प्रवास अगम्य दिशेने (अगम्य भाग २)

Submitted by खुशालराव on 15 May, 2017 - 04:04

रवी:-
निता तब्बल ७ महिन्याने शुध्दिवर आली होती. पण शुध्दिवर आल्या आल्या थोड्यावेळ निता काहीशा संभ्रमात दिसली होती. खर तर निता माझी मोठी बहीण, तिची तीव्र बुध्दी, बोलण्यात एक प्रकारच माधुर्य पण काहीशी एकांतप्रिय जितकी विनोदी तितकीच गंभीर असा स्वभाव असल्याने तिला सर्वांची मिळणारी वाहवाही याचा मला खुप हेवा वाटायचा. निताला जेवढी विज्ञानाची आवड तितकीच आध्यात्माची ओढ आहे. तशी ती काहीशी विज्ञानवादी असल्यामुळे तिचा कर्मकांड वगैरे वर विश्वास नाही म्हणा..! पण तिला योगशास्त्रावर प्रचंड विश्वास आहे.
तिच्या १० वीच्या परीक्षेनंतर सुट्टीत १५ - २० दिवसाच्या कसल्यातरी शिबिरात गेली होती तिथून जेव्हा परत आली त्यावेळेस ती काहीशी बदलल्या सारखी वाटत होती. म्हणजे तिचा एकलकोंडेपणा खुपच वाढला होता तिचे कामे, कॉलेज व आईला हवी नको ती मदत करून झाली की तिचा उरला सुरला सगळा वेळ ती घराजवळच्या शेतातल्या एका झाडाखाली बसून राहिलेली असायची. आई तिला कीतितरी वेळा रागवलि होती पण... पण कुणी सांगुन ऐकेल ती निता कुठली..!
मागच्या दीड दोन वर्षांपासून तीचा एकलकोंडेपणा बऱ्यापैकी कमी झाला आहे. बारावी नंतर तीने शाळा सोडून आईला घरात व मला मी नुकत्याच चालवायला घेतलेल्या आमच्याच दूकानात खुप मदत करू लागली होती. तिचा स्वभावात आलेला मनमोकळेपणा बघुन आई सुखावली होती. तीने निता च्या लग्नासाठी स्थळे बघायला सुरुवात केली होती. ४ दिवसांनी तीला बघायला येणार होते आणि त्या दिवशी ती घटना घडली होती..!

**
सुमनबाई :-
निता ला काय झाल होत कुणास ठाऊक. तशी माझी पोर लय गुणाची हाय. कदी मदी वागतीया जरा आकरीत पण विचारी हाय ती.
तीचे शाळेतले मास्तर म्हणायचे लई हुशार हाय ती पण कदी मदी पारच वेगळी वागतीया.
माग तीला दुकानातून घरी यायला पारच उशिर झाला होता. माझ्या बापडीच्या मनी काय काय आल होत..! त्यात रवी पण शेरात गेला व्हता. लई रात्र झाली तरी पोर घरी आली नाही म्हणून वस्तीतल्या काही माणसांना सोबत घेउन गेले शोधायला. माझी निता मधीच पडल्याली होती. ते बघुन काळजात धस्स झालं होतं. सोबतीला आलेली माणस निताला गावातल्या डॉक्टर कड घेउन गेलोत.

