सायबर हल्ला काय प्रकरण आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 May, 2017 - 14:16

कोणाला काही खबरबात आहे का?
आपल्याला काही भिती आहे का?
काही काळजी घेता येईल का?

आज वर्तमानपत्रात खालील बातम्या वाचल्या -
जगभरातील 74 देशातील संगणक हॅक करून ठप्प केले.
ब्रिटनची आरोग्यसेवा पुर्ण कोलमडली.
हॅकर्सनी केली खंडणीची मागणी.

आताच व्हॉटसपवर हा मेसेज वाचला.

Massive Ransomeware attack...Total 74 countries affected...Please do not open any email which has attachments with *"tasksche.exe"* file. Please send this important message to all your computer users

खरेच असे काही आहे का? या गोष्टीतले ज्ञान नसल्याने काय खरे काय खोटे हे आपल्या बुद्धीने पडताळणे अवघड झालेय.

प्रगत देशांची अशी स्थिती आहे तर आपले काय??

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या आठवड्याभरात माबो जवळपास रोज एकदातरी डुबकी मारत आहे,
हा पण व्हायरस चा परिणाम म्हणायचा कि इमेर्जेन्सी मेंटेनन्स म्हणायचा?

ऋन्मेष, आजच्या पेपर ला बातमी आहे देशातील जवळपास 70%atm मशीन xp वर चालतात, आणि हि सगळी मशिन्स vlnrable आहेत,
प्रॉब्लेम is much more serious,

या ऍटॅक रोखण्यासाठी किल स्विच(?) बनवला गेला आहे. म्हणून नवीन ऍटॅक कमी झालेत अशी माहिती ती बातमी देत होती

गेल्या आठवड्याभरात माबो जवळपास रोज एकदातरी डुबकी मारत आहे, >>> ह्म्म्म . बर्‍याचदा वाटलं तसं .

हल्लिच न्यूयॉर्कच्या एका जवाहिर्‍याच्या संगणकावर एक हल्ला झाला.
अचानक Server वर असलेला सगळा Data एका वेगळ्याच Key ने Encrypt केला गेला.
पोलिस , FBI ला बोलावण्यात आले पण काही उपयोग झाला नाही.
या प्रकारात काम करणारे २/३ Software expert बोलावले होते, त्यानाही काही करता आले नाही.
हल्लेखोराने १२ तासाच्या आत एक खण्डणी रक्कम BitCoins च्या स्वरूपात मागितली होती. आणि उशीर झाल्यास तासातासाला ती रक्कम वाढणार होती. धन्द्यावर त्याचा होणारा परीणाम बघून त्या जवाहिर्‍याने ती मागणी मान्य केली.
मध्यरात्री मलेशियामधे एक BitCoin Dealer मिळाला. त्याला डॉलर पाठवून BitCoins खरेदी केले, आणि ते त्या हल्लेखोराच्या खात्यात जमा केले. त्यानंतर त्याने ई-मेल मधून ती Encryption Key पाठवली, आणि Data Decrypt करता आला.
हे सगळे एक ई-मेल उघडल्यामुळे झाल्याचे लक्षात आले.
आता यापुढे जर FBI च्या सायबर सेल ला शक्य झाले तर कदाचित ६-७ महिन्यात पत्ता लागेल. पण तोपर्यंत हल्लेखोर रक्कम घेऊन गुल झालेला असेल..
(तिथे काम करणार्‍या एका शेजार्‍याने 'आंखो देखा हाल' सांगितल्याने माझा विश्वास बसला.. म्हणून इथे लिहितोय...)

बाप्रे!
आता आयटी मधे काम करूनही मला काही प्रश्न पडलेत... इफ यू कॅन हेल्प -
१) डेटा इतर कुठे तरी बॅक्ड अप असेलच ना? अर्थात बॅक अप रोज घेतले जात नाहीत पण जात असतील तर त्या लोकांनी घाबरायचं कारण नाहीये का?
२) या डेटाच काय गैरवापर होऊ शकतो? बँक वगैरे बद्दल मला माहीत आहे पण वरच्या उदाहरणात जवाहिर्‍याच्या डेटाचं हॅकर्स काय करणार? किंवा युकेच्या हॉस्पिटलच्या डेटाचं काय करणार?
३) पर्सनल कंप्युटर्स वर डायरेक्ट ईफेक्ट काय आहे?
४) मायबोलीसुद्धा अफेक्ट होऊ शकते का ?

