खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल मानसी इशा ला घेउन दळवीन्च्या घरी गेली होती. पण तिच्याशी कुणी निट वागले नाही. मानसी ला पण डोकं नाही, विक्रांत ला इशाची आठवण येत होती तर तिला घेउन बाहेर भेटायचं. घरीच गेलं पाहिजे असं नाही ना.

ती मानसी मख्खा चेहर्यानी इशाला घेऊन इकडे तिकडे फिरत होती. मला जुन्या सिनेमातल्या हातात दिवे घेऊन फिरणार्या भुतीणी आठवत होत्या.

त्या मोनिकाला कुणीतरी बाळगुटी पाजायला पाहीजे, लय खप्पड दिसते राव ती. आणी डोळे तर बाहेर आल्यासारखे वाटतात. लिहु नये असे, पण खरच ती भुतनी दिसते.

विक्रांत ला इशाची आठवण येत होती म्हणून ती गेली का विक्रांतने ने सांगितलं म्हणून गेली? मला वाटत होत विक्रांतने तिला फोन करून सांगितलं कि ईशाला घेऊन ताबडतोब आमच्या घरी जा मी येतोच आहे . कारण अनाथ आश्रमात त्याचात आणि मोनिकाच्यात जो संवाद ( ???) झाला त्यावरून त्याने असा निष्कर्ष काढला कि मोनिका घरी जाऊन ईशाला इज़ा करणार ( म्हणजे चावे घेणं /चिमटे काढणं इत्यादी इत्यादी ) त्या पासून ईशाला वाचवायला त्याने मानसीला फोन करून ईशाला दळवींच्या घरी घेऊन जा असं सांगितलं कि काय ?

>>>त्या मोनिकाला कुणीतरी बाळगुटी पाजायला पाहीजे, लय खप्पड दिसते राव ती. ---हो ना. आणि अगदीच चेहर्‍यावरचे हावभावही हल्ली अतिच झालेत.

हा काय चावटपणा आहे? Angry
विक्र्या चे आई वडील, सलिल च्या घरी ते पण सलिल आणि मानसी चा सापु ठरवायला.
हाईट म्हणजे हे ठरवायला तिथे मानसी चे आज्जी आजोबा नाहितच, आणि मानसिला पण पत्ता नाही. सलिल ने फोन वर ही बातमी तिला सांगितली.
आणि सापु कधी तर परवा....

>>>>>इशाला दत्तक घ्यायचे सोडुन दळवींनी मानसीलाच दत्तक घेतलेय काय?>>>>>> अगदी अगदी +++++++१०००००० आता वि मा सहन होत नाही...इथले अपडेट्सच वाचत जाईन आता......वाचंल की मगं शेवटी कोणाची कळी कशी आणि केव्हा आणि खुलणार का नाही हे कळेल...

मला काही बेसिक प्रश्न पडले आहेत.
* दळवींचं हे कसलं एकत्र कुटुंब आहे? एका घरात राहून त्यांना विक्रांत च्या मनाची अवस्था कळत नाही?
* मो आणि वि च्यातला दुरावा सुद्धा त्यांना कळला नव्हता.
* आता वि आणि मा सुधा गरजेपेक्षा जास्त जवळ आहेत हे ही कुणाला कळ्त नाहीये.
* जरा अजुन प्रोग्रेसिव्ह होऊन मा लाच वि बरोबर लग्न कर अशी विचारणा करायला हवी ना ? का नुसतच आपण किती मोकळ्या मनाचे आणि विचारांचे आहोत याचा डंका पिटायचा? Uhoh
* तिकडे सलिल ची उगिचच ससेहोलपट का सुरू आहे? त्याला स्वतःची अशी मतंच नाहियेत. दर दोन एपिसोडला त्याला मा आणि वि च्या जवळिकीचे संकेत दिसतात आणि तो मनात त्याबद्दल विचार करतो, पण तोंड उचकटून मा शी मोकळेपणाने बोलून गैरसमज दूर मात्र करत नाही.
* आता तर सापु पण जवळ आलाय तर ही मा अशी विरक्त असल्यासारखी शून्यात हरवून बसली होती. बरं तिने आपण होऊन होकार दिलाय लग्नाला ना? आणि सलिल आवडला आहे तिला. इशाची काळजी साहजिक आहे, पण त्या काळजीने ग्रासल्यासारखं दिसणं गरजेचं नाही ना.
कळस म्हणजे प्रोमोत हार घालण्याच्या वेळी आंतरपाट दूर होतो तेव्हा मा चक्क इशाला सांभाळत उभी आहे असं दाखवलं आहे. इतकी अतिशयोक्ती? बाक्की सगळ्या बायका काय विहिरीवर पाण्याला गेल्यात का? Uhoh

