कथुकल्या ४ + ?

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 April, 2017 - 21:42

१) 0101….( शशक)

फक्त पैशांसाठी मी या प्रयोगात सहभागी झालो होतो.
माझ्या बधिर कवटीला छिद्र पाडतांना डॉक्टरांनी मला जागंच ठेवलं. त्यांनी डोक्याच्या वेगवेगळ्या भागांना केबल्स जोडले. मेंदूच्या शुभ्र करड्या रंगात केसांएवढ्या बारीक केबल्सचा लाल रंग मिसळून गेला. त्या असंख्य केबल्सचं दुसरं टोक जोडलं गेलं सुपरकॉम्प्युटर्सना.

“ऑपरेशन सक्सेसफुल” त्यांनी जाहीर केलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा महापूर उसळला होता. आता फक्त फायनल टेस्टिंग बाकी होतं.
इशारा झाला अन सगळे संगणक जिवंत झाले. माझ्या विचारांनी वायर्सचा पाठपुरावा केला. सळसळत गेलो मी इलेक्ट्रॉन्ससारखा.

आपली चूक त्यांच्या उशीरा लक्षात आली. त्यांनी मला शटडाउन करून टाकलं. पण… तोपर्यंत बराच उशीर झाला होता. माझ्या डिजिटल मेंदूने जगभरातल्या इंटरनेटचा ताबा घेतला होता.

२. पहिली भेट

२२ एप्रिल २१३८ ची संध्याकाळ :

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात अतिसंवेदनशील गुप्त बैठक सुरू होती.

“सगळे प्रयत्न हरलो आपण. तिसरं महायुद्ध आता अटळ आहे.”

“महायुद्ध आणि जगाचा विनाशही निश्चित आहे. म्हणून आपल्याला हे पाऊल उचलावंच लागणार.”

“बरोबर. टाईम मशीनचं टेस्टिंग पुर्ण झालं का?”
“झाल्यातच जमा आहे सर.”

“म्हणजे मिशन X साठी आपण तयार आहोत?”

“हो नक्की… पण भूतकाळात ढवळाढवळ करणं निसर्गनियमाच्या विरुद्ध होणार नाही का?”

“इथे मानवी अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलाय त्यामुळे हा विचार करण्यात आता अर्थ नाही. अहो जिवंतच नसू तर कसले नियम अन कसलं काय? इ.स. २०५६ मध्ये जाऊन ती घटना रोखली तरच हे महायुद्ध थांबू शकतं.”

“ठिकेय सर, आम्ही तयार आहोत.”

------------

पॅसिफिक महासागरात दडलेली ती गुप्त प्रयोगशाळा केव्हापासून तयार होती. हुबेहूब मनुष्यासारखे दिसणारे, वागणारे दोन ह्युमनाइड्स भूतकाळात जायला सज्ज होते. त्यांचा मेंदू सामान्य माणसापेक्षा जास्त सक्षम होता. एकाच्या डोक्यात राजकीय पेच सोडवण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी भरलेल्या होत्या तर दुसऱ्याचा डोक्यात काय होतं शब्दांत सांगणं अवघड होतं. दोघांनाही २०५६ सालात काय करायचं, कुणाला भेटायचं सगळं ठावूक होतं. पोशाखही त्या काळाला सुसंगत होता.

सगळ्या प्रक्रिया पुर्ण करून ते टाईम मशीनमध्ये बसले. प्रोग्राम्सचे सॉफ्टवेअर धावू लागले. २०५६ हे वर्ष टाईप करताच ती टाईम मशीन पहिला प्रवास करायला सज्ज झाली.

------------

आपले जडावलेले डोळे दोघांनी कसेबसे उघडले. डोकं जाम झालं होतं, मधे काय झालं काहीच आठवत नव्हतं. स्वतःचा तोल सावरत ते कसेबसे उभे राहिले. वेळ रात्रीची होती अन आसपास कुठेच टाईम मशीन दिसत नव्हती.

“हे फेला S “ कुणीतरी जोरात ओरडलं. पाठोपाठ घोडा खिंकाळण्याचा आवाज आला. अन पहिल्यांदाच त्यांनी आजुबाजुला पाहिलं. ते वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध उभे होते. घोडागाड्या दौडत होत्या, जुन्या काळातले पोशाख घातलेले लोक फिरत होते, चहुबाजूंनी राजवाड्यासारख्या दिसणाऱ्या मोठमोठ्या इमारती होत्या; अन सर्वात महत्वाचं म्हणजे, या दोघांकडे लोक विचित्र नजरेने पाहत होते.

