विनोदी १

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 12 February, 2017 - 11:35

मस्तच! Lol
हे कुठले मंगरुळ आहे नक्की? पीर की दस्तगीर?

भाषा कुठली आहे ही?
>> बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरची ही बोलीभाषा आहे. ( प्रामुख्याने बुलढाणा, खामगाव, मेहकर, नांदुरा -शेगांवचा काही भाग आणि मुख्य म्हणजे आमचा चिखली तालुका.)

बुलढाणा जिल्हा विदर्भात आहे पण इथली भाषा वर्हाडीपेक्षा थोडी वेगळी आहे. बुलढाणा हे उंचावर वसलेलं आहे (घाट) घाट उतरल्यावर जे तालुके लागतात तो घाटाखालचा भाग. ( मोताळा, मलकापूर, वगैरे तालुके) इथून खानदेश जवळ असल्याने भाषेवर खानदेशी प्रभाव जाणवतो. थोडक्यात इथली भाषा म्हणजे वैदर्भी + वर्हाडि

घाटावरचे जे तालुके आहेत ( खासकरून चिखली, मेहकर) ते मराठवाड्याला जवळ असल्याने इथली भाषा म्हणजे वर्हाडी+ मराठवाड्याची भाषा ( जालना आणि औरंगाबाद जिल्हा)
कथेतील भाषा हीच आहे.

याच कारणामुळे असेल, आमच्या जिल्ह्यातील भाषा ओळखणे थोडं कठीण आहे.
मी अकोला, नागपूर भागात जातो तेव्हा लोक विचारतात तुम्ही मराठवाड्याचे का आणि औरंगाबादला जातो तेव्हा लोक म्हणतात तुम्ही वर्हाडातले का? :))

प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांची बारोमास नावाची साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी आहे. त्यातही हीच बोलीभाषा वापरली आहे. ( सरांचं गाव मंगरूळपासून पाच किमी अंतरावर आहे)

प्रसिद्ध लेखक रमेश इंगळे ऊत्रादकर हे कथेत उल्लेख आलेल्या पेठ या गावचे. त्यांच्या निशानी डावा अंगठा या कादंबरीत अशीच भाषा आहे. या कादंबरीवर अशोक सराफ, मकरंद अनासपूरे वगैरे कलाकार असलेला चित्रपटही येऊन गेला. पण विदर्भातील सर्वच जिल्ह्यांची भाषा वर्हाडी आहे असा दिग्दर्शकाचा समज झालेला असावा. म्हणून चित्रपटात अमरावती भागातील भाषा वापरण्यात आली आहे.

हे कुठले मंगरुळ आहे नक्की? पीर की दस्तगीर?
>> दोनीही नाही. हे मंगरूळ नवघरे आहे. चिखली खामगाव रस्त्यावर अमडापुर पासून फाटा जातो.
मंगरूळपीर वाशिम जिल्ह्यातील तालुका आहे. तिथली भाषा किंचितशी वेगळी आहे.

छान आहे कथा. कथेचा फ्लो पुढे जायला भाषेचा लहजा कुठेच आड येत नाहिये. मस्त, आवडली.

कथा मस्त फुलवली आहे ! एम ८० बंद करायला एक स्पे्शल बटन असतं, ते दाबलं की गाडी बंद होते. पण खरं आहे, साधारण कुणालाही गाडी बंद करायला अडचण यायचं कारण नाही, गिअरची गाडी तर नाहीच! ती सवय नसली की आपोआपच बंद पडते बर्याच वेळा Lol

मस्त लिहिलंय! निरिक्षणशक्ती झकास! मजा आली वाचायला Lol

(फक्त, एम-८० चे गिअर बदलायला डावं मनगट पिळावं लागेल ना? Wink )

फक्त, एम-८० चे गिअर बदलायला डावं मनगट पिळावं लागेल ना?
>> सॉरी, अनवधानानं चुक झाली होती. दुरुस्त केली आहे.
धन्यवाद Happy

चांगला प्रश्न विचारला.

धोंडे: छोटी फुगलेली कचोरी डोळ्यांसमोर आणा, असं समजा की त्यात पुरण भरलेलं आहे आणि ह्या गोड कचोऱ्या गावरान तुपात तळलेल्या आहेत. झाले धोंडे तयार.

दर दोन तीन वर्षांत एकदा धोंड्यांचा महीना येतो. तेव्हा आपापल्या जावयांना बोलावून धोंडे खाऊ घालण्याची पद्धत आहे.लग्नानंतरचा पहिला धोंड्याचा महीना असेल तर जावयाला नवीन कपडे करतात. ज्याची ऐपत किंवा इच्छा असेल ते चांदीचा धोंडा बनवून जावयाला देतात.

ही पद्धत बुलडाणा जिल्ह्यात आहे, इतर कुठल्या भागात आहे का माहित नाही. ही प्रथा का सुरु झाली तेपण माहित नाही :-/

अरे वा. हे नव्हतं माहित. आणी हा महिना कसा ठरवतात? आमच्याकडे अधिक महिन्यात जावयाला वाण देतात. अधिक महिनाच म्हणताय का तुम्ही?

आमच्याकडे अधिक महिन्यात जावयाला वाण देतात. अधिक महिनाच म्हणताय का तुम्ही?
>> बरूबर बरूबर. हाच त्यो मह्यना.
बादवे, तुमचा प्रदेश कोणता

"एम ८० बंद करायला एक स्पे्शल बटन असतं, ते दाबलं की गाडी बंद होते." हे बटन खराब झाले की गाडी खरच बंद होत नाही हा अनुभव वडिलांच्या एम ८० वर घेतलाय ( त्या वेळी गाडी वडिलच चालवायचे). लेख वाचुन खुप हसले. लेख वाचताना मनात एक शंका येत होती, मानक भाऊ गाडी बंद होत नाही तर परत वळुन दुकानावर यायच्या ऐवजी गावो-गावी फिरत का चालले आहेत ,ती शंका लेखाच्या शेवटी दूर झाली आणि मानक भाऊच डोक फार चालत अस म्हणत जाम हसले.

Pages