भयंकर आहे.
रीया , डेटाचा प्रचंड गैरवापर केला जाऊ शकतो , तुमचे फायनांशिय्ल ट्रांसॅक्शन्सचे डिटेल्स , बँक डिटेल्स , त्यांच्या लाखो कस्टमर्सचे डिटेल्स आणि त्यांचे संभाव्य बँक अकाऊट हॅक होण्याचे चान्सेस , आणि सगळ्यात महत्वाचं कंपनी / ऑर्गेनायझेशनचे रेप्युटेशन धोक्यात येऊ शकत.

हा अ‍ॅटॅक रॅन्समवेअरचा आहे, जे डेटा डिस्ट्र्कशन, ब्रीच आणि स्टिलिंग करणार्‍या पेक्षा वेगळे आहे.
ते लोक तुमचे घर लुटत नाहीयेत तर तुमच्या घराला त्यांचे स्वतःचे भरभक्कम कुलूप घालून तेच कुलूप ऊघडून देण्यासाठी फी/खंडणी मागत आहेत.

भारतातील ९०% पेक्षा जास्त एटीएम मधे विंडो एक्स्पी वापरले जाते. त्यामुळे त्यांना जास्त धोका आहे. तो व्हायरस नेमका एक्स्पीवाल्यांना जास्त इफ्फेक्ट करत आहे. मुंबईतील सर्वर प्रोवाईड करणार्‍या कंपनींना सुध्दा या व्हायरसचा फटका बसला आहे. बँक, एटीएम इ. सेवांना आवश्यक असणारे सर्वर हे या कंपन्या उपलब्ध करून देतात.
रिझर्व बँकेने सर्व एटीएम बंद ठेवायला सांगितले आहे आणि लवकरात लवकर ते अपडेट करण्याचे आदेश दिले आहे.

१. त्या व्यक्तिला बॅकअप बद्दल फारशी माहिती नव्हती, पण बाकी 'श्रि' ने वर लिहिले आहे.
३. शक्यतो Personal Comp वर असलेला Data तेवढा महत्वाचा असेलच असे नाही. पण तिथेही असे होऊ शकते.
शक्यतो ज्या Data चा इतर ठिकाणी वापर होऊ शकतो, त्यावर हल्ला होऊ शकतो..

हा अ‍ॅटॅक रॅन्समवेअरचा आहे, जे डेटा डिस्ट्र्कशन, ब्रीच आणि स्टिलिंग करणार्‍या पेक्षा वेगळे आहे.
ते लोक तुमचे घर लुटत नाहीयेत तर तुमच्या घराला त्यांचे स्वतःचे भरभक्कम कुलूप घालून तेच कुलूप ऊघडून देण्यासाठी फी मागत आहेत.
>>
एक्झॅक्टली.... म्हणुनच वरचे प्रश्न पडलेत मला

रीया , डेटाचा प्रचंड गैरवापर केला जाऊ शकतो , तुमचे फायनांशिय्ल ट्रांसॅक्शन्सचे डिटेल्स , बँक डिटेल्स , त्यांच्या लाखो कस्टमर्सचे डिटेल्स आणि त्यांचे संभाव्य बँक अकाऊट हॅक होण्याचे चान्सेस , आणि सगळ्यात महत्वाचं कंपनी / ऑर्गेनायझेशनचे रेप्युटेशन धोक्यात येऊ शकत.
>>
यातला रेप्युटेशनचा मुद्दा काही क्षण बाजुला ठेउयात.
वरती परदेसायांनी जो मुद्दा मांडलाय - खंडणी मागितली आणि मग डिस्क्रिप्ट करणार डेटा... त्यामधेही हॅकर्सकडे डेटा रहाणारच की.... मग खंडणी देऊन उपयोग काय?
डेटा नुसता लॉक करत असतील तर ज्यांच्याकडे रोज डेटा बॅक अप घेतला जातो त्यांनी घाबरू नयेच का?
मग नॉन ऑफिशिअल कामांसाठी वापरला जाणारा डेटा कोणी का स्टिल करेल? पर्सनल कामांसाठी कंप्युटर वापरणार्‍यांनी घाबरू नयेच का?