“हाय फ्रेन्ड्स, आय थिंक यू आर लॉस्ट.” एक भारदस्त आवाज कानांवर पडला. झुपकेदार मिशा अन डोक्यावर उंच टोपी असलेला रूबाबदार तरुण होता तो.

“हरवलोय असंच म्हणावं लागेल.”

“गुड. मला हरवलेले लोक आवडतात. हाउ कॅन आय हेल्प यू?”

“विचित्र वाटणार नसेल तर एक प्रश्न विचारू?”

“नक्कीच.”

“सध्या कोणतं वर्ष सुरू आहे?”

“१८८४”

दोघांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं. टाईम मशीनने त्यांना चुकीच्या काळात आणलं होतं. परत जायचं तर बहुतेक तीपण नष्ट झाली होती. ह्युमनाईड्स असल्यामुळे सामान्य माणसांएवढं दुःख जाणवणं शक्य नव्हतं पण संपुर्ण मानवजात संकटात असेल तर थोडंफार दुःख तर होणारच.

“डोन्ट वरी, मी तुम्हाला मदत करेन.”

“थँक्स सर.”

“मित्रांनो तुमचे नावं नाही सांगितले तुम्ही अजून.”

ते सांगावं की सांगू नये या संभ्रमात पडले. कारण त्यांच्या काळात ह्युमनाईड्स लोकांना माणसांसारखे नावं नव्हते.

“इच्छा नसेल तर राहू द्या.”

“मी AL206D आणि हा AL205D. थोडे कठीण आहेत. पण तुम्ही आम्हाला हव्या त्या नावांनी हाक मारू शकता.”

“नो प्रॉब्लम.”

“युवर गुडनेम सर?”

“मी आर्थर कॉनन डायल. वेलकम टू लंडन फ्रेन्ड्स.”

३. साहित्यकोडे २

हॉस्पिटलच्या बेडवर छोटीशी, निरागस मुलगी आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होती. मृत्यू कॅन्सरच्या वेषात क्षणाक्षणाला तिच्या दिशेने पुढे सरकत होता. चेहरा पांढराफटक पडत चाललेला , नाकातोंडातून नळ्या घुसलेल्या, श्वासाची लय तुटक होत चाललेली.

अन आसवं कधीचाच आटलेला बाप तिच्या पायांवर डोकं टेकवून मुर्दाडलेल्या नजरेने पाहत होता .........

--------------------------------------------
एक ते पाच कितीही शब्द टाका अन अर्थपुर्ण उतारा बनवा.

आहे की नाही सोपं

(पहिल्या दोन कथुकल्या कशा वाटल्या तेपण सांगा Happy )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा भाग हॉलिवूड स्पेशल दिसतोय. पहिली कथा बरीचशी "Transcendence" सारखी अन दुसरी "Terminator" सारखी.
चांगला प्रयत्न, पण शब्दसंख्या वाढवली असती तर पहिल्या दोन्ही कथांना अजून रंगत चढली असती.

सर्व कथा खूप छान आहेत .

झुपकेदार मिशा, डोक्यावर उंच टोपी अन हातात छडी घेतलेला रूबाबदार माणूस होता तो.>> अवघ्या १० वर्षाच्या Arthur_Conan_Doyle ह्यांना मिशा कश्या आल्या Happy
-------------------------------------------
(Arthur Conan Doyle
Born 22 May 1859
Edinburgh, Scotland )

सॉरी गडबडीत झालेली चूक आहे. सुधारणा केली आहे.

Sherlock वरील पहिली कादंबरी Study in Scarlet १८८६ मध्ये आल्यामुळे ते sherlock आणि mycroft यांना दोन वर्ष आधी भेटले असतील अशी कल्पना आहे.
Thanks

सगळ्या कथा खूप छान!
तिसरी कथा दिलेल्या उताऱ्यावरून थोडीशी 'सोलएस' या अँथनी हॉपकिन्सच्या sci fi चित्रपटासारखी वाटते आहे, ज्यात शेवटी तोच त्याच्या मुलीची वेदना दूर करतो, तिला स्वतःच्या हाताने मृत्यू देऊन!

कथा बरीचशी "Transcendence" सारखी अन दुसरी "Terminator" सारखी.

>>2012 मध्ये मी 0101 ही कथा लिहली होती ( त्यावेळी ती ८०० शब्दांची होती) तिला कमी शब्दांत मांडता येईल का या प्रयत्नातून ही शशक लिहली.
कथानक Pfister यांचा transcendance शी मिळतंजुळतं आहे पण तो सिनेमा 2014 साली आला होता
दुसरी कथा sherlock holmes चं fan fiction म्हणू शकतो. एवढा मोठा detective भावना व्यक्त करण्यात कच्चा का होता ? एखादा मनुष्य इतका हुशार कसाकाय राहू शकतो, आर्थर डायल यांनी sherlock ला इतकं हुबेहूब कसंकाय मांडलं, प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीला भेटल्याशिवाय एवढं जिवंत लिखाण करणं शक्य आहे का वगैरे प्रश्नांचा वेध घेत असतांना सुचत गेलेली काल्पनिक कथा. Terminator शी त्याचा संबंध नाही.

