खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साखरपुड्यात त्याचा मानपान बरोबर झाला नाही . Wink

अहो आंगठी प्रकरणामुळे, मग दुसर्‍या दिवशी मा ने सलिलबरोबरच्या शॉपिंगपेक्षा विकडून कोर्टातल्या हिअरिंगचा रिपोर्ट मिळवणं जास्त महत्त्वाचं ठरवलं. अजा बिजा झाल्यावर तिजा. सलिलला फोनवर टांगत ठेवून वि'ला फाइल शोधायला मदत केली.
खरं म्हणजे ती फाइल जिथे होती, ती सोडून सगळ्या जागा तिने सांगितल्या. तिचा हा अव्यवस्थितपणा त्याला खटकला. शिवाय सलिलच्या आईपेक्षा म्हणजे भावी सासूपेक्षा विच्या आत्याला जास्त घाबरत असल्याचं दाखवून दिलं, हेही त्याला खटकलं.

चला हवा येऊद्या मधे परत एकदा या मालीकेतील कलाकारांना बोलवल्यामुळे मला घाबरायला झालं आहे. अजुन किती दिवस चालणार म्हणजे ही मालीका. Uhoh

तसेच ती काहे दिया\नवर्‍याची बायको या टपराट सिरेली पण बंद करा राव. काय अत्याचार आहेत. :रागः

तसेच ती काहे दिया\नवर्‍याची बायको या टपराट सिरेली पण बंद करा राव. काय अत्याचार आहेत. :रागः >>> काल झी गौरव बघताना नव्या सिरियलचा प्रोमो दिसला. नक्की कुठली सिरियल बन्द होतेय?

मा ला जे कांय छोटसं काम मिळालं होत बाबा आमटे सिनेमात ते तिच्या विलक्षण अभिनयाने मिळालं की काय. >>> ती बाबा आमटे सिनेमात होती? त्या सिनेमात तर तेजश्री प्रधान होती ना.

ना..मा च्या घरी बराच संग्रह असल्याचे दिसते.. >>> हा नामा कोण?

संकर्षणचा अभिनय फार छान होतो आहे >>> +१. चला हवा येऊ द्या मधे संकर्षणने ज्या काही नकला केल्या त्या पण मस्त होत्या. विक्रांतने पण उषा नाडकर्णीची नक्कल भारी केली. मालिकेतच इतका कॉन्स्टिपेटेड चेहरा घेऊन का वावरतो कोण जाणे!

>>>>विक्रांत दळवी हा पुरुषांमधील अलका कुबल आहे अशी एक कमेंट फेसबुक वर वाचली Lol>>>> चपखल उपमा.....

सोमवारी मालाडच्या ओबेरॉय मॉल मध्ये विक्रांत आणि मोनिका ( मालिकेतली नाव ) दोघे दिसले. आधी मोनिका ( अभिज्ञा भावे ) एकटीच दिसली एका सलून मध्ये केस कापत होती का सरळ करत होती. काही तरी केसांच करताना दिसली नंतर तासाभराने दोघंही एकत्र दिसले मॉल मध्ये फिरताना. गंमत म्हणजे कोणी त्यांना ओळखलं हि नाही ना कोणी त्यांच्या कडे बघत होत . मी ओळखलं त्यांना ती गोष्ट वेगळी. दोघं प्रत्यक्षात छान आहेत दिसायला Happy

अभिज्ञा आणि तिचा नवरा यांची मुलाखत गुढीपाडवा निमित्याने एका न्युज चॅनेलवर होती. ती खूप बोलकी आहे, नवरा कमी बोलत होता रादर ती त्याच्याकडे माईक कमी देत होती, उत्साही आहे ती बोलायला. मस्त आहेत दोघंही.

काल आजीने वि च्या डोक्यावरून हात फिरवला.

इथेच मागे कमेंट होती ना वि आणि आजीचं नातं फुलवलं नाहीये जास्त ? कोणीतरी वाचत आहे का मालिकेशी संबंधीत का निव्वळ योगायोग ?

वाचत असेल तर - वि ने कोर्टात अशी मागणी केली आहे का की ईशाचा सांभाळ तो करणार आहे ? कारण घटस्फोट का हवा तर बायकोने फसवलं, मग तेचं मूल तो का सांभाळू इच्छीतो असा प्रश्न कोर्टाला पडणार नाही का ?

पण काहीही म्हणा...मला त्याने इशाची जबाबदारी घेणं अजिबात पटलेलं नाही!
त्याने विनाकारण काँप्लिकेशन्स वाढताहेत.

ह्या सिरेलीतले सगळेच लोक किती कूल आहेत ना.
मो दुसर्‍याच कुणाच्या तरी बाळाची आई तरी वि ने लग्न केलं. दुसरंच कुणाचं बाळ सांभाळायचीही जबाबदारी घेतोय.
वि च्या घरच्यानाही फार काही धक्का बसला नाही किंवा राग वैगेरे नाहीये मो बद्दल. सो कूल. इशाला सांभाळायाला तेही तयार.
आपल्या मुलाबद्दल हे असं काही घडलंय पण घरचे सगळे कूल.
आणि जिच्यामुळे घडलंय तिची बहीण ह्यांची लाडकी. तिचा साखरपुडा काय ठरवताहेत नी काय नी काय.
ते आजी आजोबा तर कूलेस्ट आहेत. एका नातीने असलं काही केलंय त्याचा धक्का बसणं तर दुरच. बाळाचा बाप कोणे? हे विचारणं पण जाउदेत. तिचा डीवोर्स होतोय हे ही एकदम सहज घेतलं त्यांनी. घरात डीवोर्स वैगेरे प्रकरण सुरुये आणि हे लोक वर मा चा साखरपुडा वैगेरे करतात.
हाउ कूल.