त्या व्यक्तिला बॅकअप बद्दल फारशी माहिती नव्हती, पण बाकी 'श्रि' ने वर लिहिले आहे.
>>
या केस मधेच असं नाही... इन जनरल सुद्धा...

माझ्या क्लायंट्चा डेटा डेली बॅकप होतो (अर्थात आमची बँक आहे त्यामुळे डेटा मॅटर्स... पण इन जनरल)

युके मधे दवाखान्याच्या डेट्याचा नक्कीच बॅकअप असेलच की

पर्सनल कामांसाठी कंप्युटर वापरणार्‍यांनी घाबरू नयेच का? >>> फारशी उपयुक्त माहीती नसेल तर कदाचीत नाही. पण अशा केसेस खुप कमी असतील. आणि हॅक करणारे माणुस / ऑरगनायझेशन बघुनच करतील ना . ते तरी का उगाच वेळ वाया घालवतील.
नुसता बॅकअप असुन काय उपयोग जेव्हा तुमची पुर्ण सिस्टमच हॅक झालेली असते.

फारशी उपयुक्त माहीती नसेल तर कदाचीत नाही. पण अशा केसेस खुप कमी असतील. आणि हॅक करणारे माणुस / ऑरगनायझेशन बघुनच करतील ना . ते तरी का उगाच वेळ वाया घालवतील.
>>
एक्झेक्टली! मलाही तेच वाटत होतं. अनलेस वी आर अंबानीज Proud

नुसता बॅकअप असुन काय उपयोग जेव्हा तुमची पुर्ण सिस्टमच हॅक झालेली असते.
>>
वेल सिस्टम हॅक म्हणजे आपण लॉक टू डेटा म्हणत असू तर खंडणी देण्यापेक्षा डेटा दुसरीकडे रिस्टोर करणं सोप्पं नाही का?

माझे प्रश्न फार बालिश असतील कदाचित पण मला खरच पडलेत

यातला रेप्युटेशनचा मुद्दा काही क्षण बाजुला ठेउयात. >> हाच तर सगळ्यात मोठा मुद्दा आहे. डेटा हॅक/ ब्री/ खंडणी चे नुकसान टेम्पररी असते. आजकाल ते भरून काढण्यासाठी कंपन्या ईमर्जन्सी फंडस ही ठेवतात. पण रेप्युटेशन मुळे फ्युचर बिझनेस लॉस, काँपिटिटिव एज गमावणे म्हणून नोकर्या कमी कराव्या लागणे हे नुकसान जास्तं मोठे आहे.

मग खंडणी देऊन उपयोग काय? >>
डेटा आणि सिस्टिम मध्ये गल्लत होत आहे.
जर घरात चोरी करता आली असती तर चोर स्वतःचे कुलूप घालून वर घरात जाऊ देण्यासाठी खंडणी कदाचित मागणार नाही (अशी अपेक्षा). लॉजिकली त्याला चोरी करता आली नाही म्हणून त्याने हे केले असे मानतात (चोरी झाली नाहीये हे कन्फर्म केल्यानंतर), म्हणून 'रॅनसम वेअर' आहे, डेटा हॅक नाही.
पुन्हा सिस्टिम बसल्याने डे टू डे बिझनेस ठप्प होणार तो सुरळीत करण्यासाठी खंडणी दिली जाते. आधी म्हणालो तसे डेटा ब्रीच नाहीये तर तुम्हाला फक्तं तुमचे घर्/दुकान ऊघडून देण्यासाठी खंडणी मागत आहेत. ती दिली की बिझनेस अ‍ॅज युज्वल.
ईडिविजुअल लेवल वर हे फार रेग्युलर होते, पण एवढ्या मास लेवलवर पहिल्यांदाच झाले. ईडिविजुअल लेवल जनरली $२००-३०० मध्ये काम होते.

