२०१४ लोकसभा : जैसे थे स्थिती असणार का ?

Submitted by असो on 24 January, 2013 - 04:57

२०१४ च्या निवडणुकीची चाहूल लागू लागलीय. काही पक्षात नेताबदल, काहिंमध्ये राज्याभिषेक वगैरे चालू आहेत. पुढचे काही महीने सरकारकडून विविध आश्वासनांचे आणि केलेल्या कामाच्या जाहिरातीचे असतील तर विरोधी पक्षाकडून अपयशाचा पाढा वाचला जाईल. शुमश्चक्रीला लवकरच सुरूवात होईल आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर चिखलफेकीलाही ऊत येईल.

या पार्श्वभूमीवर आजच्या घडीला २०१४ च्या नि़कालाबद्दल काय वाटते याबद्दल इथे लिहूयात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झीपि,

१.
>> पण भाऊ म्हणजे ब्रह्मवाक्य नाही

अगदी बरोबर. म्हणून आपण परिस्थितीची चिकित्सा करूया.

२.
>> जुने दाखले देऊन असं पुन्हा होईल असं सांगणं हे दिवास्वप्न आहे.

मतदार कोणाला मत देतो हा प्रश्न आहे. जो सरकार चालवेल त्याला आणि त्यालाच तो मत देतो. १९६९ साली असेच आघाडीचे बिघाडी सरकार होते. सर्वत्र अस्थैर्य माजले होते. इंदिरा गांधींनी गरिबी हटाव म्हणून हाक दिली आणि १९७१ ला प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या. ही लाटेची निवडणूक होती. कुठला पक्ष आहे याच्याशी जनतेला देणेघेणे नव्हते. इंदिरा काँग्रेस आहे का जुना फुटलेला काँग्रेस का दावा पक्ष आहे कोणालाहे काहीही सोयरसुतक नव्हते. केवळ इंदिरा या एका नावावर लोकांनी मतदान केलं.

यानंतर १९७७ ची निवडणूकही लाटेचीच होती. मात्र ही लाट इंदिरा लाट नसून इंदिराविरोधी लाट होती. जयप्रकाश नारायणांच्या प्रेरणेने लोकांनी इंदिरेला आणीबाणीची शिक्षा द्यायचं ठरवलं होतं. १९८० ची निवडणूकही लाटेचीच होती. लोकांना जनता पक्षाच्या धरसोडपणाचा कंटाळा आला होता. इंदिरा काँग्रेसच धडपणे सरकार चालवू शकतो हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता. १९८५ चि निवडणूकही इंदिरा लाटेचीच होती. ही सहानुभूतीची लाट होती. तिचा फायदा राजीव गांधींना झाला. १९८९ पासून आजतागायत (२०१३) एकही निवडणूक लाटेची झालेली नाहीये. सगळ्या निवडणुका (१९८९, १९९१, १९९६, १९९८, १९९९, २००४, २००९) आघाडीच्या समीकरणांवर लढवल्या गेल्या आहेत. गेल्या ७ निवडणुकांत लाट अशी दिसून आलेली नाहीये.

आज नेमकी १९७० ची परिस्थिती आहे. आघाडीने शासकीय कारभाराचा पार विचका केला आहे. मोदींनी भारताला एक स्वप्न दाखवले आहे. ते किती खरेखोटे आहे त्याच्याशी जनतेला देणंघेणं नाही. आज मोदींची लाट येऊ घातली आहे. लाटेत भलेभले वाहून जातात. नेमकी हीच चिंता काँग्रेस, भाजप आणि डाव्यांना भेडसावते आहे.

असो.

हे सारं भाऊ तोरसेकरांचं विवेचन आहे. हे तुम्हाला पटलं पाहिजे असा आग्रह नाही. पण मला पटलं म्हणून मी उल्लेख केला आहे.

आ.न.,
-गा.पै.

बीजेपीमधील मतभेद मिटले नाहीत तर लोकांना हा चांगला पर्याय आहे असा विश्वास बसणार नाही
त्यामुळे त्या पक्षाने सर्व मतभेद बाजूला सारून मोदींच्या मागे उभे राहिले पाहिजे तरच एन्डिएचे सरकार येईल.
नाहीतर १९८९ सालच्या निवडणुकीनंतरची परिस्थिती संभवते.

ईव्हीएम बद्दलची जुनी चर्चा शोधतांना हा बाफ सापडला. आता दोन्ही पार्ट्या आपापल्या मुद्यांवर ठाम राहणार आहेत का ?

आता अशा बातम्या येताहेत आणि पूर्वी ईव्हीएम विरोधी असणारे समर्थन करताहेत. धमाल मनोरंजन चालू आहे.
http://www.mediavigil.com/tv/evm-fraud-in-madhya-pradesh/

Pages