मुले आणि आपण ? ?? भाग १

Submitted by स्मिता द on 16 March, 2017 - 04:44

मुले आणि आपण ? ?? भाग १

मुले आणि आपण हा विषय कायम डोकावतोच कारण. आज मुलांचे वागणे बघितले , ऐकले , पेपर टी. व्ही मध्ये बातम्या वाचल्या तर मग मनात एक प्रश्नचिन्ह उभे राहते का असे होते? पुन्हा परत मग आपण लहान होतो तेव्हा असे नव्हते होत ना. असा विचार मनात येतो.
आज घरात तसं पाहिलं तर बहुतांश मध्यमवर्गीय घरात आर्थिक सुबत्ता आहे. कमतरता आणि अभाव फारसा दिसत नाही. घरातले आई बाबा दोघेही कमावत असतात. आता आई नोकरी करते या वरून आठवले माझी आई ही जॉब करत होती. दिवस भर आई बाबा बाहेर असायचे . पण मग आई बाबा आपल्याला वेळ देत नाही ही पोकळी फारशी जाणवली नाही. बऱ्याचा मित्र मैत्रिणीच्या आया जॉब करायच्या. बर्‍याचशा घरात आजी, आजोबा कोणी तरी असायचेच. पाळणाघरे सर्रास नव्हती. मी पाळणाघरात असायचे तेव्हा मला वाटायचे खूप आपल्या घरात आजी आजोबा नाही. अर्थात माझ्या बाबाचे आई वडील त्यांच्या लहानपणी गेल्या मूळे आम्हाला घरी असणारे आजी आजोबा हे सुख नव्हते.
आज मुलांना आपण ते मागतील ते देतोच. त्यांना जास्तीत जास्त चांगले मिळावे म्हणून धडपडतो. चांगली शाळा, चांगले क्लास, खेळाचे क्लास, हॉबीजचे काल, इतकेच काय संस्काराचा देखील क्लास. ..मग चुकते कुठे? मूले इतकी हट्टी. एककल्ली, खूपशी रिझवर्ड का होतात ? अर्थात घरात एखादे भावंड या पलीकडे कोणी नसल्या मुळे शेअरिंगची सवयच राहतं नाही. सगळे सहज आणि सढळ मिळत असल्यामूळे हा भाग आलाय का? मुले दुसर्‍यला समजावून घेणे यात कमी पडताहेत असे मला वाटते. त्यात अजून मोठा भाग मला जाणवतो की स्वभावात कमी ओलावा जाणवतो मुलांमध्ये दुसऱ्याबद्दल. ..हा मलाच जाणवणारा भाग आहे की आपण सगळ्या आई बाबा नाच नव्हे तर मोठय माणसाना हा बदल जाणवतो का ?.
घरात मोठी माणसे असणे ही आजच्या काळाची गरज झालीये. ती आपल्यासाठी नाही तर मुलांसाठी. कारण पाळणाघरे त्यांचे वास्तव बऱ्यापैकी आपण जाणतोच. अनुभव थोड्या फार फरकाने सारखा येतो आपल्याला. जिव्हाळा कमी आणि कर्तव्य जास्त असते तिथे. जी आजी किंवा आजोबा आपल्या दुधावरच्या सायीला जपतील तितकेच पाळणाघरात जपले जातीलच असे नाही. फरक पडतोच.
आजच्या वेगवाग आयुष्यामूळे आपल्याला अनेक चिंता , काळज्या, विवंचना असतातच पण कामाचे प्रेशर असते. वेळ तसा कमीच मिळतो. थकून भागून घरी आल्यावर फारसा वेळ आणि फारसा उत्साह उरत नाही. अश्या वेळेस बहुतेक त्यांना काय हवे ते आणून देणे हा मार्ग अवलंबला जातो . अर्थात हे सगळेच करतात असे नाही. मोर्ठ्यान्चा आदर करणे , लहानांना समाजावून घेणे, बरोबरी न करणे, कुणाला कमी न लेखणे , या गोष्टी आपण आधी कृती मग उक्ती अश्या दाखवतो का? मुले आपल्याला कॉपी करत असतात. मग अपलेच वागणे काहीवेळा चुकते का?
मुलाना महत्वाचे म्हणजे आपल्याला कोणीतरी म्हणजे घरातील व्यकीच वेळ देते, आपल्या मनासारखे वागते, हट्ट केला तरी छान हळुवार पणे समजावून सांगते, आपले कौतुक करते, शाबासकी देते , आपल्याला वेळ देते हे नक्कीच हवे असते. आपल्या खेळात सहभागी होते, हे हवे असते .
खूपदा जाणवते बालमानस बदलतेय. ते बदलेले बालमन जाणून घ्यायला कुठेतरी आपण कमी पडतो का? या मध्ये मी फक्त मुले आणि आपण हाच परिघ ठेवलाय..त्यात अजून गोष्टी अ‍ॅड होतीलच त्या टप्प्या टप्प्याने आपण बघूच. यात आता फक्त आपण
मुले आणि आपण दिलेला वेळ
मुले आणि आपण लावलेली शिस्त
मुले आणि आपण दिलेले संस्कार
मुळे आणि आपले दुसऱ्याबाबतचे वागणे
मुले आणि आपण दिलेलं भूतदयेचे धडे
मुले आणि आपण दिलेले विचार
याबाबत बोलू..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा विषय आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा.. अनेक अजून नव नवीन विषयासंबधी विचार वाचायला मिळतील म्हनुन मी प्रश्न चिन्ह टाकले आहे.

धन्यवाद कुरुडी आणि पद्मावती ....:)
प्रचंड आवाका आहे या विषयाचा --हो अवकाश मोठा आहे नक्कीच. पण दैनंदिन बाबातीत हे आपण योग्य प्रकारे कसे हाताळू शकतो यावर चर्चा व मते अपेक्षित आहेत.
कारण यातूनच आपण 'पालक 'या भूमिकेतून काय करावयास हवे हे चर्चेतून उलगडेल असे मला वाटते. Happy

राया, राजसी धयवाद..:)
हा भाग पूर्वी छान होते आता नाही किंवा रडणे , नकारार्थी होऊ द्यायचा नव्हता .
बर्‍याच गोष्टी आता बदलल्या आहेत , पर्यावरण बदलले तशी मानसिकता ही बदलायला हवी. मुलांच्या मानसाचा विचार अधिक व्हायला हवा. हा हेतू या लिखाणा मागील होता,

पुढील भाग लिहिला आहे त्यात बालमानसाचा विचार मांडला आहे.