२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिन परेड @ राजपथ,दिल्ली , भाग १3

Submitted by sariva on 3 April, 2017 - 19:49

२१) CSIR@75: Touching lives
(Council of Scientific & Industrial Research)
वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषद गेली 75 वर्षे राष्ट्रसेवेत आपले योगदान देत आहे व देशाच्या वैज्ञानिक व औद्योगिकीय विकासात उत्कृष्ट भूमिका निभावत आहे.आपल्या तंत्रज्ञानाद्वारे लाखो देशवासियांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास गती व प्रेरणा देण्याचे काम CSIR करीत आहे.
या चित्ररथात मध्यभागी CSIR चे 38 राष्ट्रीय प्रयोगशाळांचे चक्र (wheel) दाखविले असून त्यावर CSIR च्या उपलब्धी (break throughs) दशकानुरूप किरणांद्वारे ठळकपणे दाखविल्या आहेत. CSIR ची अनेक उत्कृष्ट योगदाने मोठ्या 3-D मॉडेलच्या माध्यमातून पूर्ण चित्ररथात दाखविली आहेत. जसे -अग्रणी नागरिक विमानन उद्योग (pioneering civil aviation industry),स्वस्त,परवडणाऱ्या औषधांचा विकास,औषधीदृष्टया मौल्यवान व सुगंधित वनस्पतांची ओळख,एका मॉडर्न लेबोरेटरीचा सेट-अप. तसेच देशांत विशेषज्ञता प्राप्त केलेले वैज्ञानिक,इंजिनिअर यांना पोषित करणे ( foster),टिकवून ठेवणे(to sustain) व त्यांची उन्नती करणे (upgrade) यासाठीची CSIR ची भूमिका दाखवली आहे.
"विज्ञानकी आकाशमें,एक नयी उड़ान है.. CSIR!
देशमें उद्योगोंकी,एक नयी पहचान है ...
CSIR!
जीवनको उन्नत बनाये,जीनेका नया ढंग सिखाये...
नयी खोजे,नये अविष्कार,नयी चुनौती..
करे स्वीकार..... CSIR!
देशकी तरक्कीमें भागीदार...या साजेशा गाण्याची जोड या चित्ररथाला होती.
1

२२) स्वच्छ भारत-हरित भारत
CPWD (Central Public Work Department) केंद्रिय लोकनिर्माण विभागाच्या चित्ररथाद्वारे स्वच्छ व हरित भारताचा संदेश प्रसारित केला होता.
162 वर्षांपासून राष्ट्रनिर्माणाला समर्पित असलेला हा विभाग निर्माण प्रबंधन क्षेत्रात एक मुख्य संघटन रूपात पुढे आला आहे.नवेनने प्रोजेक्ट पुढे आणणे,त्यासाठी सल्ला देणे,ते पूर्णत्वास नेणे व टिकवून ठेवणे इ. स्वरूपात त्याचे कार्य चालू आहे.
अधिकाधिक वृक्षारोपण व पर्यावरण सुधारण्याच्या पध्दती वापरून CPWD ने स्वच्छ व हरित भारताच्या राष्ट्रव्यापी अभियानात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.68 व्या प्रजासत्तादिन समारंभाच्या निमित्ताने या विभागाने विविधरंगी व सुगंधित फुलांच्या मदतीने खूपच सुंदर सजवलेल्या चित्ररथातून हा स्वच्छ व हरित भारताचा संदेश लोकांना दिला.Creative interpretation असलेला हा उत्कंठावर्धक चित्ररथ सर्वांनाच खूप आवडला.
1





