पोलिसात आपल्यबद्दल खोटी तक्रार केल्यास काय करावे

Submitted by डॉली on 7 January, 2017 - 13:17

Namskar.
Mazi ek maitrin ahe. Tich lagna zalay ani tila ek lahan bal pn ahe. Ti tichya sansarat khup khush ahe.
Pan 2,3 varshapurvi ticha ek mitra hota ani tyache adhich lagna zale hote pn tyachya family la hya doghanbaddal sanshay hota. Kalantarane hich lagna zal ani doghe farase touch madhe nasatat.
Pan tya mulachya family madhe barech issue chalu ahet ani tyane family var case keli ahe mhanun tyachya baykone mazya maitrini var khoti case keliy ki mazi maitrin ani to mulga ata ekatra rahtat ani tyana ek bal ahe.
Tila kal Police call ala hota jodhpur madhun ani police vicharat hote ki interrogation karayach ahe. Amhi kadhi yeu. Hine sangital he khot ahe pn tari police mhantat amhi tumchyakade yeu tumhi marriage certificate dakhava ani sign kara.
Hila sasari ani navryala kahi kalu dyayach nahiy. Khup tension madhe ahe ti.
Jar kunala kahi marg mahit asel jenekarun tila police n samor hajar rahav lagnar nahi ani case close hoil tar pls help.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री चा सल्ला :
तुम्ही तुमच्या मैत्रीणीकडुन मैरेज सर्टिफिकेट ची कॉपी घेऊन , मैत्रिणीचा बाळासोबतचा एखादा फोटो , मैत्रिणीच्या लग्नाचा अल्बम घेऊन एखाद्या चांगल्या वकिलाला घेऊन पोलिस स्टेशनला जा व पोलिसांना वस्तुस्थिती समजावून सांगा .

Dhanyawad. Pn tyani complaint jodhpur madhe keliy ani hi punyat asate. To jodhpur wala police gharacha address magtoy kinva 24th jan la to punyat yenar ahe tevha bhetu mhantoy. Tine saral pune police station madhe documents submit keli tar chalel ka

डॉली,
फोन नक्की पोलीसांचाच होता ना याची आधी खात्री करा. फोन खरेच पोलीस स्टेशनवरुन केला असेल तर घरचा पत्ता का मागतील ? फोन नंबर असेल तर त्यावरुन पोलीस सहज पत्ता काढू शकतात. खरे पोलीस तुम्हाला कॉल करुन भेटायला येतो पत्ता द्या वगैरे म्हणत नाहीत. ते लोकल पोलीस स्टेशनचे सहकार्य घेवून तुमच्या घरी थडकतील. दुसरी गोष्ट म्हणजे कायद्यानुसार मित्राची बायको तुमच्या मैत्रीणी विरोधात तक्रार नोंदवू शकत नाही. अगदी व्यभिचारच्या केस मधे देखील विवाहित स्त्रीचा पती हा आपल्या पत्नीच्या प्रियकरा विरुद्ध तक्रार करु शकतो पण पत्नी विरुद्ध नाही. त्याच प्रमाणे व्यभिचारी पुरुषाची पत्नी आपल्या पती विरुद्ध किंवा त्याच्या प्रेयसी विरुद्ध तक्रार करु शकत नाही. चांगल्या वकिलाला घेवून लोकल पोलीस स्टेशनला जा. लग्नाचे सर्टिफिकेट, फोटो, बाळाचे फोटो वगैरे घेवून जा आणि मला असा हॅरॅसमेंटचा फोन आला आहे तर मदत करा असे सांगा. घाबरु नका. पुण्यातील स्त्रीयांना मदत करणार्‍या संस्था आहेत त्या देखील या प्रकारात मदत करतील.

Swati ji, kharach khup dhanyawad. To phone polisachach hota. Confirm kelay amhi tya mitrakadun.In fact to mhanala tyachya family ne polisana paise dile ahet may be case file keli sudhha nasel. Ani address cha tumacha point barobr ahe. Amhala pn to doubt ala. Kuthlya sanstha ahet te sangal ka please.

http://www.ncra.tifr.res.in:8081/WomenCell/helpline.html
http://www.narisamatamanch.org/
http://www.swadharpune.org/
या ठिकाणी मदत मागता येइल. अजून एक, मित्राशी पुन्हा संपर्क करु नका. पोलीस म्हणून काम करणार्‍या व्यक्तीने फोन केला म्हणजे तो कॉल ऑथराईज्ड इन्कायरीच आहे असे होत नाही. ती व्यक्ती अधिकाराचा गैरवापरही करु शकते. कुठल्याही परीस्थितीत पत्ता देवू नका. पुन्हा असा फोन आला तर घेवू नका/ काही न बोलता कट करा. जे काही बोलायचे ते वकिलामार्फत बोला. नवर्‍याला कळले तर काय म्हणून तुम्ही घाबराल आणि दमदाटी करुन पैसे उकळता येतील असाही प्लॅन असू शकतो.

