मंडला(मंडळं) डिसाईन

Submitted by विद्या भुतकर on 2 April, 2017 - 23:54

मला एक गोष्ट लक्षात आलीय, बोलायला पैसे पडत नाहीत. अर्थात आधी एकदा म्हटलं होतं तसं माझ्या नोकरीत बोलायचेच पैसे मिळतात. पण अनेकवेळा अनेक मैत्रिणींशी अशाच गप्पा मारताना काहीतरी कल्पना सुचतात, कुणी त्यांना काय करायचं आहे हे सांगतं, मग मीही चार थापा मारून घेते. त्यातला आवडता विषय म्हणजे इंटेरीयर डिसाईन, चित्रकला, इ. त्यातल्या त्यात लोकांना घरात बदल सुचवताना मला तर अजिबातच पैसे पडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या एखाद्या भिंतीवर काय चांगलं दिसेल किंवा कसा सोफा योग्य असेल असे अनेक सल्ले मी वरचेवर देत असते. तर हे असंच एक दिवस गप्पा मारताना एका मैत्रिणीने मला सांगितलं की तिला कॅनव्हासवर चित्र काढून ते तिच्या हॉलमध्ये लावायचे आहेत. त्यासाठी तिने 'Mandala designs' चा विचार केला आहे.

आता असे काही नवीन शब्द माझ्यासमोर बोलले की मी लगेच सुरूच झाले, ते काय असतं, कसे काढतात, कसे दिसतात, इ. इ. तिने मग मला गुगलून काही चित्रं दाखवली. ते पाहून म्हटलं, हात्तेच्या हे तर आम्ही शाळेत चित्रकलेला ही काढायचो. वर्तुळात रिपीट केलेले आकार आणि तेही एकदम एकसमान. शाळेत ती वर्तुळ काढून एकसारखे आकार काढून चित्र पूर्ण करायचा बराच उत्साह होता. त्या मैत्रिणीने दाखवलेले बरेच कॅनवास सोपे वाटले. त्यातच मेहेंदीचे डिसाईनही होते. पिंटरेस्ट वर बरेच प्रकार पाहिले. एकदा का हे असं खूप डोक्यात घुसलं की मग ते पूर्ण केल्याशिवाय राहवत नाही.

सुरुवातीला प्रयोग म्हणून मी ८ बाय १० च्या छोट्या कॅनव्हासवर हे काढून पाहिले. जितकं सोपं ते वाटत होतं अर्थात ते तितकं सोपं नव्हतंच. एकतर वर्तुळं काढायला घरात काही साहित्य नव्हतं. मग वेगवेगळ्या आकाराचे वाट्या, ग्लास, प्लेट घेऊन पेन्सिलने वर्तुळं आधी काढून घेतले आणि त्यावर कॅनवास रंगल्यावर पुसलेही गेले. Sad मग परत वर्तुळं काढली. ब्रशने बारीक बारीक एकसारखे आकार काढताना जरा डोळ्याला ताण पडला. कदाचित मी चित्रकार वगैरे नसल्याने असेल. बाकी पहिलं बरंच एकसारखं छान आलं.

म्हणून अजून एक प्रयोग म्हणून त्यात मेहेंदीचे डिसाईन काढून पाहिले. मला काळ्या रंगावर सोनेरी काहीतरी काढून बघायचं होतं. माझ्या एक लक्षात आलं की काळ्या रंगावर सोनेरी कलाकुसर कितीही छान दिसेल असं वाटलं तरी काळ्या रंगावर कुठलेही रंग उठून दिसायला ते परत परत गिरवून काढायला लागले. त्यामानाने सोनेरी रंगावर निळा जास्त सोपा गेला होता. दोनीही ठिकाणी मी ऍक्रिलिक रंग वापरले आहेत. ऑफसेण्टर डिसाईनसाठी आता मोठे कॅनवास घेऊन एका टाईपचे २ किंवा ३ बनवून हॉलमध्ये ठेवता येतील असा विचार आहे. ते प्रत्यक्षात कधी होईल माहित नाही. तोवर हे केलेल्या दोन कॅनव्हासचे फोटो. तुम्हीही हे प्रयोग केले असतील तर नक्की सांगा. https://en.wikipedia.org/wiki/Mandala ही विकीची लिंक अधिक माहितीसाठी.

