Submitted by सत्यजित... on 11 May, 2017 - 18:40
वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का?
बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का?
शेत आहे काळजाचा एक तुकडा पण
कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का?
वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे
तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का?
फुंकली जाते तरी गंधाळते रे ती...
जिंदगी या बायकांची,राळ आहे का?
आजही तो त्या विटेवर थांबला आहे
त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का?
—सत्यजित
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेत आहे काळजाचा एक तुकडा पण
शेत आहे काळजाचा एक तुकडा पण
कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का? >>> स्पीचलेस जबरा शेर अप्रतिम गजल
मस्त!
मस्त!
मस्त आवडली
मस्त आवडली
छान!
छान!
वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो
वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे
तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का?>>> अप्रतिम
खुप सुंदर
सुन्दर
सुन्दर
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद!
वा !
वा !
खूप सुंदर
खूप सुंदर
छान
छान
खूप छान! नांगराचा फाळ!
खूप छान! नांगराचा फाळ! अप्रतिम शेर!
निशब्द !!!!
निशब्द !!!!