२३) Transforming India through Skill Development :
कौशल्य विकास व उद्यमिता मंत्रालय( Ministry of Skill Development & Entrepreneurship) याचा हा चित्ररथ.
'कुशल' भारताचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी घेतलेले initiatives,कार्यक्रम व त्यामुळे झालेले साध्य यावर या चित्ररथात प्रकाश टाकला होता.देशातील लोकसंख्येच्या एका मोठ्या भागाला उपयोगी कौशल्ये शिकविणे,देशात व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणाच्या सोयी करणे व याद्वारे अर्थव्यवस्थेत बदल करण्याचा सरकारचा संकल्प यात दाखविला होता.
चित्ररथाच्या अग्रभागी भावी दृष्टीकोन पुढे ठेवून प्रदर्शित केलेले कौशल/कुशल भारताचे चिन्ह (बंद मुठीत spanner व पेन्सिल) कौशल्य व शिक्षण..दोन्हीचे महत्त्वसूचक होते.
चित्ररथाच्या वरच्या भागात एका वर्गात विद्यार्थी व कामगार एका कारची दुरूस्ती करताना दाखविले होते. पारंपारिक शिक्षण व त्याला व्यावहारिक अनुभवाची आवश्यकता यावर भर देऊन कौशल्य विकासातले त्याचे महत्त्व येथे दाखविले होते.तिसऱ्या लेव्हलवर सकुशल कारागिरांनी निर्माण केलेली उत्पादने दाखवली होती. चित्ररथाच्या दोन्ही बाजूस कुशल माणसांकडून सांभाळली जाणारी कार्यशाळा म्हणजे प्रशिक्षण व परिवर्तनाचे प्रतिक होते. चित्ररथाबरोबर विविध अवजारांच्या(tools) स्वरूपात मानवी प्रतिकृती दाखविल्या होत्या.
"चलो काम करे,कुछ सीखे,कुछ काम करे..
कुछ तुम जानो,कुछ मैं जानू ..
मिलजुलकर कमाल करे,
चलो काम करे...
चलो बिजली बनाए,चलो कार बनाए..
हसता खेलता परिवार बनाए..
दुनियामें देशका नाम करे,
चलो काम करे..."हे गीत साथीला होते.

आणखी एक विशेष म्हणजे प्रत्येक चित्ररथा बरोबर एक सैनिक marching करत चालत होता.





चित्ररथानंतर सजवलेल्या उघड्या जीपमधून राष्ट्रीय वीरता पुरस्कार विजेत्या मुलामुलींचे आगमन झाले.यावर्षी 25 जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यात 13 मुले व 12 मुली असून यातील 4 जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले आहेत. शौर्य हे वयावर अवलंबून नसते,हे त्या मुलांकडे बघून पटत होते.'उम्र छोटी,इरादे बड़ेबड़े' असं यांचं कौतुक केलं जात होतं.आणिबाणीच्या प्रसंगी प्राणाची पर्वा न करता प्रसंगावधान,जबरदस्त साहस व शौर्य दाखविलेल्या त्या सर्वांची कामगिरी अभिमानास्पदच होती.
भारत पुरस्कार (1), गीता चोपडा पुरस्कार (2), संजय चोपडा पुरस्कार (1), बापू गायधनी पुरस्कार (3) व अन्य राष्ट्रीय वीरता पुरस्कार विजेते (18) अशी एकंदर विभागणी होती. प्रेक्षकांनी त्यांचे खूप स्वागत व कौतुक केले.
महाराष्ट्रातील कु.निशा दिलीप पाटील या पुरस्कार विजेत्यांत आहे.बाकी विजेते अरूणाचलप्रदेश,प.बंगाल,उत्तराखंड,
मिझोराम छत्तीसगड, हिमाचल प्रदेश,राजस्थान,नवी दिल्ली,उ.प्रदेश,कर्नाटक,मणिपूर,केरळ आसाम, नागालेँड व जम्मू-काश्मीर येथील होते.








क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेखन आणि छायाचित्रेही.
२६ जानेवारीचे संचलन आणि बिटींग द रिट्रीट या दोन समारंभांना माझ्या मनात विशेष स्थान आहे. त्यामुळे वर्षभर निव्वळ या दोन समारंभांचीच वाट (अगदी काऊंटडाऊन करत) पाहिली जाते. एकदा मी प्रत्यक्ष संचलन पाहण्यासाठी दिल्लीला गेलो होतो, पण तिकिटं मिळाली नाहीत, म्हणून इंडिया गेट मागून पाहिले होते. तिकिटं मिळाल्या बिटींग द रिट्रीट मात्र त्यावेळी पाहता आले.
१९९५ पासून हा समारंभ कधीही न चुकवता पाहिला आहे. त्या संबंधीच्या माहितीची बरीच माहिती गोळा झालेली आहे आणि अजून त्यात भर पडतच आहे. घरच्या घरी एक त्याचे पुस्तकवजा फाईलच केली आहे.
माझ्या या सर्वांत आवडत्या सणाविषयी इतक्या सविस्तर आणि सचित्र माहिती शेअर केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.