मायबोलीच्या सॉफ्टवेअरची डागडूजी करण्यासाठी मायबोली २.५ दिवस बंद राहील.

Posted
2 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago
Time to
read
<1’

या विकांताला मायबोलीच्या सॉफ्टवेअरचे उर्ध्वश्रेणीकरण (अपग्रेड) करणार आहोत. हे तुलनेने मोठे काम आहे. इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते.

त्या कामासाठी शुक्रवार १३ जानेवारी २०१७ संध्याकाळ ५ वाजेपासून (युस बॉस्टन वेळ) रविवार १५ जानेवारी रात्री १० वाजेपर्यंत मायबोली बंद राहील.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

शुभेच्छा
आणि मायबोलीचे बदललेले रूप बघायची उत्सुकता.
मो
बाईलवर वापरणार्‍यांना जास्त युजर फ्रेंडली झाले तर आवडेल Happy

एक शंका आहे, आधीचे सारे धागे कुठे दुसर्‍या जागी archive होणार का? की सारे आहे तसेच जागच्या जागी राहणार? सोमवारी उत्तर मिळेनच, तरी आपली एक उत्सुकता.

>>> लिंब्या, तुझ्याइतकी पुरातनप्रेमी मीही नाहीये फिदीफिदी <<<< Lol
बरोबर आहे, पुरातत्त्व हे तुझे "प्रोफेशन" आहे, तर माझा धर्म/पिंड आहे. इतका फरक असणारच ना? Wink

>>> तो ट्री व्यू काळाच्या ओघात वाहून गेला आता <<<< नाही, मुद्दामहून वहावला... तसा परत करताच येत नाहि असे नाही.... (मी प्रोग्रॅमर नसलो, तरी इतके कळते मलाही Proud ) मला तो ट्री व्ह्यु हवाच्चे. Happy

अडिच दिवस औटेज हे मायबोली आणि माबोकर दोघांच्याहि द्रुष्टिने सोयीचं नाहि. एक वेगळा बाॅक्स मेंटेनंस/अपग्रेड वगैरे करता असायला हवा; स्विच आॅन/आॅफ करुन प्राॅड बाॅक्सच्या जागी फ्लिप करण्याजोगा. काय खर्च लागेल त्यात हातभार लावायला माबोकर राजीखुशीने तयार होतील... Happy

डोन्ट नो मायबोली अ‍ॅमेझॉन क्लाउड वर आहे की नाही ते. पण तिथे खर्च अतिशय कमी होईल. अश्यातच मी एका मोठ्या कंपनीचे प्रपोझल केले, त्याच्या खर्च अतिशय कमी येत होता.

मे बी अजय / समिरने अ‍ॅमॅझॉन क्लाउड चा विचार केला नसल्यास करावा.

युनायटेड स्टेट्स ऑफ कोथरुड किंवा अन्य काही ठिकाणच्या नेटकॅफेमधे इमर्जन्सी मायबोली आउटलेट्स असावीत. रांग लावावी. प्रत्येकाला ४.५ मिनिटे मिळाली तरी पुष्कळ आहे. या निमित्ताने नेटकॅफेत गेट टूगेदर पण होऊन जाईल.

उर्ध्वश्रेणीकरण >>>

लईच भारी राव.... काय करनार हाईत कुनाला ठाव..पण "उर्ध्वश्रेणीकरण" आयकुनच भारी वाटाया लागलय.. Happy

एक मस्त नवीन मराठी शब्द समजला...आभार and best luck to upgrade..!!

Pages