आणि मुख्य म्हणजे बाळही कित्ती कूल! रडत नाही की तमाशे करत नाही!!
इथे तर आपली मुलं..........सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात......... त्यातून ती इतकी तान्ही...तरी अगदी कूले !!!
आजकाल तर बाळ म्हणजे एक गाठोडंच दाखवितात....अगदी कळतं आणि मधे मधे इशाचे क्लोज अप्स आधीच घेऊन ठेवलेले.....

आजी आजोबा तर कूलेस्ट आहेत>>>सस्मित... अचूक निशाणा.... त्यांना हेही विचारावंस वाटलं नाही की सईल च्या अंगठीचे पैसे कुठून आले... मोनिका तेव्हा जॉब पण करत न्हवती ना... अर्थात मा ने ही विचारल नाहीये की पैसे आले कुठून... सगळेच बर्फागत थंडगार......

मला तर सगळच काहीच्या काही वाटत.
आपल्या नातीला झालेल मुल हे भलत्याच कोणाच आहे हे कळूनही आजी आजोबा शांत कसे?
त्या उप्पर ती त्या बाळाला अनाथाश्रमात ठेवायला निघाली होती हे सुध्दा ते कसं समजुन घेऊ शकतात?
त्या बाळाला कधी भुक लागत नाही का? ते कधी सु शी करतच नाही का?
इतक्या तान्ह्या बाळाला सोडुन आजी आजोबा देवळात, त्या पाठोपाठ वि च्या भरोशावर मा स बरोबर फिरायला आणि मो दिवसभर घराबाहेर कसे जाऊ शकतात?
सईलची अंगठी मो कशी खरेदि करु शकते ? त्याला किंवा मा ला पसंती विचारवी इतक साधं तिला कळु नये? त्यात मा ला आणि सईलला ही काही गैर वाटू नये?
मो कडे वि च क्रेडीट कार्ड कसं आलं?
आपल्या कार्डवर मो ने खरे दी केली हे कळुनही वि ला तिला काहीच विचारवसं वाटत नाही?
नानुमामा इतके थयथयाट करतात, त्यावर एकालाही अस म्हणावस वाटत नाही की "तु परस्पर तुझी मत सगळ्यांवर लादू नकोस'?

 >>>सईलची अंगठी मो कशी खरेदि करु शकते >> स्निग्धा अगदी मनातलं बोललात....म्हणजे जिचा साखरपुडा आहे तीला काहीही वाटत नाही... अंगठीचं बजेट डिज़ाइन किंवा हल्ली मचिँग सॉलिटेरस घेतात तस काहीच नाही... घरातल्या अतिशीत वातावरणामुळे एक मुलगी अति कॉन्फिडंट झालीये आणि दुसरीला काही कॉन्फिडन्स्च नाहीये सारखी आपली गोंधळलेली झोपाळलेली... शनाया म्हणते ना गुड फॉर नथिंग तशीच ....

त्या मानसी ला अ‍ॅक्टिन्गची एकच शेड येते,,, अतिव दु:खात डुबलेली! आत सलील म्हणतोय मला वेळ हवाय विचार करायला, मा त्याला प्रायोरीटी देत नाही, अरे ! आत्ता कळल का तुला?
सस्मित +१ या घरातले सगळे नक्कि कुठल मराठी कुटुब दाखवतात तेच मला कळत नाही? केकताच्या हॉरिबल फॅमिली ड्रामाचे स्वस्थ चित्ता सौम्य रुप दाखवतात.

या घरातले सगळे नक्कि कुठल मराठी कुटुब दाखवतात तेच मला कळत नाही?>>>> +१
भलत्याच कुणाचं तरी मुल पोटात घेउन आलेली नववधू, घटस्फोट वैगेरे गोष्टी इतक्या लाइटली घेणारं सोशिक सुसंस्कृत कुटुंब माझ्या तरी पाहण्यात नाही आलंय अजुन.

नानुमामा इतके थयथयाट करतात, त्यावर एकालाही अस म्हणावस वाटत नाही की "तु परस्पर तुझी मत सगळ्यांवर लादू नकोस'? >>> ती आजी कधी कधी दटावते ना त्याला.

केकताच्या हॉरिबल फॅमिली ड्रामाचे स्वस्थ चित्ता सौम्य रुप दाखवतात. >>> Lol

मोनिका आणि अलका येणार आहेत ना खवय्ये मध्ये? मग प्रश्न हा आहे की, सन्कर्षण कर्हाडे तिकडे सन्कर्षण बनून जाणार की सलील बनून? Uhoh मी त्या एपिसोडचा प्रोमो नाही पाहीला अजून म्हणून विचारतेय.

मुलांच्या परिक्षा आल्या आणि शर्वरी लोहोकरे नाटकाच्या दौर्‍यासाठी अमेरिकेला गेली आहे. त्यामुळे थोडे दिवस शूटींग करता येणार नसेल म्हणून ते बाहेर पडल्याचे दाखवलं असावं असं मातोश्रींनी सांगितलं Proud

शर्वरी आणि लोकेश नाटकाच्या दौऱ्यावर आले आहेत येथे ( US मध्ये). आमच्या अटलांटा ला मागच्या रविवारी "तीन पायांची शर्यत " चा प्रयोग झाला. नाटक छान आहे . दौऱ्यामधील हा पहिला प्रयोग होता. दौरा २ महिन्यांचा आहे असं दिग्दर्शकांच्या भाषणातून कळले. त्यामुळे "त्यांनी घर सोडून जाणे" हा नवीन ट्रॅक असावा या दोघांची अनुपस्थिती भरून काढण्यासाठी.

Pages