श्री एग्झ्क्टली ऊलट आहे. मोठ्या ऑर्गनाझेशनला रॅनसमसाठी ओलीस ठेवून ऑथोरिटिझ चे अटेंशन ओढवून घेण्याची रिस्क सहसा लोन -वुल्फ हॅकर्स घेत नाहीत. ह्या ऊलट चार-पाच पर्स्नल कॉप्युटर युजर्सकडून काही शे डॉलर्स घेवून सोडून दिलेले जाते. सॉफ्ट टार्गेट्स, लो हँगिंग फ्रुट्स.
आणि मजा म्हणजे डिक्रिप्ट्शन की तुमच्याच कॉप्युटर वर हिडन असते . You only need to know where to look.
पण हे मास लेवलवरचे काही तरी सिरियस प्रकरण आहे. डेस्परेट टाईम्स डेस्परेट मेझर्स टाईप्स Lol

आयटीतले दिग्गज माबोवर असूनही इथे गमतीदार प्रतिसाद वाचून माझ्यासारख्या हौशी कलाकाराला लिहावे लागत आहे. मी हा अ‍ॅटॅक झाल्याच्या काही तासांआत पासून हे फॉलो करतो आहे.
तर, एकंदर प्रकरण काय आहे व काय झाले, करता येईल इत्यादि, माझ्या आकलना नुसार.

१.
रॅन्समवेअर म्हणजे काय?

हा एक व्हायरस/ काँप्युटर प्रोग्राम आहे. जुने व्हायरस आपला डेटा/काँप्युटरमधील फाईल्स करप्ट करून नष्ट करीत असत. व नुकसान केले यात त्या 'हॅकर'ला समाधान वाटत असे.

रॅन्समवेअर, व्हायरसच आहे, पण हा फायली नष्ट न करता, त्यांना एन्क्रिप्ट करून ठेवतो. जेणेकरून तुम्हाला तुमचाच डेटा वापरता येत नाही. त्यांनी सांगितलेल्या अकाउंटवर पैसे जमा केल्यावर एक 'चाबी' मिळते, जी वापरून तुमचा डेटा पूर्ववत होतो. यासाठी आधी तुमची खात्री पटावी म्हणून एक फाईल ऑनलाईन डिक्रिप्ट करून दाखवतात. पैसे बिटकॉइन मधे घेतात.

सध्याच्या "WannaCry" (wanacrypt0r 2.0 हे अ‍ॅक्चुअल नाव) व्हायरसला ३००$ पहिली व नंतर जसा जसा उशीर होईल तशी वाढवून खंडणी मागितली गेली होती.

हा व्हायरस 'वर्म' प्रकाराने पसरत होता, व त्याच्या प्रसारासाठी युजर अ‍ॅक्शन जरूरी नव्हती. बाधित WiFi नेटवर्कशी जोडताच हा व्हायरस तुमच्या मशीनमधे येत होता. मशीन्=अमुक आज्ञाप्रणाली वापरणारे यंत्र. त्यासाठी त्याला ब्ल्यूस्क्रीन येणारा लॅप/डेस्क्टॉप असणे गरजेचे नाही. एटीएम मशीन हे उदाहरण.

२.
व्हायरस आला कुठून?

NSA : National Security Agency यांनी विंडोजमधे असलेल्या तृटी वापरून हल्ले कसे करता येतील याबद्दल शोधून ठेवलेल्या कमजोर्‍या कुण्या एका हॅकरग्रूपने चोरून पब्लिश केल्या. या तृटी सहज चोरीस गेल्या कारण त्या बेसिकली विंडोज एक्सपी, या मायक्रॉसॉफ्टने ८ एप्रिल २०१४ पासून 'सपोर्ट डिसकंटिन्यू' केलेल्या व्हर्जनसाठीच्या होत्या. त्यावरून ह्या वॉन्ना क्रायची निर्मिती केली गेलेली आहे

विंडोज ७ पासुन पुढे असलेल्या सर्व विंडोजसाठी मायक्रोसॉफ्टने सिक्युरिटी पॅच अपडेट केलेला आहे, तो इन्स्टॉल्ड असेल तर अडचण नाही. म्हणजे आपोआप हा जंतू येणार नाही. अर्थात, तुम्ही नको त्या ईमेल उघडून किंवा नको त्या साईटवर जाऊन नको तिथे टिचकले, तर काय खरं नाही.

या प्रकरणाबद्दल व त्यातील NSA च्या सहभागाबद्दल मायक्रोसॉफ्ट प्रेसिडेंट ब्रॅड स्मिथ यांचे वक्तव्य इथे : http://www.latimes.com/world/europe/la-fg-europe-computer-virus-20170514...

