सायबर हल्ला काय प्रकरण आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 May, 2017 - 14:16

कोणाला काही खबरबात आहे का?
आपल्याला काही भिती आहे का?
काही काळजी घेता येईल का?

आज वर्तमानपत्रात खालील बातम्या वाचल्या -
जगभरातील 74 देशातील संगणक हॅक करून ठप्प केले.
ब्रिटनची आरोग्यसेवा पुर्ण कोलमडली.
हॅकर्सनी केली खंडणीची मागणी.

आताच व्हॉटसपवर हा मेसेज वाचला.

Massive Ransomeware attack...Total 74 countries affected...Please do not open any email which has attachments with *"tasksche.exe"* file. Please send this important message to all your computer users

खरेच असे काही आहे का? या गोष्टीतले ज्ञान नसल्याने काय खरे काय खोटे हे आपल्या बुद्धीने पडताळणे अवघड झालेय.

प्रगत देशांची अशी स्थिती आहे तर आपले काय??

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाचा, तुम्ही छान माहिती देत आहात, कृपया या विषयावर एक स्वतंत्र धागा किंवा मालिका लिहायला जमलं तर नक्की करा हि कळकळीची विनंती.

भाचा आणि आरारा चांगली माहिती. धन्यवाद Happy

ऋन्मेष , यातली निवडक माहिती तुझ्या धाग्यात अपडेत करता आली तर बघ. उपयोगी पडेल.

मला तर वाटते प्रतिसादात माहिती विस्कळीतरीत्या येत असेल तर भास्कराचार्यांनी वेगळा धागा काढून त्यात रेकॉर्डला ठेवणे योग्य. पुढची चर्चाही तिथे करता येईल. माझ्यासाठी यातल्या सण्कल्पनाच वेगळ्या असल्याने मी निव्वळ कॉपीपेस्टपेक्षा फार काही करू शकत नाही. आणि ते देखील सध्या लॅप्टॉप हाताशी नसल्याने टू जी नेटवर्कवाल्या मोबाईलवर असल्याने त्रासदायकच.

माहीती बाकी खरेच छान. अपेक्षेपेक्षा फार. यातले माझ्याएवढेच कळत असलेल्या माझ्या गर्लफ्रेण्डलाही माझ्या मोबाईलवर हा धागा वाचायला दिला आज. त्याबद्दलही धन्यवाद Happy

वाह मस्त धागा... चांगली माहिती मिलली... उगाच लोक नाव ठेवतात रुंमेश ला..
जलके कुचके लोक

जाई, इनकॉग्नीटो मोड वापरून काही करणे हे मांजेरीने डोळे मिटून दूध पिण्यासारखं आहे.
सेक्युरिटीच्या प्रीसिपल्सनुसार,फॉल्स पर्सेप्शन इज वर्स.

आरारा चांगली माहिती!!

मला तर त्या BitCoin चाच गेम वाटतोय सगळा. त्यांचा धंदा काही नीट चालेना मग BitCoin लोकांनी घेण्याकरता काय करता येईल? असा विचार करुन हा अ‍ॅटॅक झाला असावा. तसेही जगातले अनेक AntiVirus चालण्याकरता त्याच कंपन्यांच्या सबसिडी कंपन्या व्हायरस बनवतात.

मला तर त्या BitCoin चाच गेम वाटतोय सगळा. त्यांचा धंदा काही नीट चालेना मग BitCoin लोकांनी घेण्याकरता काय करता येईल? >>>> Uhoh
आज बिटकॉईनचा रेट माहीत आहे का ? १ बिटकॉईन = १ लाख रुपये इतका प्रचंड रेट आहे. एवढा मोठा धंदा असताना अशी चिंधीचोरी करण्याची गरज काय? आणि बिटकॉईनचा वापर रोजच्या वस्तू दुकानातून विकत घेण्यासाठी होत नाही. मोठ मोठ्या कॅसिनो, हवाला, इ. व्यवहारात त्यांचा वापर प्रामुख्याने केला जातो.

आज बिटकॉईनचा रेट माहीत आहे का ? १ बिटकॉईन = १ लाख रुपये इतका प्रचंड रेट आहे>> Exactly. मग एखाद्यल्ला जर बिटकॉईन द्यायच्या असतील हॅकरला तर त्याला तेव्हढा बुर्दंड पडेल ना. असो. मी एक शक्यता मांडली फक्त. फार मनावर घेऊ नका.

तुम्हाला फक्त मी "त्यांचा धंदा चालत नाही" यावर उत्तर दिले. मुद्द्याला मुद्यावरुन उत्तर दिले आहे. ते मनाला लावून घेऊ नका हा फुकाचा सल्ला स्वतःकडे ठेवावा

_/\_

जाणकार लोक्स,

मी असे वाचले कि नेहमीचे अ‍ॅन्टीवायरस सॉफ्टवेअर हे रॅनसमवेअर ला अटकाव करु शकत नाहीत. हे खरे आहे काय?
कारण अनेक अ‍ॅण्टी-वा साइट्सवर ते लोक जे फ्री वॅक्सिन देत आहेत ती उगाच मनाचं समाधान करणारी आहेत असे ते छोट्या फॉण्टमध्ये स्वतःच लिहित आहेत.

माझा प्रश्न असा आहे की अ‍ॅन्टी-वायरस सॉफ्टवेअरमध्ये रॅन्समवेअरला थोपवण्याचे बळ आहे काय, असेल तर कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये ते आहे?

आज धागा नीट वाचला. या प्रकारांबद्दल , सिक्युरिटी वगैरेबद्दल माहिती छान मिळाली. खुप कमी माहिती होते याबद्दल.

माझ्या 16 वर्षाच्या कम्प्युटर करियर मध्ये VIRUS आणि ANTIVIRUS टूल याचे विश्लेषण करायचे म्हंटले तर साधे सोपे लॉजिक आहे , आपल्याकडे doctors , औषधे, आजार याचा जो सुयोग्य आर्थिक संगम आहे त्याच लॉजिक वर कम्प्युटर वायरस (अॅंटीवायरस कंपनी )काम करते.
सर्वसामान्य माणूस हा अलगद त्यांच्या जाळ्यात सापडतो. मग काय घ्या आमचे औषध......
हॅकिंग हे स्वताच्या केलेल्या चुकी मुळे होते , जगातला कुठलाही हॅकर हा तुमचा डेटा घेऊन त्याला काय फायदा होणार आहे का असा विचार करत असेल ? त्यामुळे हकिंग ची भीती सामान्य माणसांनी मुळीच बाळगू नये. फक्त काही डिसीप्लीन हे पळावेच लागतात. जसे ओटीपी, मोबाइल no एसएमएस, बंकिंग पासवर्ड इत्यादि.
परत डॉक्टर लॉजिक लक्षात ठेवा.

Pages