निवडणूक आणि Xयघाली गल्ली (विनोदी कथा)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 7 February, 2017 - 09:27

चांगली मांडलिये कथा. डोळ्यांसमोर उभी राहते सगळ्या पात्रांसकट. पण विनोदी नाही वाटली. शिव्या अंगावर आल्या.

मस्त! मजा आली वाचायला... विशेषतः भाषेमुळे डोळ्यांसमोर चित्र उभं राहिलं.

आमच्या गल्लीत अशी काही घटना घडली की मी सगळं पटापट लिहून घ्यायचो...शिव्यांसकट >>> __/\__

आमच्या गल्लीत अशी काही घटना घडली की मी सगळं पटापट लिहून घ्यायचो...शिव्यांसकट >>> __/\__
=>> गल्लीचा गुण नाही पण वाण लागणारच न
Proud Proud Proud

पण विनोदी नाही वाटली.
=>> कथेतील बोलीभाषा वाचकांच्या नेहमीच्या वाचनातील नसल्याने काही पंच पोहोचले नसतील असे वाटते. कारण आमच्या भागातील काही लोकांना वाचायला दिल्यावर त्यांना विनोदी वाटली.
किंवा यापेक्षा वेगळं कारणही असू शकेल.
कथा सर्वांना विनोदी वाटेल यासाठी कुणालाही काही सुधारणा सुचत असतील तर सांगाव्या. इथून पुढे अमलात आणता येतील Happy

शिव्या अंगावर आल्या
=>> होऊ शकतं. घटनेशी इमान राखावं आणि त्यावेळचा फील यावा म्हणून जशाच्या तशा टाकल्या ( तरी काही शिव्या गाळल्या आहेत. कारण त्या मी लिहू शकलो आणि वाचक वाचू शकले नसते)
पण आमच्यासकट गल्लीतल्या सर्वांना ह्या शिव्या ऐकायला common वाटायच्या. कान सरावले होते.

आदल्या दिवशी भांडणं करून आलेला गण्याचा बाप लय धुतल्या गेला.>>>>>>>>>>>>>>हे काही कळल नाही गण्याच्या बापाने कोणाशी भांडण केलं??????????
बाकी कथा आवडली Happy

गण्याचा बाप बाहेरून कुठूनतरी भांडण करून आला.
कोणाशी भांडला हे महत्वाचं नाही. आपल्या मुलाला भांडणं चांगलं नसतं असा उपदेश करणारा माणूस स्वतः मात्र भान्डखोर असतो हा विरोधाभास मांडायचा होता फक्त. Happy

शीर्षकामुळे टाळत होते. पण अगदीच रटाळ धागे पाहून हा उघडला आणि...
सार्थक झालं !!
जिवंत चित्रण पाहतोय असं वाटलं. शैली उस्फूर्त वाटली. अजिबात पांचटपणा नाही, पाचकळपणा नाही.. काही शब्द एरव्ही असांसदीय वाटले असते पण कथेच्या ओघात अगदी चपलख बसलेत.
आवडलंच

आवडली कथा. स्पेशली तुमची लिखाण करण्याची स्टाइल आवडली. ओढून ताणून काहीच नाही सगळ सरळ. पु.ले.शु.

कथा जबराट होती.., पण मला वाटतय की, कथेच्या शेवटी त्या 'तीन ऐतिहासीक घट्ना' देण्याची काहीच गरज नव्हती..., उगिच 'कन्फ्युस्ड' झाल्या सारखे वाटले...!!

बंबाट जमून आली हे गोष्ट पण....पण भौ नाव वर्जीनल टाकल्यान आफत नको यायल....हाहाहा..!! पण भारी लिव्हल राजेहो..