मिसरा त्यावर कमाल झाला ...

Submitted by कविता क्षीरसागर on 18 March, 2017 - 23:22

मिसरा त्यावर कमाल झाला ...

प्रश्न भुकेचा जहाल झाला
बेबस आत्मा हलाल झाला

ओठ रंगवुन खिडकी बसली
रस्ता जेव्हा दलाल झाला

फ्लॅट असू दे छोटासा पण
मजसाठी तो महाल झाला

एकेकाळी गजबजलेला
हा वाडा का बकाल झाला

ओलांडताच तिने उंबरा
नात्यांमध्ये बवाल झाला

जीव पोखरी प्रेमभंग पण
मिसरा त्यावर कमाल झाला

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह् कविताजी!
मतला आणि पहिला शेर खासंच!
शीर्षकाची ओळही आवडली!
फक्त काही ठिकाणी लय जरा ढळल्यासारखी वाटली!
अभिनंदन...शुभेच्छा!