जाऊ शकते-तीच जात!

Submitted by अत्रुप्त आत्मा on 16 March, 2017 - 02:14

म. टा. व्रुत्ता प्रमाणे एक नवीन कायदा येतोय.. 'अंतर्जातीय विवाहितांच्या संरक्षणाचा'. सदर कायदा हा आमच्या मते
अतिशय कौतुकास्पद निर्णय आहे.
https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17310118_1814617218860381_2113214286324950828_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=dd09ddc726cae9ec913d2f3f4c972085&oe=59586BDB
पण.....
'अंतर्जातीय विवाहितांच्या अपत्यांना (सरकारी कागदावर ) जात शिल्लक रहाणार नाही..किंवा आईवडिलांची अशी एकत्र मिळून त्याला ति सांगावी/नोंदवावी लागेल' असा तो आणखि वाढायलाही हवा आहे..कारण अंतर्जातीय विवाहाचा प्रमुख उद्देश जाती संस्था नष्ट करणे हाच आहे. पण सदर विवाहितांतंही आजपर्यंत अपत्त्याला फक्त बापाची जात लाउन दिली.. व आइच्या जातिला त्यात न येउ देण्याचा अप्रामाणिकपणा केलेला आहे. वास्तविक अश्या पालकांनी अपत्त्याची जात आपणहुन 'संमिश्र' सांगायला हवी. (आणी अपत्त्यातला बापाप्रमाणे "आईचाही वाटा" स्विकारायला हवा. )

आणी संमिश्र सांगायला हवी म्हणजे समाजात तरी 'तसं बोलायला' सुरवात करायला हवी. कायद्यानी कागदावर ती कधी तशी लागायची तशी लागो. कारण तसा कायदा झाला, तरी तो आपल्या 'मनात आला' तर जात मोडेल. आणी माझ्या अपत्त्याला 'मी कोकणस्थब्राम्हणपांचाळसुतार जातिचा आहे' असं सांगता येइल. पुढे त्याचाही विवाह अंतर्जातीयच घडला तर त्याच्या अपत्त्याची जात 'कोकणस्थब्राम्हणपांचाळसुतार+पुढे जो जोडिदार असेल त्याची जात' अशी सांगावी लागेल. आणी त्याचाही विवाह बहुश: आपोआप अंतर्जातीयच घडेल कारण त्याला 'कोकणस्थब्राम्हणपांचाळसुतार' असा दुसरा नामातसमानजातीजोडिदार (लगेच¡) मिळणारच नाही.आणी आपोआप किंवा पर्याय न राहिल्यामुळे विवाह अंतर्जातीयच घडेल.आणी जातीसंस्थेचं हे लचांड वाय्रावर उडणाय्रा धुळीसारखं सहज उडून जाइल. शिवाय जात सांगायला जड आणी समाज व्यवहारात निरर्थक झाल्यामुळे अश्या अपत्त्याला 'फक्त हिंदू' म्हणून सहजपणे रहाता/जगता येइल. (कारण जात हा घटक अनैसर्गिक/क्रुत्रिम पण सांस्कृतिक आहे. आणी हिंदूसमाजात तरी संस्कृति किंवा सांस्कृतिकता भरपूरप्रमाणात 'एकसमान' आहे)
शिवाय यामुळे हिंद्वेतर धर्मसमूहांना या 'फक्त हिंदू'ची दखलंही घ्यावी लागेल.
तद्वतच फुर्रोगामी आणी डाव्याउजव्या विचारवंतांचे-›दंभाचे (भारतीय)मार्केटंही बरेचसे आपोआप कोसळून पडेल. आणी
जातीनिर्मूलनाचा हा असा नवीन पायंडा पडला, तर आंम्हिही अभिमानाने म्हणू शकू.. "जाऊ शकते-तीच जात!"

Group content visibility: 
Use group defaults

Proud

जातीचा फायदा स्वतः वर्षानुवर्षे घेउन झाला.

आता दुसर्‍याना त्यांच्या जातीचा फायदा होतो अन स्वतःस स्वतःच्या जातीचा फायदा राहिला नाही ,तर जातीनिर्मूलन कसे योग्य आहे यावर गोलंदाजी सुरु झाली.

