फिलाडेल्फियामधले मायबोलीकर

Submitted by admin on 15 January, 2009 - 22:32

फिलाडेल्फियामधले मायबोलीकर

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आणि माझी family फेब्रुवारीपर्यंत फिलाडेल्फिया मध्ये शिफ्ट होणार आहोत १ मुलगी 3rd grade ला आणी मुलगा ४ वर्षांचा ahe zip code 19192 य़ा भागातील चांगले पब्लिक स्कूल आणि अपर्ट्मेण्टबद्दल माहिती हवी आहे कृपया मदत करा. ( इंग्रजी टंकता येत नाहीये कॉपी पेस्ट करतेय म्हणून चुका आहेत क्षमस्व )

Are you sure that is the correct zip code? It is smack in the middle of the city's business and shopping areas. There are residential apartment building near by, but I am not sure the local public schools are all that great. There are several suburban areas with great schools and easy access to public transport.

धन्यवाद मेधा
हे माझ्या नवऱ्याच्या ऑफीसचे location आहे.
मी तुम्हाला संपर्कातून mail करू का?

न्यू जर्सी , फोर्ट वॉशिंग्टनच्या आसपास मूव करायचे आहे. कोणी तिथे राहात असल्यास, इंडियन कम्यूनिटी कुठे जास्त असेल, रेंटची काय रेंज आहे, क्राइम कोणत्या एरियामधे कमी आहेत, काही माहिती मिळू शकेल काय?

न्यू जर्सी , फोर्ट वॉशिंग्टनच्या आसपास मूव करायचे आहे. >> न्यू जर्सी फोर्ट वॉशिंग्टन बद्दल माहिती नाही. पेन्सिल्व्हेनिया मधे फोर्ट वॉशिंग्टन बद्दल - भारतीय टेम्पल इथेच आहे. १० दिवसांचा गणपती, रोज संध्याकाळी कार्यक्रम होतात इतके इंडियन पॉप्युलेशन आहे. मराठी मंडळातली बरीच मंडळी देवळाच्या जवळपास रहाणारी आहेत. भारतीय डॉक्टर्स् , डेंटिस्ट्स , ग्रोसरी, वगैरे भरपूर आहेत.

http://www.paschoolperformance.org/ इथे स्कूल इंफो मिळेल. अ‍ॅम्बलर, ब्लू बेल, हॉर्शम, विलो ग्रोव्ह, ग्लेन्साइड ही आसपासची लोकेशन्स सुद्धा कंसिडर करु शकता.

रेंटची रेंज तुम्हाला Trulia किंवा झिलो वरुन शोधता येईल

रेंटल साठी प्लिमाऊथ मीटिन्ग चा विचार करू शकता. तिथे वेगवेगळे रेंटल चॉईस आहेत. अतिशय सोयीचं लोकेशन, उत्तम स्कूल्स. फोर्ट वॉशिन्ग्टन १०-१५ मिन वर. इंडियन पॉप्युलेशन बर्यापैकी.

नॉरिसटाउन मधे काही भाग चांगले आहेत . पण काही भाग एवढे खास नाहीत. तुम्ही प्रत्यक्ष जाउन एरिया पाहिल्या शिवाय काही ठरवू नका. स्कूल डिस्ट्रीक्ट सुद्धा एवढा खास नाही. जर्मन टाउन अ‍ॅव्हेन्यू च्या आसपास चांगली एरिया आहे. पण एल्म्वूड झू, किंवा मेन स्ट्रीट अव्हॉईड करा.

झटपट प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद मेधा. खरं तर, बे एरिया किंवा पेनसिल्वेनिया जिथे बचत जास्त होईल तिथे राहायचा प्लान आहे. सध्या बे एरिया मधे आहोत. तर सगळे पॅरमीटर्स चेक करत आहोत. अजुन एक माहिती मिळाली तर बर्रं होइल , पेनसिल्वेनिया मधे average एलेक्ट्रिसिटी बिल किती येते? तो एक महत्वाचा पॅरमीटर आहे. Happy

पेनसिल्वेनिया मधे average एलेक्ट्रिसिटी बिल किती येते? >> ६७ काउंटीज आणि ४.७५ मिलियन घरे आहेत हो पेन्सिल्व्हेनिया मधे . तुम्ही कुठल्या भागात रहाणार , हीटिंग सिस्टम कशी आहे - नॅअचरल गॅस / इलेक्ट्रिक / प्रोपेन, घर किती मोठं आहे , सेंट्रल एअर कंडिशनिंग की विंडो एसी , घरात दिवसभर कोणी असणार आणि त्या प्रमाणे टेम्परेचर सेटिंग असणार , प्रोग्रॅमेबल थर्मोस्टॅट असणार की नाही किती तरी व्हेरियेबल्स आहेत . तुम्ही जी काही अपार्टमेंट / घरे शॉर्ट लिस्ट कराल त्यांनाच विचारा म्हणजे जास्त स्पेसिफिक माहिती मिळेल.

मेधा,
तुम्हाला मी message केला आहे.
did yo get it?