कळस म्हणजे प्रोमोत हार घालण्याच्या वेळी आंतरपाट दूर होतो तेव्हा मा चक्क इशाला सांभाळत उभी आहे असं दाखवलं आहे. >> अग ते सलिलच स्वप्न असेल . मुद्दामून तस प्रोमो मध्ये दाखवतात. म्हणजे पुढे काय ?. पुढे काय ? अशी प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरायला . त्यातून पुढे सलिल आणि मानसीच लग्न मोडेल आणि नंतर आत्या बाई विक्रांत आणि मोनिकाचा घटस्फोट लवकरात लवकर व्हावा म्हणून पुढाकार हि घेतील आणि तो झाला कि विक्रांत आणि मानसीच लग्न व्हावं म्हणूनही प्रयत्न करतील Happy

दक्षिणा, तुझे पोटतिडिकीने विचारलेले सगळे प्रश्न पटतात! पण त्या झी वाल्यांना सिरेल चालवायची आहे... २-३ शे एपिसोड्स पुर्वीच्या दुर्दर्शन सारखे नाही १३ एपिसोड्सची मर्यादा! Wink

काय काय विचार करावा बिच्चार्‍या लेखकांनी! आणि मला वाटते काही भाग वेगवेगळे लेखक लिहीत असावेत त्या मुळे सतत गोंधळलेले प्रसंग दिसतात!

दक्षे... Happy
अगं असं लॉजीकल नसतं वागयचं कै सिरेलीत....तिथे कसं मूग गिळून, नुसतंच टकामका बघत बसायचं..किंवा मग आपापला टर्न आला की हसायचं, किंवा दचकायचं..किंवा विस्मित व्हायचं वगैरे वगैरे.....
आणि सईल चे वडिल कुठेयत..? त्यांचा काही उल्लेखच नाही?. ....
मुद्दामून तस प्रोमो मध्ये दाखवतात. म्हणजे पुढे काय ?. पुढे काय ? अशी प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरायला . ------ पण आपल्या सारखे प्रेक्षक आहेतच ना.... ते ऑलरेडीच पुढे काय ते प्रेडिक्ट करतात!

कळस म्हणजे प्रोमोत हार घालण्याच्या वेळी आंतरपाट दूर होतो तेव्हा मा चक्क इशाला सांभाळत उभी आहे असं दाखवलं आहे. >> मला तर ते धमाल विनोदी वाटलं. मी आणि नवरा खोखो हसलो ते बघुन.

काल झीच्या फेसबुकात गेलेले. तिथे काहींनी लिहिलंय शेवटी तुम्ही वि मा चंच लग्न दाखवणार मग कशाला हे सलीलशी साखरपुडा दाखवून वेळ वाया घालवताय आणि उगाच मालिका वाढवताय.

सलिल चे वडिल कुठायत असं पण लगेहात विचारून घे की अन्जु
म्हणजे नेक्स्ट एपिसोड ला सलिल चे बाबा जन्माला येतील Lol

मी स्वतः नाही लिहित तिथे, मी बघत नाहीना ही सिरीयल.

काल साबळेच्या prgm मध्ये हे सर्व आले होते. मी थोडा वेळ बघितलं. मोनिका गोड दिसत होती. ह्या टीमला दोनदा बोलावलं आणि चुक भूल वाल्यांना अजून नाही बोलावलं तिथे.