चांगला प्रयत्न, पण शब्दसंख्या वाढवली असती तर पहिल्या दोन्ही कथांना अजून रंगत चढली असती.
>> दूसरी कथा मोठी लिहण्याचा प्रयत्न केला होता पण जास्त details लिहले की suspense उघड होत होता..

नेहमीप्रमाणे पहिल्या दोन्ही कथा भारी आहेत .
हॉस्पिटलच्या बेडवर छोटीशी, निरागस मुलगी आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होती. मृत्यू कॅन्सरच्या वेषात क्षणाक्षणाला तिच्या दिशेने पुढे सरकत होता. चेहरा पांढराफटक पडत चाललेला , नाकातोंडातून नळ्या घुसलेल्या, श्वासाची लय तुटक होत चाललेली. अन आसवं कधीचाच आटलेला बाप तिच्या पायांवर डोकं टेकवून मुर्दाडलेल्या नजरेने पाहत होता
सिगारेटमूळे त्याच्यासोबत तिचेही आयुष्य पणाला लागले.

"स्वतःच्याच मुलीवर केलेला प्रयोग महाग ठरला होता... "
तिसऱ्या कथेसाठी वाक्य दिले आहे, पाचपेक्षा जास्त शब्द आहेत पण जरा वेगळं वळण देणारं वाक्य असल्यामुळे सादर केलं.
तसेच हेही वाक्य आहे.
"मुलीवरचे परकाया आक्रमण अटळ होते."

अक्षयनी जे सांगितलं जवळपास तेच होतं माझ्या डोक्यात -

हॉस्पिटलच्या बेडवर छोटीशी, निरागस मुलगी आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होती. मृत्यू कॅन्सरच्या वेषात क्षणाक्षणाला तिच्या दिशेने पुढे सरकत होता. चेहरा पांढराफटक पडत चाललेला , नाकातोंडातून नळ्या घुसलेल्या, श्वासाची लय तुटक होत चाललेली. अन आसवं कधीचाच आटलेला बाप तिच्या पायांवर डोकं टेकवून मुर्दाडलेल्या नजरेने पाहत होता...
नो स्मोकिंगच्या बोर्डकडे

छान आहेत या ही कथा.. दरवेळी वेगळःया शैलीतील आणत आहात हे विशेष.. लगे रहो..

उत्तरेही छान आलीत..
त्यात सिगारेटबाबत मूळ लेखकालाच सुचलेले डोक्यात येणे जबरीच !

एक प्रश्न माझी माहिती वाढवण्यासाठी.. असे बापाने धूम्रपान केल्यास मुलीला अगदी कॅन्सरपर्यंत होऊ शकते का?
खरे असल्यास एखाद्या धूम्रपान व्यक्तीला त्यावरून चार खडे बोल त्याच्याच भल्यासाठे सुनावता येतील म्हणून विचारतोय.

ऋन्मेऽऽष, तुमची शंका बरोबर आहे, दुसऱ्याच्या धुम्रपानामुळे आपल्यालादेखील कॅन्सर होणे ही क्वचित आढळणारी बाब आहे पण इथे दिल्याप्रमाणे कॅन्सर एका छोट्या मुलीला झालेला दाखवला आहे. आता त्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की काही छोटी मुले जास्त करून घरातच खेळत असतात आणि तिचे वडीलही जास्तीत जास्त धूम्रपान करणारे आहेत त्यामुळे ते घरातही करत असणारच, घरातल्या घरात तो विषारी धूर व्हेंटिलेशन शिवाय तसाच फिरत राहू शकतो त्यामुळे त्या छोट्या मुलीच्याही श्वासाबरोबर तो तिच्या आत जाईल तसेच काही छोटी मुले जास्त करून स्वतःच्या वडिलांबरोबर खेळत असतात, त्यांनी लाड करावे म्हणून त्यांच्या आसपास फिरतात त्यामुळेही त्या मुलीचा धुराबरोबर संपर्क जास्त आला असावा आणि म्हणूनच त्याचे रूपांतर एवढ्या भयानक परिस्तिथीमध्ये झाले.
हे झाले छोट्या मुलांबद्दल, जर अशाच घरात मोठी माणसे असतील तर एक तर ती धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला घराबाहेर जाऊन करायला लावतील नाहीतर ती स्वतः काहीवेळ त्या माणसापासून दूर जाऊन बसतील, म्हणजेच जास्तीत जास्त धुरापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतील, पण तरीही थोडाफार धोका त्यांनाही राहीलच.
पण हो, एकदमच कॅन्सर होणार नाही, त्याची सुरुवात दमा, अस्थमा, आणि अजून काही फुप्पुसांच्या रोगांपासून होऊ शकते आणि मग जर काही उपचार केले नाही तर मग कॅन्सरपर्यंत मजल जाऊ शकते. कॅन्सर होण्याची शक्यता तेव्हा तर खूपच वाढेल जेव्हा घरात जास्तीत जास्त सदस्य हे सिगारेट पिणारे असतील.
पण तुम्ही तसेही एखाद्या धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला बोध म्हणून हे सुनावू शकतात. खरंच चांगला उद्देश आहे तुमचा!