***
नीता :-
लहान पणापासून मला विज्ञानाची खुप आवड आहे. आणि विज्ञानातील संज्ञा, व्याख्या कळायच्या सुध्दा पटकन. मला जितक विज्ञान आवडत तितकच आध्यात्मसुध्दा आवडत. तस माझा देवावर फारसा विश्वास आहे अस नाही म्हणता येणार. पण तरीही..
माझी ७-८ वी तालुक्यातल्या महाविद्यालयात झाली. तिथल्या ग्रंथालयात मी तासंन तास मी कधी विज्ञानाची पुस्तके, कधी विज्ञान कथा, कधी ईतर गोष्टी वाचत बसायचे. त्याच वेळी मी विज्ञानातल्या वेगवेगळ्या संकल्पना, पतंजली योग सूत्रे वगैरेचा अभ्यास केला होता.. मला वाटल होत की माझी उत्सुकता कमी होईल पण कसल काय ती आणखीनच वाढत होती. ऐन १० वी ला घरच्या काही कारणांमुळे मला परत गावातल्या शाळेत याव लागल.
१० वी च्या सुट्टीत गावात एक ध्यान धारणा शिबिर लागणार होत मी मोठ्या मुश्किलीने आईची परवानगी घेऊन शिबिराला गेले. खर तर शिबिराला जाण्यामागे फक्त उत्सुकता होती. तीथे खुप गोष्टी शिकायला मिळाल्या. तिथून आल्यावर मला ध्यान लावण्याची जणू काही लत लागली मी सतत माझ्याच दुनियेत रमु लागले. असेच दोन अडीच महीने गेले. माझ कॉलेज सुरू झाल होत. पण कॉलेज मध्ये माझ मन रमायचच नाही. आधी वाचल होत की माणसाच ध्यान सिध्द झाल की त्या माणसाला दूरवर असणाऱ्या एखाद्या योग्यांशी बोलता येत. म्हणल बघाव प्रयत्न करून. दोन तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर एकदाचा झाला एका महान योगी महाराजांशी संपर्क त्यांच्याकडून खुप काही शिकत होते. स्थूल शरीर, सुक्ष्म शरीर वगैरे वगैरे. त्या वेळी ते आपण आपल्या सुक्ष्म शरीराने कसा प्रवास करू शकतो काय काय करू शकतो. हे शिकवत होते. त्या दिवशी सहज मी माझ्या खास मैत्रिणीशी गप्पा मारत बसले होते. तर मी तीला सगळ काही सांगितलं ती मनोवैज्ञानाचा अभ्यास करत होती आणी सुट्टी साठी घरी आली होती. तीने मला सांगितल की हे जे काही तुझ्या सोबत जे होतय ते भास आहेत वगेरे. खर तर हे ऐकून मला खुप वाईट वाटल होत. पण मी विचार केला की ती त्याच गोष्टींचा अभ्यास करते त्यामुळे बोलतेय ते खर असेल. त्यामुळे कस बस मन मारून मी ध्यान लावणे बंद करून टाकल. अस अचानक केल्यामुळे काही दिवस त्रास झाला पण नंतर सवय होऊन गेली सगळ्या गोष्टींची. १२ वी झाल्यावर मी शिक्षण सोडून दिल आणि आईला घरी मदत करू लागले रवीने आमचच पण भाड्याने चालवायला दिलेल गावातल दूकान स्वत: चालवायला घेतल. रवीला मी आणि आई मदत करू लागलोत. आम्ही दोघेही दूकान चांगल संभाळत आहोत हे बघून आईने रोज दुकानात येण बंद केल होत.
त्या दिवशी दुकानातला माल संपला म्हणून माल आणण्यासाठी तालुक्याला गेला होता आणि त्यामुळे त्याला यायला खुप उशीर होणार होता म्हणून मी एकटीच घरी जाण्यासाठी निघाले. एक तर सकाळ पासून काही विचित्रच वाटत होत त्यात आज घरी एकटच जाव लागणार होत.
रात्री सात साडेसात वाजता घरी जाण्यासाठी निघाले तस वाटेत काही भिती नव्हती या आधीही मी एकटीच दोन तीन वेळा गेले होते पण माहित नाही का आज जराशी भिती वाटत होती तरीही मनाची तयारी करून निघाले. थोड्या थोड्या अंतरावर रस्त्याच्या कडेला लाईटचे खांब होते त्यामुळे अंधाराची भिती नव्हती पण तरीहि सोबत बॅटरी घेतली होती.
सगळा मिळुन दोन अडीच किलो मीटर चा रस्ता. आज वातावरणात काही बदल होतायत अस उगाच वाटून गेल. रातकीड्यांच्या आवाजाने शांतता भंगत होती. मधेच कुठेतरी कुत्र्यांच्या विव्हळण्याचा आवाज वातावरणात अणखिनच भेसूरता आणत होता. अशा वेळी काय काय मनात येत होतं. त्यातल्यात्यात मी फिरून फिरून एकाच जागेवर सारखी सारखी येत आहे अस वाटत होत. त्या सगळ्याच्या एकूणच परीणामाने की काय डोक खुपच दुखायला लागलं तरी मी घराच्या ओढीने झप झप पावले टाकत चालत होते. अचानक मला मी ध्यान धारणा करत असताना ज्या आवाजाला गुरु मानल होत त्या आवाजात मला कोणीतरी हाक मारतय अस वाटल. तेवढ्यात रस्त्यावरच्या लाईटी गेल्या आणि माझ्या समोर एक धूसर मानवी आकृती प्रकट झाली. पुढे बहूतेक मी बेशुद्ध पडले होते.
ज्या वेळी मला भान आल त्या वेळी ती आकृती माझा हात हातात धरून मला खुप वेगाने कुठेतरी घेऊन चालली आहे अस वाटल. ज्या वेळी मी डोळे उघडून आजुबाजुला पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला काहीतरी आधी कधिही प्रत्यक्षात न बघितलेल्या गोष्टी दिसल्या. जणूकाही मी अंतराळात प्रवास करत आहे कारण अस वाटत होत की आम्ही आकाशगंगेच्या मध्य बिंदुकडे भयंकर वेगाने चाललो होतो. एका ब्लॅकहोल कींवा वर्महोल कडे..! मी त्या आकृतीला त्या बद्दल विचारल तर त्या ओळखीच्या आवाजात उत्तर मिळालं की तूच ब्रमांडाविषयी बोलताना विचारल होत की वेगवेगळे आयाम कीवा वेगवेगळे ब्रंम्हांडांचे खरच अस्तित्व असत का? आणि असेल तर आपण तिथे जाऊ शकतो का? आणि त्यावेळी मी तूला एवढच उत्तर दिले होत की योग्य वेळ आल्यावर तूला ते कळेलच..!
ती योग्य वेळ आता आली आहे..!
(**समाप्त**)

