लावण्यवती मुंबई

Submitted by मध्यलोक on 25 January, 2017 - 07:13

स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन २०१७ च्या निमित्ताने मुंबईला येणे झाले. मनावर भुरळ घातल्या शिवाय मुंबई काही राहत नाही. प्रत्येक वेळेस काही तरी नवे दर्शन होतेच. ह्या ही वेळेस असेच काही झाले.

यंदाचे मुख्य आकर्षण होते ते "St जॉर्ज फोर्टचे", ह्याच नावाच्या दवाखाण्यात हा छोटेखानी किल्ला (त्याचे अवशेष म्हणा ना) आहे. मुंबईला असलेल्या परकोटाची हे सध्या अस्तित्वात असलेले अवशेष आहेत. पूर्वीचे हे दारुगोळा कोठार सद्य स्थितीत महाराष्ट्र शासनाचे "पुरातत्व व वस्तूसंग्राहालय संचालनालाय" म्हणून कार्यरूपात आहे.

मुंबईतील इतर किल्ले करण्याच्या बेत होता पण वेळे अभावी तो करता नाही आला. तो पुन्हा होईलच.

तर मुंबईत मारलेल्या फेरफटाक्याची हि काही क्षणचित्रे........

प्रचि १:
St जॉर्ज फोर्ट ( सध्याचे "पुरातत्व व वस्तूसंग्राहालय संचालनालाय")
16.JPG

प्रचि २:
St जॉर्ज फोर्ट ( सध्याचे "पुरातत्व व वस्तूसंग्राहालय संचालनालाय")
17.JPG

प्रचि ३:
18.JPG

प्रचि ४:
किल्लयाची मागील बाजू
19.JPG

प्रचि ५:
किल्लयाची मागील बाजू
20.JPG

किल्ला पाहून झाल्यावर मोर्चा पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल कडे वळविला आणि ह्या जागतिक वारसा स्थळा ची घेतली एक धावती भेट

प्रचि ६:
टर्मिनलला असलेले तावदान
1.JPG

प्रचि ७:
CST चे त्या वेळेचे चिन्ह
2.JPG

प्रचि ८:
CST च्या खांबावरील नकाशी
3.JPG

प्रचि ९:
CST च्या खांबावरील नकाशी
4.JPG

प्रचि १०:
CST ची कर्णिका
5.JPG

प्रचि ११:
घड्याळ
12_0.jpg

प्रचि १२:
महिरप
11_0.jpg

प्रचि १३:
CST
15.JPG

प्रचि १४:
भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल
14_0.jpg

ह्याच भागातील इतर काही वास्तू

प्रचि १५:
बृहन्मुंबई महानगर पालिका मुख्यालय
13_0.jpg

प्रचि १६:
राजाभाई टॉवर
6.JPG

प्रचि १७:
जुन्या धाटणीचे घर
7_0.jpg

प्रचि १८:
ताज होटेल
8_1.jpg

प्रचि १९:
गेटवे ऑफ इंडिया
9_0.jpg

प्रचि २०:
महाराष्ट्र विधानसभा
10_0.jpg

धन्यवाद _/\_

मुंबईतील किल्ल्यांची सफर लवकरच करूया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तंय आमची मुंबई Happy
सेपियामध्ये केल्याने जुनाट लूक छान आलाय.
त्या सीएसटीच्या जनावरांकडे कधी लक्ष गेले नव्हते. आता गेलो तर मुद्दाम त्यांच्यासोबत एक फोटो काढून येणार

मस्त!!

मुंबईतील किल्ल्यांची सफर लवकरच करूया
>>
लवकरच लिहा याविषयी

सुंदर फोटो.
माझी मुंबई. सुंदर मुंबई.
सगळ्या इमारती नेहमीच बघते पण कुणीतरी असं फोटो काढुन दाखवलं की खुप आनंद वाटतो बघताना.
सीएसटी किती सुंदर आहे.
किती दिवसापासुन सीएसटी स्टेशनची विझिट टुर करायची आहे.
सीएसटी, हुतात्मा चौक, फ्लोरा फाउंटन. फोर्ट एरिया, नरीमन पॉइंट, हॉर्निमन सर्कल, सेंट्रल लायब्ररी, लायन गेट, कुलाबा, गेट्वे, ताज, मरीन ड्राइव्ह, सगळं सगळं अतीव सुंदर आहे.

सगळ्यांचे धन्यवाद _/\_

जिप्सी भाऊ धन्यवाद

ऋन्मेSS श, हो, रेट्रो लुक साठी सेपिया टोन खूप छान दिसतो. वरील दिलेल्या व्यतिरिक्त बऱ्याच नकाशी आहेत आणि ह्या नकाशी गोष्टी सुद्धा उलगडून सांगतात. थोडा वेळ हाताशी ठेवून CST ची विशेष भटकंती करायला हवी

सस्मित CST अफाट सुंदर आहे

गमभन, सस्मित मुंबई किल्ल्यांच्या लेख येतोय लवकरच

मस्त

प्रचि नं १७:
या इमारती चे नाव काय आहे.

Submitted by सोमन on 8 August, 2018 - 17:06 >>>>>

प्रचि १७ मधील इमारतीचे वेगळे असे काही नाव मला माहिती नाही. साऊथ मुंबईतील हे एक घर आहे. गॉथिक (Gothic) - व्हिक्टोरिआन (Victorian) शैलीतील हे घर आहे. १९व्या शतकाच्या सुरुवातीला अशी घरे बांधण्यात आलेली आढळतात

मस्त !