Submitted by राजेंद्र देवी on 27 March, 2017 - 23:14
आठवणींची गुढी....
लेऊन मोरपिसांच्या
आठवणींची साडी
मनात माझ्या आज उभी
तुझ्या आठवणींची गुढी....
मनाच्या टोकाशी
आठवणींचा पालथा घडा
मनाच्या अंगणी पडला
तुझ्या आठवणींचा सडा
कडुनिंबाच्या चैत्र पालवीला
फुलला आठवणींचा फुलोरा
बांधून प्रेमाची साखर गाठी
वाढवली त्याची गोडी
मनात माझ्या आज उभी
तुझ्या आठवणींची गुढी....
एकदा तरी डोकाउन बघ
माझ्या मनाच्या खिडकीत
दिमाखात उभी आहे
तुझ्या आठवणींची गुढी....
ये परतुनी पुन्हा वाढवू
आपल्या आयुष्याची गोडी
खोटी न ठरो ही आशा वेडी
मनात माझ्या आज उभी
तुझ्याच आठवणींची गुढी....
राजेंद्र देवी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर
सुंदर
छान!
छान!
तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद.... अक्षयजी आणी
धन्यवाद.... अक्षयजी आणी कावेरिजी....
राजेंद्रजी सुरेख लिहिली आहे
राजेंद्रजी सुरेख लिहिली आहे कविता.
तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
खूपच भिडली मनाला तुमची कविता.
खूपच भिडली मनाला तुमची कविता.
मस्तच.
मस्तच.
शार्दुलजी, वृंदाजी,
शार्दुलजी, वृंदाजी, पज्ञावतीजी... धन्यवाद...
सुरेख लिहिली आहे कविता.
सुरेख लिहिली आहे कविता.
धन्यवाद ललिताजी.. पण मला
धन्यवाद ललिताजी.. पण मला तुम्ही लिहलेली मैत्रीची गुढी प्रचंड आवडली...
खूप आवडली!
खूप आवडली!
धन्यवाद मंजुताई....
धन्यवाद मंजुताई....
आठवणींची गुढी कविता वाचली आणि
आठवणींची गुढी कविता वाचली आणि एक वर्षीपूर्वी केलेली मैत्रीची गुढी कवितेची आठवण आली...
धन्यवाद ....
छान
छान
छान
..
धन्यवाद शेखरजी....
धन्यवाद शेखरजी....