आधी भौतिक !

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

आमचे एक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. ते लय म्हणजे लईच भारी होते. ताडमाड भारदस्त व्यक्तिमत्व, तसलाच आवाज. छाप पाडणारे प्रकरण. दोन्हीही हातांनी वहीवर/फळ्यावर अगदी फास्टंफास्ट लिहायचे. फळ्यावर लिहिताना आपण फळ्याकडे तोंड करून लिहितो, तर हे वर्गाकडे तोंड करून उलट्या हातानेसुद्धा सरळ ओळीत फळ्यावर लिहू शकायचे. तिरके अक्षर आणि पल्लेदार फटकारे. कर्सिव्ह तर बघत र्‍हावे. त्यांच्या हाताच्या चिमटीत पेन एवढुसा दिसायचा. खडू दिसायचाच नाही.

हे सर महिन्यातून एकदा आमची एक गमतीदार परिक्षा घ्यायचे. आम्हाला कोर्‍या उत्तरपत्रिका वाटायचे आणि फळ्यावर आम्ही आजवर कधी ऐकलीही नसेल अशी भौतिकशास्त्रातील एखादी संज्ञा लिहायचे उदा. इंडक्टिव्ह रिअ‍ॅक्टन्स.

आणि म्हणायचे आता पाजळा तुमचे ज्ञान. तुमच्या मनात ही टर्म वाचून जे काय येईल, सुचेल ते लिहा. अगदी स्टोरी सुचली तरी लिहा. मात्र ती सुसंगत आणि मुद्देसूद असली पाहिजे. पेपर कोरा ठेवायचा नाही. किमान दीडपान तरी लिहायचेच. मग ते प्राध्यापक रितसर पेपर चेक करून आणून त्याचे सार्वजनिक वाचनही करायचे.

(काही विद्वान विद्यार्थ्यांना तो विषय आधीच माहीत असायचा आणि ते आपले पुस्तकी ज्ञान पेपरमध्ये लिहायचे, ते सोडा!)

प्रकार: 

मस्तंच....छान होते सर तुमचे. कुठलं कॉलेज? आमच्याकडे नव्हते असे कोणी. सगळे शिक्षक आणि लकबी आठवल्या झरझर...
अशा शिक्षकांची / उपक्रमांची किंमत नंतर आपण 'भोपळा' सोडून स्वतः हात-पाय मारायला शिकतो तेव्हा कळते. त्या वयात मात्र काय हे नको ते.. असे विचार असतात.
आमचे रंगवाला सर आठवले. गोरे, बेताची अंगकाठी, नाजूक आवाज, सुरेख अक्षर. जीव ओतून क्वांटम शिकवायचे. शिकताना वाटायचं सगळं कळलंय, पेपर लिहीताना मात्र परवरदिगारे आलम ! मग त्यांच्या समोरून जाताना पण कसनुसे वाटायचे. ते तसेच हसरे...
खूप सुरेख शिक्षकांच्या हाताखाली शिकायचे भाग्य लाभलेय.

हे करण्याचा सरांचा मुख्य हेतू म्हणजे आमचे त्या टॉपिकसंबंधित कुतुहल जागवणे हा असायचा, जेणेकरून पुढे आम्ही स्वतः त्यासंबंधित विषयावरची पुस्तके शोधून वाचावीत, ही अपेक्षा.

म्याडम्ड्या आणि सर्ड्यांची <<< प्रचारक, हे रागाने लिहिलेय की लाडाने? Happy

म्याडम्ड्या आणि सर्ड्यांची <<< प्रचारक, हे रागाने लिहिलेय की लाडाने? Happy >>>> म्याडम्ड्यांचे लाडानी आणि सर्ड्यांचे रागाने .. अर्थातच... Happy