मैत्रिणीचा नवरा मैत्रिणी बरोबरच राहत असेल तर त्याला कळू द्यायचे नाही असे धोरण का? प्रकरण थोडक्यात आहे तोवर त्याला नीट कल्पना देवून निस्तरलेलं बरे. नवर्‍यास सगळे सांगणे अवघड वाटत असेल तर संस्थेतील कौन्सेलर समोर बसून सांगता येईल का ते बघावे. (सासरी सांगण्याची आवश्यकता नाही, नवर्‍याने सांगितले तर - मला जे काही सांगायचे होते ते सगळं मी त्याला सांगितले आहे, इतरांशी डिस्कस करणार नाही असे नम्रपणे सांगून टाकावे). केस क्लोज होईल न होईल ते काही अंशी मित्राच्या बायकोवर आणि तिला मिळणार्‍या वकिली सल्ल्यावर आहे. पण त्या केसचा मैत्रिणीच्या संसारावर का ही ही परिणाम होणार नाही, अशी स्ट्राँग सिच्युएशन तयार करणे केवळ मैत्रिणीच्या हातात आहे.

त्या फोनकॉलचा कॉलर आयडीवरून क्रमांक घ्या. जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार देऊन ठेवा. पोलिसात ओळख निघाल्यास उत्तम. कुठल्याही परिस्थितीत वकिलाला कल्पना द्या. कायदेशीर मदत घ्या. नव-याला कल्पना देण्यासारखी परिस्थिती नसेल तर किमान माहेरच्या कुणालातरी विश्वासात घ्या. स्थानिक पोलीस आणि वकील काय करायचे ते सांगतील. स्थानिक पोलिसांच्या हद्दीत परराज्याचे पोलीस कोर्टाच्या आदेशाशिवाय हस्तक्षेप करू शकत नाहीत हे पक्के लक्षात ठेवा, त्यामुळे पुढच्या वेळेस कॉल आल्यास कुठल्या कोर्टाचे समन्स वगैरे आहे का याची माहिती घ्या. वकिलाला या माहितीचा उपयोग होऊ शकेल.

पण नव-यापासून लपवून हालचाली करणे शक्य होईल का याचा विचार तुम्हीच करायचा आहे. नाहीतर जेव्हां कुणकुण लागेल तेव्हां लपवाछपवी मुळे आतापेक्षा मोठे गैरसमज निर्माण होतील.

वरचे सगळे सल्ले लक्षात घ्या, पण एक ताबडतोब करण्यासारखी गोष्ट म्हणजे, जवळच्या पोलिस स्टेशन वर जाऊन एन सी द्या. एन सी म्हणजे एक साधे पत्र असते. अमूक एका नंबरवरून मला फोन आला होता, आणि त्यांनी पोलिस असल्याची बतावणी केली, तरी परत तो यायची शक्यता आहे वगैरे लिहा. दोन कॉपीज करा, त्यापैकी एकावर पोलिस सही करून देतील.

पोलिस असे फोन वगैरे करून येतील याची शक्यता कमी आहे. परत फोन आल्यास उचलू नका, आणि आलाच तर परत पोलिस स्टेशन ला कळवा.

वरच्या प्रतीसादांशी सहमत, धीर ठेवा व अजिबात अजिबात घाबरू नका म्हणा.

मला तर त्या मित्राचाच संशय येतोय, माहेरच्या लोकांची मदत घेणे, वडील व भाऊ खंबीर असतील तर त्यांना सांगा प्रकरण हाताळायला, फोन उचलू नका, पोलिसात ओळख असेल तर एखादा पोलीस, वकील हाताशी घेऊन उलटा दम टाका त्या पोलिसांवर...

पोलिस असे फोन वगैरे करून येतील याची शक्यता कमी आहे.>> +१११
खरे पोलीस तुम्हाला कॉल करुन भेटायला येतो पत्ता द्या वगैरे म्हणत नाहीत.>> स्वाती २ +१११

Dhanyawad. Ata ti maheri ahe delivery sathi. So tichya vatine dusare kuni polisat jau shakat ka? Mhanaje me kinva ticha bhau? Ani tyani kharach FIR kela ahe ka he kas kalel amhala? Asa pn doubt ahe ki tyane fakt ghabravnyasathi phone kela asel. Vakil nemane avashyakach ahe ka? Amhi vichar karat hoto ki tya polisacha parat call tar pudhchya halchali karu. Tumchya saglyanchya sangnyavarun tar asa vatatay ki amhi lagech polisat jayala have.