प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत..!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

योग शास्त्रात दोन अशा संकल्पना आहेत की माणुस दूरभाष करू शकतो (telepathy). आणि आपल्या सुक्ष्म शरीराच्या (मनाच्या) माध्यमाने खुप लांब प्रवास करू शकतो. अगदी प्रकाशाच्या गतीच्या अनेकपट गतीने सुध्दा.. ती कल्पना, विज्ञानातील कृष्णविवराच्या (wormhole), समानांतर विश्व या संकल्पनांचा वापर करून कथा लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.
आपली नायिका तीच्या योगी गुरूंच्या मदतीने आपल्या ब्रंम्हांडातून दुसऱ्या ब्रंम्हांडातल्या एका ग्रहावर जाते. तीचे गुरू तीला जायला यायला आणि शरीर निर्मितीसाठी आणि त्या शरीराचा त्याग करण्यासाठी स्वत:च्या योग सामर्थ्याचा वापर करतात.
मी कथेत आणखी एक संभाव्यताही लपवली आहे पण ती वाचकांनी ओळखावी अशी माफक अपेक्षा आहे.

हो मी सहमत आहे तुमच्याशी..
योग शास्त्राच्या मदतीने एखादी व्यक्ती मानवी मनाची ताकद वापरून दुसऱ्या विश्वात जाते.
आणी ती दुसरी संभावना अशी आहे की कथेतल्या नायिकेच्या मनातली दुसऱ्या विश्वाबद्दल असलेली उत्सुकता व तीने लहानपणी केलेल्या योग शास्त्राच्या अभ्यासाचा याचा तिच्या मनावर परीणाम होतो आणि तीला सगळे भास होतात.
पण कथा लिखाणाची पहीली वेळ असल्याने माझी कल्पना नीटशी मांडता आली नाही त्या बद्दल क्षमस्व..!

छान जमलीये कथा

अजुन अशा कथा लिहा की
आवडेल वाचायला
पुलेशु