प्रवेशिका - २० ( vaibhav_joshi - कुठून आला ठराव... )

Submitted by kaaryashaaLaa on 5 October, 2008 - 23:53

कुठून आला ठराव की दर्वळलोसुध्दा नाही?
अरे इथे तर अजून मी सळसळलोसुध्दा नाही!

उगा भिडवली नजर जगाच्या अथांग डोळ्यांशी मी
असा हरवलो पुन्हा मला आढळलोसुध्दा नाही

मला तरी शांत वाटले फुंकरीत एका विझलो
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही

किती ठिकाणी तरी सुखाचे वळण लागले होते
निघून गेलो पुढे सरळ, अडखळलोसुध्दा नाही

हजार घावांतुनी तुझा घाव ओळखीचा दिसला
वठून गेलो उभ्या उभ्या , कोसळलोसुध्दा नाही

भलेबुरे अर्थ केवढे सांगतेस सार्‍यांपाशी
तरी बरे मी तुला पुरेसा कळलोसुध्दा नाही

कधीतरी समजले मला हा प्रवाह माझा नाही
निमूट वाहून लोपलो , खळखळलोसुध्दा नाही

तुला कशा एवढ्यात दिसल्या हजार पापी प्रतिमा
अजून अश्रू बनून मी ओघळलोसुध्दा नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तरी शांत वाटले फुंकरीत एका विझलो
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही

भलेबुरे अर्थ केवढे सांगतेस सार्‍यांपाशी
तरी बरे मी तुला पुरेसा कळलोसुध्दा नाही

अहाहा.. क्या बात है...म़जा आया.. ९ गुण..

मला तरी शांत वाटले फुंकरीत एका विझलो
तुलाच हळहळ उरेल की तळमळलोसुध्दा नाही
वाव्वाव्वा..

किती ठिकाणी तरी सुखाचे वळण लागले होते
निघून गेलो पुढे सरळ, अडखळलोसुध्दा नाही
वावाव्वा... अगदी सहज...

हजार घावांतुनी तुझा घाव ओळखीचा दिसला
वठून गेलो उभ्या उभ्या , कोसळलोसुध्दा नाही
वाव्वाव्वा..

भलेबुरे अर्थ केवढे सांगतेस सार्‍यांपाशी
तरी बरे मी तुला पुरेसा कळलोसुध्दा नाही
वाव्वा..

माझ्यामते सगळेच शेर छान आहेत. पण वरील चारही शेर सुरेख झाले आहेत. गझल एकंदर भरघोस आणि चांगली झाली आहे.

मस्त. पण मलाही मतला नीटसा कळला नाही.
६ गुण.

२००८ मधली वैभवची गझल व आज तो फेसबुकच्या हाफिसात संदिप खरे सोबत इर्शाद चा कार्यक्रम करतोय. वाह क्या बात!! वैभवा ७ ८ वर्षातली तुझी प्रगती आचंबीत करणारी आहे. जियो!! असाच यशाची शिखरे सर करत रहा!! Happy

Pages