जुनी व्यवस्था आणि नवी व्यवस्था

Submitted by अरुणजोशी१२३४५६७ on 2 April, 2017 - 04:17

द न्यू ऑर्डरः
१. स्वातंत्र्य, समता, बंधुता
२. पूर्वीच्या राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य, इथून पुढे जे काही वाढीव आहे त्यात समता, बंधुता
पूर्वीचा राज्यकर्ता कोण? धर्म! मागची असमानता? ती पुढे चालूच. मग ,
३. धर्मापासून स्वातंत्र्य, फक्त संधींत समता, बंधुता
जे धार्मिक आहेत त्यांचं काय? त्यांना त्यांचा मूर्खपणा सोडायचा नाही आणि जबरदस्ती सोडून घेता येता नाही. समतेचे निकष काय? तर जे नैसर्गिक आहे त्या पुढे काही करायची धमक नाही, मग
४. सत्तेचं धर्मापासून स्वातंत्र्य आणि धार्मिकांना धार्मिकेतेच्या मूर्खपणाचं स्वातंत्र्य, लिंग, जात, धर्म सोडून पण बाकी सगळे आर्थिक , शैक्षणिक फरक ठेऊन फक्त संधींत समता, बंधुता
अधिक समता दिल्यानं, आरक्षण दिल्यानं संधी जातात, म्हणून आरक्षणाला विरोध वा परदेशी पलायन, आणि बांधव म्हणजे समविचारी किंवा आपल्याच देशातले, मग
५. सत्तेचं धर्मापासून स्वातंत्र्य आणि धार्मिकांना धार्मिकेतेच्या मूर्खपणाचं स्वातंत्र्य, लिंग, जात, धर्म सोडून पण बाकी सगळे आर्थिक , शैक्षणिक फरक ठेऊन आरक्षणाला विरोध वा परदेशी पलायन करत फक्त संधींत समता, समविचारी किंवा आपल्याच देशातली बंधुता.
धार्मिक म्हणजे मूलतः उन्मादी. त्यांना त्यांच्या त्यांच्या घरात कोंडला पाहिजे. भीड. अनियंत्रित. हिंसक. म्हणून त्यांना बदडण्याचे स्वातंत्र्य, त्यांचे राजकीय विचार हे विचारच नाहीत असे मानण्याचे स्वातंत्र्य, आता बंधुता म्हणजे काय? तर बंधुसारखं प्रेम करायचं गुत्तं तर सरकारनं घेतलंय, मला माझेच प्रॉब्लेम सुटत नाहीत. म्हणून लोकांचे प्रोब्लेम, समाजाची उद्दीष्टे कल्याणकारी सरकार जाणो, आपण का मोराल पोलिसिंग करा? म्हणून स्वतःच्या व्यक्तिस्वातंत्र्यात बाधा न येऊ देईल अशी दुसर्‍याला बंधुता आणि त्याची कोणतीही व्यक्तिगत वा सरकारी डोकेदुखी अंगलट येणार नाही अशी बंधुता. मग,
६. सत्तेचं धर्मापासून स्वातंत्र्य आणि धार्मिकांना धार्मिकेतेच्या मूर्खपणाचं स्वातंत्र्य पण घरात नि देवळात मर्यादित, बाहेर आलं तर बडवायचं स्वातंत्र्य; लिंग, जात, धर्म सोडून पण बाकी सगळे आर्थिक , शैक्षणिक फरक ठेऊन आरक्षणाला विरोध वा परदेशी पलायन करत फक्त संधींत मागील असमतोल अ‍ॅडजस्ट न करता समता; समविचारी किंवा आपल्याच देशातील, व्यक्तिस्वातंत्र्यात बाधा न येऊ देईल अशी आणि दुसर्‍याची व्यक्तिगत वा सरकारी डोकेदुखी अंगलट येणार नाही अशी, गुडघ्यात मुंडके घालून, इतरांची, जगाची, येणार्‍या पिढींची अवस्था दुर्लक्षून स्वार्थाची मलई चाटावयाची बंधुता.
द ओल्ड ऑर्डर
१. देव, धर्म, मूल्ये
२. देव नावाची संकल्पना, ईश्वरप्रणित धर्म, धर्मप्रणित मूल्ये
३. देव नावाच्या संज्ञेचा आरोप; मानवी जीवनाची सर्व अंगे स्पर्शीणारी तत्त्वे सांगणारा धर्म; धार्मिक मूल्ये, परंपरा, उदारहणे,श्रद्धा
४. अमूर्ताच्या स्पष्टीकरणासाठी देव नावाच्या संज्ञेचा आरोप, देव नावाचं वास्तव, देव नावाचं ढोंग, ढोंगी देव; मानवी जीवनाची सर्व अंगे स्पर्शीणारी तत्त्वे सांगणारा धर्म, यातून मागे पडलेली तत्त्वे, धर्माच्या बारक्या सारक्या चूकींसाठी धर्मत्याग करणारी प्रगाढ नास्तिक मंडळी, मग अजूचन बुरसटलेला धर्म; धार्मिक मूल्ये, परंपरा, उदारहणे, श्रद्धा नि सामान्यांसाठींच्या सुलभीकरणाचा विपर्यास होऊन निर्माण झालेल्या अघोरी प्रथा, नाठाळ क्रूरता, अंधश्रद्धा, मानवाच्या कल्याण्यात आलेला अडथळा.
उपायः
१. दोन्ही ऑर्डर मधे खोटे खोटे का होईना पण उपस्थित राहणे. सज्जनांची उपस्थिती दुष्प्रभाव तरल करते.
२. दोन्हीकडे स्ट्रक्चरल चेंजेस करणे.
३. दोन्हींंकडचे दोष दुरुस्त करणे.
४. दोन्हीकडे वाकुल्या कमी दाखवणे.
५. दोन्हीकडे खोटा खोटा का होईना आदर आणि प्रेम दाखवणे.
६. व्यवस्थेची उद्दीष्टे प्रस्थापित करायचा प्रयत्न करणे.
७. या सगळ्यासाठी ज्यांना फार कमी वेळ आहे त्यांचेसाठी (तुका म्हणे केली) सोपी पायवाट बनवणे.
८. एक या व्यवस्था आपल्या विचारांनी गदबडवणार्‍या लोकांसाठी बौद्धिक बंदोबस्त सिस्टिम बनवणे (होम मिनिस्ट्री)
९. एक या व्यवस्थांशी काहीही संबंध नसलेल्या स्वार्थी लोकांसाठी भौतिक बंदोबस्त सिस्टिम बनवणे (डिफेन्स मिनिस्ट्री)
१०. स्वतः समस्या न वाढवणे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अधिक समता दिल्यानं, आरक्षण दिल्यानं संधी जातात, म्हणून आरक्षणाला विरोध वा परदेशी पलायन

काय च्या काय !!! पूर्वी उच्चवर्णियाना १०० % आरक्षण होते, दलिताना अधिकारच नव्हते, तेंव्हा दलित परदेशात पलायन करायचे का?

आणि आता ५० % आरक्षण , तेही फक्त सरकारी नोकरीत आहे, तर जास्त पगारासाठी देश सोडायचा अन कांगावा मात्र आरक्षणाविरुध्ह ?