हिंद्वेतर धर्मसमूहांना या 'फक्त हिंदू'ची दखलंही घ्यावी लागेल.
Proud

म्हणजे हिंदवेतरांविरुद्ध हिंदुंचा कोरम ( गणसंख्या ) वाढवावा , म्हणुन जातीनिर्मुलनाचा अट्टहास ! किती उदात्त ध्येय हे !

हींदवेतरानी अगदी तुटपुंज्या १० % संख्याबळावरच देश सल्तनत चालवुन दाखवले आहेत.. संख्या वाढल्याची त्याना नगा भ्या घालू

गुरुजी, तुम्ही म्हणताय ती एक शक्यता आहे, रादर ते स्पेक्टरम चे एक टोक आहे, तसे झाले तर सोन्याहून पिवळे,
पण स्पेक्ट्रम चे दुसरे टोक म्हणजे कोकणस्थ-पांचाळ-सुतार ( for that matter any cast) आपल्या आपल्या लिमिटेड सॅम्पल स्पेस मध्ये जोडीदार शोधतील ,आणि त्याने इन ब्रीडिंग होईल, पारश्यासारखे.

मुळात आम्ही अमुक तमुक म्हणजे सगळ्यात ग्रेट असताना दुसऱ्या पोटजातीत जोडीदार शोधायला जावेच कशाला? हा मूळ प्रश्न मनातून जात नाही तोपर्यंत तुम्ही म्हणटाय ते होणे कठीण वाटते

@मुळात आम्ही अमुक तमुक म्हणजे सगळ्यात ग्रेट असताना दुसऱ्या पोटजातीत जोडीदार शोधायला जावेच कशाला? हा मूळ प्रश्न मनातून जात नाही तोपर्यंत तुम्ही म्हणटाय ते होणे कठीण वाटते. ››› ऒके. हे सगळे अनेक प्रयत्नांपैकी एक प्रयत्न आहेत. मुळात ज्याला जात सोडायचीच नाही,तो माणूस या ना त्या क्रुत्रिम प्रकारानी ती घट्ट करेलच. पण ज्यांना सोडून मानवतेकडे एक पाउल टाकायचय.. त्यांचं तर द्वार खुलं होइल.

शिवाय आपल्या या ( दुसऱ्या पोटजातीत जोडीदार शोधायला जावेच कशाला? ) प्रश्नाचं उत्तर असं, की त्याला स्वत: ची निर्माण झालेली तात्पुरती पोटजात स्वत: सोडून फारशी उपलब्ध च नसणार आहे . कारण मजसारखे दुसरे अनेक को. ब्राम्हण मुलगे पांचाळ सुतार जातीतल्या मुलिशी लग्न करून त्याच्यासाठी किती को. ब्रा. पां. सुतार जोडिदार उपलब्ध (करून) ठेवणार आहेत??? ह्या घटिताची शक्यता १ टक्का तरी आहे का? त्यामुळे मी वर म्हटल्याप्रमाणे त्याचा विवाह आपोआपच अंतर्जातीय होऊन जाणार आहे. हां.. अता माझं अपत्य जर स्वहट्टानी फक्त माझीच किंवा आईचीच जात लावून घेत स्वत: ला को. ब्रा. किंवा पां. सु. म्हणवून घेत राहिलं.. तर गोष्ट वेगळी. पण कायदा मी म्हणतो तसा कागदावर जरी आला,तरी त्याचा वेगळा निर्णय किमान कागदावर तरी नक्कीच हरेल.

फक्त जातच निर्मूलन करायचंय का आत्मबंध?
आणि धर्माच्या भिंती तशाच ठेवायच्याय्त का?

आमचा आंजा/आंध विवाह आहे.
शाळेत मुलांना जात लावूच नका अशी रिक्वेस्ट केली तर
'आमाला पॉवर नाही!' Wink
असे सांगून शेवटी त्यांच्या वडिलांची जात्/धर्मच नोंदविण्यात आली.
परवा समाज कल्याण विभागात काम करणारा एक पेशंट मला म्हणे 'मॅडम जात तुमची आणि डोमिसाईल इथलं असं कायतरी आत्ताच करून ठेवा मुलांचं, डबल बेनिफिट'
म्हणजे मागास विभागात (आमचा कर्नाटकातला स्पेशशल मागास भाग) मागासवर्गिय.

