याला काही होत असेल तर सर्वात आधी मेडिकल हेल्प घ्या. घरगुती उतारा उतरून टाकल्याने ताप गेला वगैरे गोष्टी लॉजिकली चुकीच्या आहेत. आपल्याला सगळं माहीत असतं पण आपल्यावर वेळ येते तेंव्हा आपण आपली विचारबुद्धी गमावून बसतो. त्यात चुक कोणाचीच नाही. अगदी हा अनुभव वाचतानादेखील एकाच्याही मनात थायरॉईडचा विचार आला का? कारण आपण वातावरण निर्मितीतून बाहेत येत नाही आणि ही ह्युमन टेंडंसी आहे...अशिक्षीत लोकांबाबत मी काही करू शकत नाही पण सुशिक्षीत लोकांना भुताचा विचार करण्याअधी एक क्षण पॉज घ्यावासा वाटावा म्हणून हा सगळा कथाकथन प्रपंच! 
- प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
Rajukaka, hmm ...
Rajukaka, hmm ...

Those who Don't wanna trust can say he was just messing up with us
मी त्याच्याबद्दल जास्त काही न लिहिण्याचं तेच कारण आहे
आम्ही आमच्यापुरतं त्या घटनेला देवाची कृपा मानतोय
कोणी काहीही म्हणा पण आमचं जग श्रद्धेवरच तरुन आहे
कथा आणि शैली आवडल्याबद्दल सगळ्यांना खुप थॅंक्स..
आणखी सविस्तर प्रतिसाद नंतर लिहिन
छान शेवट.
छान शेवट.
आम्ही आमच्यापुरतं त्या घटनेला
आम्ही आमच्यापुरतं त्या घटनेला देवाची कृपा मानतोय
कोणी काहीही म्हणा पण आमचं जग श्रद्धेवरच तरुन आहे >>>
खरच माफ करा. तुम्ही दिलेल्या एका प्रतिसादावरुन राजुकाकांबद्दल, ती देलेली ट्विस्ट आहे असं वाटलं.
म्हणुन सहज बोलून गेलो.
अनुभव वाचतानादेखील एकाच्याही
अनुभव वाचतानादेखील एकाच्याही मनात थायरॉईडचा विचार आला का? >>> प्रामाणिक पणे सांगायचे तर मला वाटले होते कारण हायपर थायरॉईडचा त्रास असलेली अन त्यामुळे खुप जास्त बारीक झालेली, तुम्ही वर लिहीलेला त्रास सहन करणार्या एकीला जवळुन पाहिलेय ,.पण वजन 35-40 किलो दोन दिवसात कमी झाले हे वाचुन वाटले की ऐखादा दुसरा प्रकार असावा कदाचित कारण कुठलाही आजार ईतके जास्त वजन फक्त दोन दिवसात कमी करत नाही असे मला वाटते अर्थात तो मिर्च मसाला होता हे नंतर कळले
छान लिहलय.
छान लिहलय.
हुश्श्श्. लिखाणशैली मस्तच
हुश्श्श्.
लिखाणशैली मस्तच
मस्तच ... असा विचार पन केला
मस्तच ... असा विचार पन केला नव्हता ...
छान लिहिलसं.
छान लिहिलसं.
मस्त लिहिलेय.
मस्त लिहिलेय.
हो, म्हणजे मी ही विचार करत
हो, म्हणजे मी ही विचार करत होते की होळकर पूल भुताळी कधीपासून झाला? तिथे वर्दळ नाही, आर्मी एरीआ म्हणून पूर्वी ये जा करायला लोक घाबरत असत थोडे पण हे २००० च्या आधी. डेक्कन कॉलेजची विद्यार्थिनी असताना तर तिथे पंचक्रोशीत काही नसे तरी भुताच्या गोष्टी कधीच ऐकिवात आल्या नाहीत. उशीरा, अपरात्री त्या पुलावरून एकदोनदा मी ही गेले आहे. मित्रमंडळी तर कायम जायची यायची (९०चं दशक). आर्मीचे लोक त्रास देतील एवढीच भीती असायची....
सहज आठवले...
सहज आठवले...
आम्ही लहान असताना म्हणजे अगदी पहिली ते चौथी इयत्तेत, आमचे वडील "टेरर" होते, तर गणपतिंचे दिवसात, तेव्हाही रात्रभर मोटरसायकलवरुन आख्खे पुणे फिरवुन आणायचे दोन चार रात्री.
तर संगम ब्रीज्/होळकरु पुल वगैरे एरवी अपरिचित भाग, केवळ वडीलांनी फिरवुन आणले म्हणूनच माहित झाले.
पैकी संगमब्रीज व होळकर पुलावरुन रात्री उशीरा (१२ नंतर) गेल्याचे आजही आठवते आहे.
लिंबूटिंबू, मी सुद्धा कॉलेजला
लिंबूटिंबू, मी सुद्धा कॉलेजला असतान मित्रांसोबत बेट लाऊन रात्रीच्या वेळी बदनाम असलेल्या अंधार्या जागी फेरफटका मारून यायचो. एकदा मनातनाच ती भिती गेली तर निव्वळ पोरखेळ आहे हा