सहज मैत्रिणीशी बोलता बोलता असं काहीतरी माहित झालं आणि प्रयोग करून बघता आलं याचा फार आनंद वाटला. असेच कधीतरी मैत्रिणीने बोलता बोलता दिवाळीच्या मातीचे दिवे रंगविण्याबद्दल सांगितलं आणि ते ही प्रकरण बरंच पुढे गेलं होतं. तेव्हपासून मला कळलं आहे की हे अशा गोष्टीत जितकी माहित मिळेल तितकी कमीच असते. त्यातून पुढं काय शिकता येईल नेम नाही.

WhatsApp Image 2017-02-21 at 8.56.06 AM.jpegWhatsApp Image 2017-03-26 at 10.32.18 PM.jpeg

विद्या भुतकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

लाल, नारंग्र्री आणि पिवळा ह्या सॉलिड रंगावर सुद्धा छान दिसततात ; मी केलेय.
लाल वर सोनेरी , नारंगी वर गुलाबी वगैरे

मी तर , आपली पुर्वीची रांगोळी पुस्तकातील्ल्ल अशीच शोधून डिझाईन्स केलेल्री. जुने आर्ट आहे हे.

हो ना म्हणून माहिती दिली. जुन्या कला अशा पुन्हा समोर येत आहेत. मोठे कान्वास खूपच छान दिसतील. पण माझा हात बसलेला नाही तित्का. त्यामुळे हे प्रयोग. झंपि, तुमचेही काही अस्तील तर इथे चित्र जरुर द्या. असे वेग्ळे रंगसंगती करुन बघायला आवडेल. Happy
धन्यवाद.

पहिला कॅनवास मस्त,
दुसर्या कॅनवास वर रंगांचा जाड थर का दिसतोय असा विचार करत होतो, लेख वाचल्यावर उत्तर मिळाले, परत परत गिरवायला लागले रंग म्हणून.

विद्या, हा माझे रंगकाम - बस्के धागा वाचा.
मंडळांच्या खूप डिझाईन्स आणि मन शांत/एकाग्र करण्यासाठी मंडळांचा उपयोग याविषयी अधिक माहिती मिळेल.

माझ्याकडे पण मंडला आर्टची रंगवायची पुस्तके आहेत. मी रंगवून मग त्याला लॅमिनेट करून घेते व टेबल मॅट्चे सेट्स बनवते त्याचे. मस्त दिसतात. खूपच फेमस आहे हे. मन फार शांत होते. गूगल प्लेस्टोअर वर अ‍ॅप पण आहे. पण अ‍ॅप मध्ये स्वतः रंगवायची मजा येत नाही. फोन पासून दूर राहायचे तर अ‍ॅप कामाचे नाही. पूर्वी आपल्याला शाळेत असे चित्र काढायला असायचे.

सुरेख!

मस्त आहे . मला हि चित्र रंगवायला जे पेन/ मार्कर्स मिळतात ते कुठे मिळतात सांगू शकाल का कोणी .

मस्त धागा आहे बस्के चा. मीही अडल्ट कलरिंग बुक्स घेऊन आले आहे. एक्दा त्यावर लिहिलंही होतं. मला आवडतात तीही. मंडलं काढताना, केवळ रंग भरणे नसून थोडे अजून कठिण आहे असे वाटले.
नानबा, अडल्ट कलरिंग बुक्स विनस मधे मिळतील पुण्यात. साधे मार्कर्स चालतील. मी तर भरपूर घेतले आहे अनेक प्रकारचे. Happy शाळेत अस्ताना आवड होती पण करणे जमले नाही इत्के. आता रात्री कधी वेळ मिळाला की करते.
जाई तू कुठे बघत आहेस? अमेरिकेत तर कुठल्याही आर्टच्या दुकानात मिळतील.
सर्वान्चे आभार. Happy

Nanba crosswords book shop or amazon.in. i use normal sketch pens. I have seen one expensive set of pens at 500 rs. NormL costs about 60 or 70 rs. Depends on the shades you are looking for. I have a set of five sparkle pens. Also to add a special touch

विद्या , मी भारतात आहे . अमेझॉन वर सर्च करून पाहिलं तर कॅम्लिनच्या कलर पेन्सिल दिसल्या . अमा, स्केच पेनची आयडिया चांगली आहे Happy