चुक भूल वाल्यांनी सांगितले असेल की आम्हाला गरज नाही तुमच्या हवेची....आम्ही समर्थ आहोत हवा करून घ्यायला...

झी जास्त प्रमोशन नाही करत, पोस्ट्स पण नसतात. नकटीच्या खूप असतात. मी कळवलं की चुकभुल छान आहे पण तुम्ही पोस्ट्स नाही टाकत त्याच्या.

चुक भूल वाल्यांनी सांगितले असेल की आम्हाला गरज नाही तुमच्या हवेची....आम्ही समर्थ आहोत हवा करून घ्यायला...>>> खरं आहे म्हणा.

मला वाटत कळी मालिकेचा टीआरपी थोडा घसरला असेल म्हणून हवा येऊ द्या मध्ये दुसर्यादि . शेवटी मालिका पण झी टीव्ही ची आणि " चला हवा येऊ द्या " पण झी टीव्ही चाच . त्यांना झी व्यतिरिक्त दुसरे पेड कार्यक्रम ( नाटक सिनेमाचे ) मिळाले नसतील म्हणून परत टीआरपी वाढवायला कळी दुसऱ्यांदा Happy

मला वाटत हा सापु वि ला मा विषयी काहीतरी जास्त वाटतय या चा ट्रिगर म्हणुन वापरणार. काल तो म्हणत होता ना मला आनंद का होत नाहोये आत्या

काल पुढे येणाऱ्या एपिसोडची जाहिरात दाखवली, सलील आणि मानसी चं लग्न चालू आहे आणि अंतरपाट काढल्यावर मानसीच्या हातात इशा (हा ड्रीम सिक्वेन्स असणार नक्की).. म्हणजे काय बहिणी आहेत बघा, एक लग्नाच्या वेळी पोटात बाळ, आणि दुसरी लग्नाच्या वेळी हातात बाळ!

गेल्या आठवड्यातले संवाद त्या पात्रांची मनोवस्था दाखवायला बरोबर होते. पण मानसी अगदीच हास्यास्पद झाली. आय लव्ह यू ला उत्तर थँक्यु. वर मी असं आधी कोणाला म्हटलं नाही.
मेडिकल कॉलेजात गेली होती की कोणत्या ऋषींच्या आश्रमात? की मेडिकल कॉलेज फक्त बायकांचं होतं.? की तिथे आणखी कोणी विद्यार्थीच नव्हते. तिला कोणी मित्रमैत्रिणी नाहीत.
आपण लग्न कशासाठी करायचं ते माहीत नाही.
हॉस्पिटलमधल्या प्रसंगात जाणवलं की नर्सची भूमिका करणारी अभिनेत्रीही मानसीच्या दहापट (खरं तर इन्फिनिटी, कारण मानसीच्या चेहर्‍यावरचा एकही स्नायू हलत नाही, त्यामुळे शून्याने भागायला हवं) चांगला अभिनय करते.

कालच्या भागात एडिटिंग गंडलेलं. पहिल्या सीनमध्ये दळवी निघालेत. मग सलिल आणि त्याची आईही तयार झालेत. (सलिलचे वडील नाहीत, असा अप्रत्यक्ष उल्लेख आला होता कधीतरी) तर तिकडे देशपांड्यांकडे कसलीच तयारी नाही. तोरण यायचंय, खानपान यायचंय, मानसीला तर आपल्याला तयार व्हायचंय हेच माहीत नाही.

मानसी विक्रान्त कसले नर्मदेतले गोटे आहेत अभिनयात, सतत उसासे कस्ले सोडतात?

ती मानसी केवढी बारिक आहे! अशक्त वाटते (अभिनयात आहेच)काहिवेळेस , प्रोमो म्हणजे सलिल च दु:स्वप्न होत तर... काय पण एक एक झीच्या कल्प्नना!! ... (मातोश्री आता बर्‍यापैकी पिसी ऑपरेट करतायत तेव्हा मालिका पासुन सुटका होइल लवकरच)

Pages