katha -3

shabda -5

... swatahachya samorchya aarshyatil na -umatlelya pratibimbakade...

पण तुम्ही तसेही एखाद्या धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला बोध म्हणून हे सुनावू शकतात. खरंच चांगला उद्देश आहे तुमचा!
> >बरोबर आहे, Technically बघायला गेलं असता passive smoking मुळे cancer बरीच वर्ष जावी लागतात पण बोध म्हणून चांगलं आहे

@ अभिनव,
हा angle ही मस्त आणि धक्कादायक आहे. विशेषत: मुर्दाडलेल्या नजरेने.... शी जुळत आहे.

एकाच घटनेकडे किती वेगवेगळ्या दृष्टीकोनातून बघता येऊ शकतं हे पाहून अचंबित झालो. (अर्थात हे श्रेय तुम्हा सर्वांच्या प्रतिभेला जातं)

Dhanyavaad Vinay..
katha -1 khoop masta aahe.. mala aawadli..
katha -2 - vichaar changala aahe.. pan sherlock chi personality.. future madhun aalyasarkhi vaatat nahi.. so.. thoda awaghad aahe tasa imagine karana.. pan kharach sir arthur conan doyle sarkhya mahan lekhakanna ase future madhun past madhye aalele loka bhetu shaktaat ashi katha mhanun baghu shakalo me..
Please ajun ashach katha yeu dya..
sci fi ha maaza aawadata vishay aahe.. Happy

शेरलॉक होम्सच्या एका कथेत तो अलौकिक गुप्तहेर असून सुद्धा किती मानवी होता याचा पुरावा सर डॉयलनी दिला आहे तो म्हणजे, होम्सला पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सुद्धा माहित नव्हते आणि याचे कारण देताना तो म्हटला की 'मी वायफळ ज्ञान डोक्यात ठेवत नाही' Happy

हॉस्पिटलच्या बेडवर छोटीशी, निरागस मुलगी आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होती. मृत्यू कॅन्सरच्या वेषात क्षणाक्षणाला तिच्या दिशेने पुढे सरकत होता. चेहरा पांढराफटक पडत चाललेला , नाकातोंडातून नळ्या घुसलेल्या, श्वासाची लय तुटक होत चाललेली.
अन आसवं कधीचाच आटलेला बाप तिच्या पायांवर डोकं टेकवून मुर्दाडलेल्या नजरेने पाहत होता, जाताना तरी काही मागेल अपेक्षेने....

अन आसवं कधीचाच आटलेला बाप तिच्या पायांवर डोकं टेकवून मुर्दाडलेल्या नजरेने पाहत होता >> हे फिजिकली कसं शक्यं आहे? पायावर डोकं टेकवल्यावर अगदीच डोक्याच्या मागे डोळे नसतील तर पायांशिवाय काय दिसणार आणि तो मुर्दाडलेल्या की काय नजरेनं कुठे पहात आहे हे कुणाला कसं कळणार?

सर, तुमची शंका रास्त आहे पण
त्याने तिच्या पायांवर कपाळ टेकवलेलं नाहीये. He's facing sideways looking toward her /away from her.

& most third person stories are written in bird eye view (as if writer is present over there) त्यामुळे तो कुठे बघतोय ते कळतय. Happy

वैभव, पासिव स्मोकिंगच्या शंकानिरसनाबद्दल धन्यवाद.
तसेही ते सिगारेट दारूचा वास तोंडाला असताना लहान मुलांजव़ळ जाणार्‍यांची मला जरा चीडच आहे. मुलांसमोर व्यसने करणार्‍यांचीही. अन्यथा ओवरऑल व्यसनी लोकांबद्दल सहानुभुतीच वाटते. असो, विषय भरकटायला नको.. Happy

Pages