३.
इंग्लंड्ची राष्ट्रीय हेल्थकेअर सिस्टिम यातून डॅमेज झाली. याचे कारण त्यांचे कॉम्प्युटर्स Win XP वापरतात.
हीच परिस्थिती भारतातील ATM मशीन्सची आहे. (हे नोटबंदीच्या वेळी स्पष्ट झाले होते.)
मायक्रोसॉफ्ट अजूनही काही वर्षे स्पेशल काँट्रॅक्ट करून एक्सपीला सपोर्ट देते आहे, पण आपण, वा ब्रिटिश हेल्थकेअरने असा करार केलेला नाही.

माझी स्वतःची सिस्टीम XP वर आहे, व इतर मेडिकल सॉफ्टवेअर्सशी काँपॅटिबिलिटी हा त्यात मोठा इश्यू आहे. नव्यावर अनेकानेक मशिन्स शिफ्ट करणे अशक्य आहे. त्यामुळे माझे संपूर्ण नेटवर्क मी २ दिवस ऑफलाईन ठेवले होते, व बॅकप्स अद्यावत होते, कधीही पूर्ण फॉर्मॅट करून पुनः इन्स्टॉल करायची तयारी, दर ३ तासांची ठेवली, पेपर बॅकप ठेवला. हे छोट्या सेटपमुळे शक्य झाले. (हे अवांतर.)

४.
हॅकर अमुकच लोकांना टार्गेट करतात असे नेहेमीच नसते. हा वर्म रँडमली फिरतो आहे. त्याने स्पेसिफिक कुणालाही टार्गेट केलेले नाही. हेल्थकेअर सिस्टीम अ‍ॅटॅकमुळे अनेक जीव धोक्यात आले व त्यामुळे हा हॅकर टेररिस्ट कॅटॅगरीत जाउन बसलेला आहे. सध्या प्रचण्ड घाबरलेला असेल बिचारा. रॅन्सम कॅल्क्युलेशन्सनुसार ६ आकड्यातही त्याचं कलेक्शन गेलेलं नाही. शेवटची बातमी मी वाचली तेव्हा काहीतरी २०-३० हजार डॉलर वर होता.

५.
(क्रमशः थोड्या वेळात इथेच अपडेट करतो. अर्जंट पे....)
किल स्विच :

हॅकर्स (कधीकधी) त्यांच्या प्रोग्रामवर कंट्रोल ठेवयासाठी त्यात काही 'किल स्विच' ठेवतात. या व्हायरसचे सोर्सकोड सोडवायचा प्रयत्न करणार्‍या कुण्याएकाला अपघाताने त्यात एक URL सापडली, जिचे डोमेन रजिस्टर्ड नव्हते. याने ते डोमेन रजिस्टर केले. नंतर गम्मत अशी झाली, की हा व्हायरस आटोक्यात आला.

एन्क्रिप्शन एक्झिक्यूट करण्या आधी, हा व्हायरस इंटरनेटवर ते डोमेन अ‍ॅक्सेस करण्याचा प्रयत्न करीत होता. डोमेन न सापडल्यास एन्क्रिप्शन अल्गोरिदम एझिक्यूट होई, डोमेन सापडल्यावर व्हायर्स आपोआप मरून पडू लागला. डोमेन रजिस्टर केल्याबरोब्बर मिनिटाला शेकडो हिट्स येऊ लागल्या होत्या.

६.

या व्हायरसची मूळ आवृत्ती जरी किलस्विचवाली असली, तरी त्याचे 'व्हेरियंट्स' अजूनही फिरते असू शकतात.
विंडोज ७ पेक्षा जुनी आवृत्ती वापरणार्‍यांना/ अपडेट इन्स्टॉल न करणार्‍यांना प्रॉब्लेम अजूनही येऊ शकतो.
नको त्या ईमेल अ‍ॅटॅचमेंट्स न पाहणे, अनोळखी मेल्स न उघडणे हा पहिला इलाज आहे.
आपला संपूर्ण डेटा बॅकप ठेवणे, तो एकावर एक न लिहिता, वेगवेगळ्या दिवसांचा वेगवेगळा ठेवणे, (कारण एन्क्रिप्शन केले, ही फाईल अद्यावत केल्याची खूण समजून ऑटो बॅकप जुनी चांगली फाईल एन्क्रिप्टेड फाइलने ओव्हरराईट करेल. {श्या, इंग्रजी गंडलंय}) हा महत्वाचा इलाज आहे.