बाकी मी टेरर नाहीये. रात्रीच्या वेळी फिरताना कुत्र्यांची भिती वाटते. पण भूतांची नाही. त्यामुळे अंधाराची वगैरे भिती नाही. कोणी स्मशानात बसवून चिकन तंदूरी खाऊ घातली तर चव घेत घेत रिचवेन.. असो, ईथे हे सारे अवांतर होईल. पण यावर एक वेगळा धागा हवा. बघतो जमल्यास काढतो
हो हो, काढच धागा...
हो हो, काढच धागा...

>>>> कोणी स्मशानात बसवून चिकन तंदूरी खाऊ घातली तर चव घेत घेत रिचवेन.. <<<
बाकी यात काही विशेष नाही हं....
आता आम्ही कधीही कुठल्याही स्मशानात कुणालाबी पोचवायला जातो, तेव्हा इकडेतिकडे कुणी बघत नाही ना (म्हणजे माणसं, भुत नव्हे) ते पहात चट्टदिशी चिमुटभर तंबाखु मळून तोंडात कोंबतो..... तोवर तिकडे लाकड सरपण रचण अन भटजींचे मंत्र अन ते मडकं फोडण वगैरे चाललेले असते.... इकडे तंबाखु तोंडात ठेऊन आमची ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते.....
वरदा, नॉट शुअर तू कसं नाही
वरदा, नॉट शुअर तू कसं नाही ऐकलंस होळकर पूलाबद्दल...
अगदी आत्ता सुद्धा होळकरपुलाबद्दल बर्याच गोष्टी सांगितल्या जातात
बेट लाऊन रात्रीच्या वेळी
बेट लाऊन रात्रीच्या वेळी बदनाम असलेल्या अंधार्या जागी फेरफटका मारून यायचो. ---> भूतांसाठी असे लिहा की त्यात
कॉलेजला असे पराक्रम अनेक जणांनी केले असतील नक्कीच ह्यास मिसुद्धा अपवाद नाही. पण अज्ञानात सुख म्हणतात तसा प्रकार होता तो ! जेव्हा आपल्याला साप चावल्यास मृत्यु येवू शकतो हेच माहीती नसेल तर आपण त्याची शेपूट पकडायला सुद्धा कमी नाही करणार कारण भिती आणि साप ह्याचा संबधच मनात ठसला नाही. कॉलेज जीवनातील अनेक अचाट पराक्रम हे बहुतांश ह्याच प्रकारात येतात.
रिया, मी म्हणलं तसं त्या
रिया, मी म्हणलं तसं त्या पुलावरून हॉस्टेल ची मुलं कधीही रात्री अपरात्री जा ये करायची. कधीही कुणाला ही कसलाही अनुभव नाही. मलाही नाहीये. भीती मनात असते
आता मागच्या ६ महिन्यांपुर्वी
आता मागच्या ६ महिन्यांपुर्वी बाबांना तो बेळगावात असल्याचं कळालं... बाबा त्याला भेटुन आले पण हे सगळं घडलेलं त्याला आठवत नाही म्हणे... आणि गेल्या १० वर्षांपासून तो पुण्यात आलाच नाहीये हे तो शपथेवर सांगतोय.. ....>>>>>> हे काही आपल्याला पटले नाही...!!!
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
राजुकाकाच्याबद्दल शेवटी जे लिहिलंय त्यावर अनेकांचा आक्षेप दिसतोय...
तो ट्विस्ट मी वाचकांवर सोडतेय... तुम्ही मी म्हणते तसं श्रद्धेचं रुप द्या त्याला किंवा वर कोणी तरी म्हणलंय तसं तो आमची परिक्षा घेत असेल किंवा मस्करी करत असेल असं समजा
मला लेखक म्हणू एवढी सुट द्या की राव
वरदा, कुणाला ही कसलाही अनुभव नाही. मलाही नाहीये. भीती मनात असते >> संपुर्ण कथेचं सार एका ओळीत सांगितलंस तू
रीया छान लिहिले आहेस आणि
रीया छान लिहिले आहेस आणि शेवटचा ट्विस्ट आवडला.
पन्नास झाले की राव
पन्नास झाले की राव
राजूकाकांवरून वाद घातला असता
राजूकाकांवरून वाद घातला असता तर शंभर झाले असते ..
तरी या धाग्यात घातला नाहीस हे चांगले केलेस
आम्ही प्रतिसादांसाठी लिहित
आम्ही प्रतिसादांसाठी लिहित नाही ऋन्मेषशेठ
रिया
रिया
सुंदर लिहलस प्रिया
सुंदर लिहलस प्रिया
Pages