मी म्हटलं त्यापेक्षा 'अजात' जात लावायची काही व्यवस्था होत्येय का बघा समाजकल्याण खात्यातून.

बेनिफिट पण नकोत आणि तोटे पण नकोत.

@मी म्हटलं त्यापेक्षा 'अजात' जात लावायची काही व्यवस्था होत्येय का बघा समाजकल्याण खात्यातून.

बेनिफिट पण नकोत आणि तोटे पण नकोत. >>> हेच हवय.पन तिकडे इतक्या सरळपणे जाणारी मंडळी नाहीत. असतील..तर त्यांना तो मार्ग नसतील त्यांना हा..(आमचा) पण ज्याला ज्या गटातटातून इच्छा आहे,त्याला तिथला मार्ग निर्माण व्हायलाच हवा.
आणी धर्माचं म्हणाल तर त्या त्या दोन धर्मातल्या धर्म/समाज निर्मूलक जोडप्यांनी वरील संमिश्रतेची अट स्विकारायला हवी. आणी मग अश्या अपत्त्याला फक्त भारतीय म्हणून जगता/वागता यायला हवे..असं कोणाला हवं असेल..तर तेही मान्य.

>>>>>>
ला स्वत: ची निर्माण झालेली तात्पुरती पोटजात स्वत: सोडून फारशी उपलब्ध च नसणार आहे . कारण मजसारखे दुसरे अनेक को. ब्राम्हण मुलगे पांचाळ सुतार जातीतल्या मुलिशी लग्न करून त्याच्यासाठी किती को. ब्रा. पां. सुतार जोडिदार उपलब्ध (करून) ठेवणार आहेत??? ह्या घटिताची शक्यता १ टक्का तरी आहे का? त्यामुळे मी वर म्हटल्याप्रमाणे त्याचा विवाह आपोआपच अंतर्जातीय होऊन जाणार आहे>>>>>

हि तुमची बाजू झाली,
पण मुदलात आम्ही प्युर ब्रीड चे को ब्रा किंवा पांचाळ सुतार , मिश्र ब्रीड पेक्षा श्रेष्ठ अशा मानसिकतेत असणारी मुलगी (किंवा तिचे आई बाबा)को ब्रा सोडून कोब्रा पांचाळ सुतार मुलाकडे येतीलच का?
मुलगा भले लग्ना तयार असेल.
असो...
काही प्रयत्नाने का होईना जात निर्मूलन होणार असेल तर त्याला यश मिळो.

@को ब्रा सोडून कोब्रा पांचाळ सुतार मुलाकडे येतीलच का? ››› येतील की. प्रमाण कमी राहिल. पण येतील हे नक्की!

उत्तर प्रदेशच्या राजकारणात जात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. पण मागच्या काही वर्षांपासून या राज्यात गाडीच्या नंबर प्लेटवरुन जातीची ओळख सांगण्याचं एक नवीन फॅड आलं आहे. यादव, जाट, गुरजर, ब्राह्मण, पंडित, क्षत्रिय, लोधी आणि मौर्य अशा विविध जातींच्या नावाचे स्टिकर्स एसयूव्ही, कार, मोटरसायकल आणि अन्य गाड्यांच्या नंबर प्लेटसवर लावले जातात. त्यातून एक प्रकारचं सामाजिक वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न दिसतो.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/maharashtra-teacher-harshal-pr...

टोळीबाजी हा माणसाचा गुणधर्म आहे.जात नष्ट झाली तरी नविन व्यवस्था येईलच जी आर्थिक असेल ,शैक्षणिक असेल.

लग्नाच्या वरातीत दलितांनी पारंपरिक फेटे घातल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर लग्नाच्या वरातीवर दगडफेकही केली गेली आणि जातीवाचक शिवीगाळही करण्यात आला. यावेळी दगडफेक करणाऱ्यांना आणि शिवीगाळ करणाऱ्यांना वरातीतील काही मंडळींनी रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचाही हल्ला करण्यात आला, असा आरोप असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पारंपरिक फेटे घालू नका अन्यथा वाईट होईल, अशी धमकीही नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली. तसंच लग्न सोहळ्यात डीजे वाजवायचा नाही. एवढचं नव्हे तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली, असं दामोर यांनी सांगितलं.

https://maharashtratimes.com/india-news/accused-objected-wearing-safa-st...