सध्यातरी हा अ‍ॅटॅक नियंत्रणात आलाय अशी बातमी आहे. तेव्हा डोन्ट पॅनिक. आयॉस/अँड्रॉइड वर हा वर्म काम करणार नाही, कारण बेसिकली हे विण्डोज एक्स्प्लॉइट आहे, असे माझे वाचन व अल्पज्ञान सांगते.

***

माबोवरील सिक्युरिटी एक्स्पर्ट्सच्या कॉमेण्ट्सच्या प्रतिक्षेत.

हे या प्रकरणाचे विकिपेडिया.

आज व्हाट्स अप वर online transaction करू नका असे मेसेजेस फिरत आहेत. मला online पद्धतीने एक पेमेंट करायचं आहे.आता हे वाचून कधी करू अशी भीती वाटायला लागलीये .लास्ट डेट १८ ची आहे Uhoh

छान प्रतिसाद आरारा. व्यवस्थित समजावून सांगितलंत. क्रमशः संपण्याच्या प्रतिक्षेत.

रीया,
बॅकअप रिअललटाईम असतो तेव्हा एन्क्रिप्ट झालेला डेटाही बॅकअप होतो आणि दोन्हीकडचा डेटा जातो. तेव्हा ऑफलाईन बॅकप रिस्टोअर करावा लागतो जो बहूतेकदा टेप ड्राईववर असतो. पण त्यात मधल्या काळात केलेले काम मिळत नाही. त्यामुळे बॅकप असणे १००% फायदा देईलच असे नाही.

बऱ्याच लोकांचा तर सध्या असा कयास आहे की अपग्रेड करण्यासाठी व पायरसी रोखण्यासाठी मायक्रोसॉफ्टनेच हे केलं असावं. अर्थात अशी पाऊलं उचलण्यासारखा मुर्खपणा ते करणं अजिबात शक्य वाटत नाही.

आ. रा. रा. धन्यवाद. खुप चांगली माहिती.

जाई प्रत्येक online transaction मध्ये जोखिम असते. पण ह्या वायरसचा आणि online transaction चा काही संबध नाही असे मला तरी वाटते.

बऱ्याच लोकांचा तर सध्या असा कयास आहे की अपग्रेड करण्यासाठी व पायरसी रोखण्यासाठी मायक्रोसॉफ्टनेच हे केलं असावं.
<<
मी जुना व बेसिक मायक्रोसॉफ्ट हेटक्लब सदस्य असल्याने हे माझ्याही डोक्यात आलं होतं. पण, तुमचं दुसरं वाक्य बरोबर वाटतं.

सोनू.
तुम्ही मोठ्या आयटीकंपनीत, सिक्युरिटी क्षेत्रातल्या तज्ञ आहात, तस्मात तुमचे इन्पुट महत्वाचे आहे. जनरल पब्लिकचे पॅनिक डिफ्युज करण्यासाठी का होईना, थोडा वेळ काढून लिहा ही विनंती.

आ.रा.रा.

मागे नोटबंदी झाली होती तेव्हा मी लगेचच नोटा बदलून घेण्याची घाई न करता काही दिवस जुन्या नोटा चालविल्या होत्या तेव्हा तुम्ही त्यावर टीका केली होती. आता एक्स्पी बंद झाली असता तुम्ही तीच सिस्टीम वापरणे म्हणजे तसाच प्रकार नव्हे का?

मी सिस्टीम अपडेट न करण्यावरही टीकाच करतो आहे, हे तुमच्या लक्षात येतंय का?

की आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा? नोटबंदी धागा वर आणा, झिम्मा तिकडे खेळू. इथे इथलं बोलूया.

आरारा, चांगली माहिती.

साहिल , आज सकाळपासून इतके मेसेजेस आलेत online trasanction करू नका कि कोणतीच साईट ओपन केली नाहीये घाबरुन . NEFT पेमेंट करायचं आहे पण मनात भीती आहे Happy

{{{ मी सिस्टीम अपडेट न करण्यावरही टीकाच करतो आहे, हे तुमच्या लक्षात येतंय का? }}}

चला म्हणजे तुम्हीही कधीतरी काहीतरी चूकीचं केलंत हे मान्य आहे तर (तेव्हा मायबोलीचे सिनीयर ऋन्मेष म्हणणार नाही तुम्हाला). मग काही इश्यू नाही. चालूद्यात.

Pages