मायबोलीच्या सॉफ्टवेअरची डागडूजी करण्यासाठी मायबोली २.५ दिवस बंद राहील.

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

या विकांताला मायबोलीच्या सॉफ्टवेअरचे उर्ध्वश्रेणीकरण (अपग्रेड) करणार आहोत. हे तुलनेने मोठे काम आहे. इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते.

त्या कामासाठी शुक्रवार १३ जानेवारी २०१७ संध्याकाळ ५ वाजेपासून (युस बॉस्टन वेळ) रविवार १५ जानेवारी रात्री १० वाजेपर्यंत मायबोली बंद राहील.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

ऋन्मेष चं कसं व्हायाचं?

आणी यक्दाचं ते उर्ध्व... -कैकीकरण झालं की २.५ दिवस तुंबलेले सगळे धागे तो एकदम सोडेल, मग आमचं कसं व्हायाचं? Wink

जोक्स अपार्ट, शुभेच्छा!!

शुभेच्छा.

दोन दिवस मिस करेन मी नक्की Happy

सर्व मायबोलीकरांना संक्रांतीच्या शुभेच्छा in advance ' तिळगुळ घ्या गोड गोड बोला '.

ऋन्मेष चं कसं व्हायाचं? >>> Lol

शूम्पी, गुळपोळ्यांच्या रेसिपीची आठवण केलीस ते बरं झालं! तेव्हढ्यासाठी अडायला नको. Wink

उर्ध्वश्रेणीकरण >>> एक नवा शब्द समजला.

उर्ध्वश्रेणीकरण या कामाकरता शुभेच्छा!

>>शूम्पी | 12 January, 2017 - 18:09
त्या गूळपोळीच्या रेसिप्या सेव करून ठेवा आधीच >> Lol दूरदर्शीपणा म्हणतात तो हाच.
अ‍ॅडमिन, तुम्ही ९ नोव्हेंबरला हे काम काढलं असतंत तर नोटबंदीचे दुष्परिणाम बीबीवर भक्त आणि विरोधक यांचं एकमत व्हायचा दुर्मिळ योग आला असता. Wink

मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नोटबंदीला ५० दिवस ज्या धैर्याने तोंड दिले तसेच माबोबंदी ला ही सगळे मिळून तोंड देऊयात. नव्या मायबोलीला शुभेच्छा !

नक्की काय अपग्रेड करणार? त्याने काय फायदे होतील याची माहिती मिळू शकेल का? सहज कुतूहल म्हणून विचारतोय.

@अ‍ॅडमिन

ऑर्कुटवर प्रतिसादांना क्रमांक दिसायचे. ही एक चांगली सोय होती. असे करता येईल का ?

Admin,
ते नको असलेले धागे दिसण्याबद्दल नाही फिचर टाकणार आहेत का?
"आवडते 10" सारखे "नावडते 25"

२.५ दिवस बंद? कसे होणार माबोकरांचे? सरकारने माबो हि अत्यावश्यक सेवा म्हणून जाहीर करणे आवश्यक आहे Lol असो. जोक्स अपार्ट. ऑल द बेस्ट फॉर अपग्रेड.

ता. क. जमल्यास ते धागाबंदीचं पण काम उरकून टाका ह्या घाईत. आणि लवकरच एखादा मेसेंजर पण सुरु करा. माबोंजर Biggrin

अपग्रेडेशनसाठी शुभेच्छा !!!!

मायबोलीसाठी एखादं मोबाईल अॅप सुरु करता येईल काय ???म्हणजे ब्राउजर मधून लॉग इन करण्याचा त्रास वाचेल आणि सतत मायबोलीवर रहाता येईल !!! Happy

मायबोलीच्या प्रशासकसंचाला उर्ध्वश्रेणीकरण साठी शुभेच्छा!

मकरसंक्रमणाच्या देखिल शुभेच्छा!

तिळगुळ घ्या गोड बोला!

Happy

ऋन्मेष चं कसं व्हायाचं? >>>>

तुम्ही नुसताच विचार करत बसा, इकडे आमच्या धाग्याचा ड्राफ्ट तयार पण झाला.

जुनी मायबोली v/s नवीन मायबोली

किंवा

अपडेटेड मायबोली- एक चर्चा !

५० तासांची माबोबंदी - माबोक्रांतीच्या निमित्ताने
असा धागा निघेलच. मग या माबोबंदीच्या कल्पनेमागील प्रेरणास्थान म्हणून अजून एखादे बोकील प्रकाशात येतील. कै सांगता येत नै बै हल्ली .

ते तेव्हढ ड्यूआयड्यांचा बंदोबस्त करता आला तर बघा या अपग्रेडेशनच्या निमित्ताने
एकतर रेफरन्स पॉलिसी ठेवा किंवा आधार नंबर/SSN/किंवा जे काही असेल ते लिंक करा आयडी ला!

नविनीकरणासाठी शुभेच्छा! Happy
कुणाचा प्रतिसाद आवडला कि त्या प्रतिसादाजवळच लाईकच ऑप्शन ठेवा. Happy
ड्युआयडींचा सुळसुळाट कमी करुन टाका. Proud

मस्त!! Best Luck!!

त्या गूळपोळीच्या रेसिप्या सेव करून ठेवा आधीच >> Lol

अनेक शुभेच्छा.
<< उर्ध्वश्रेणीकरण >>.. काय भारीत्तम शब्दं आहे. मला लगेचच वापरायचाय.
ढूढ्ढाचार्यासारखा चेहरा करून म्हणणारै - उर्ध्वश्रेणीकरण करायचय.

Pages