पोलिसात एन सी, तिच्या वतीने कुणीही करु शकेल. ( आई, बाबा, भाऊ वगैरे ) वकील आताच नेमू नका, पण एकाद्या वकिलाशी ओळख काढून ठेवा, गरज लागलीच तर फोन करू असे सांगा... आणि या नाजूक अवस्थेत या सगळ्याचा विचार करण्याची काहिही गरज नाही, तितके महत्वाचे नाही ते.

एफ आय आर जरी केला असेल, तर तिला त्यांची रितसर नोटीस येईलच ( चौकशीसाठी या वगैरे ) त्यावेळी वकिलाचा सल्ला घ्या. ते कलम बघून सांगतील.

शिवाय हे लक्षात असू द्या, पोलिंसासमोर दिलेली जबानी, कोर्टात ग्राह्य धरत नाहीत. कोर्टात शपथेवर जे सांगितले जाईल, तेच कोर्ट ग्राह्य धरते. त्यामूळे त्याची काळजी नको. एखादा गुन्हा दाखल झाला तर तो सिद्ध करायची प्राथमिक जबाबदारी फिर्यादी आणि जर तो पोलिसांमर्फत झाला असेल, तर पोलिसांची असते. त्यांना कोर्टात ग्राह्य धरले जातील, सिद्ध होतील, असे पुरावे द्यावे लागतात. नुसत्या सांगोवांगीच्या गोष्टी ग्राह्य धरल्या जात नाहीत.

माझे स्पष्ट मत आहे की तुमच्या मैत्रीणीने तिच्या नवर्याला विश्वासात घेऊन सगळे खरे सांगावे,अशा गोष्टी बाहेरुन कळल्यातर जास्त गैरसमज होतात.पोलिसात ओळख वगैरेचा जास्त फायदा होत नाही.चांगला वकिल गाठून खोट्या तक्रारीचा समाचार घ्यावा.

Amhala tya fir chi copy milali ahe. Tyamadhe lihilay ki Apr 2014 madhe tya doghani lagn kelay asa tyachya baykola kalal ahe. Ani mazya maitrinich lagna dec2015 madhe zalay. Ethe kahi issue yeu shakel ka? Ani to mitra ata mhantoy ki mala sagale. Proof de me changla advocate baghun case solve karun ghein

Khupach complicated. Purave de ase mitra swatach mhantoy. Asha mitra pasun adhi swatala sambhala. Mitra ajibat mitra sarkhe vagat nahiye.

Swatachya baykone takle ki case ha solve karun denaar...... Tyapeksha baykolach samjav mhanave. Dolly tumhi purn details n detaa ithe salle magat aahat.

Actually mala jevadh mazya maitrinine sangital tevadh me lihilay. Tya mitrachya against case keliy tyachya baykone ani tyat tyachya dishonesty cha proof mhanun mazyaa maitrinich nav lihilay ki to tichyabarobr rahat hota ani doghani 2014 madhe lagna kelay. Pn te khar nahiy. In fact mazi maitrin tyachyakade jat hoti pn anaitik sambandh navhate doghat. Tya mitrane diverse case file keli ahe mhanun he sagal chalu ahe. Ata tar malach kahi suchat nahiy. Maitrin khup radveli zali ahe. Ticha sansar udhwast hoil ka yachi bhiti vatatey tila.

मॅरेज सर्टिफिकेट आहे का त्या म्यारेजचे ? मग का काळजी करताय ? आधी त्याला तिच्याशी लग्न झाले होते हे तर सिद्ध करु द्या...

Mhanaje tyachya baykola he sidhha karav lagnar ahe ka? Ani nahi sidhha kel tar maitrinichya bajune case close hoil ka? Pls help. Kuni advocate ahe ka ethe? Mala maitrinichi awasths baghvat nahiy.

तुमच्या मौत्रिणीचे मित्राबरोबर काही फोटो वगैरे आहेत का जे त्याच्या बायकोच्या हातात लागले असतील? किंवा ग्रीटिंग, पत्र वगैरे?
जर असं काहीच नसेल तर घाबरायचं कारण काय?

डॉली. जो आरोप करतो त्याला आरोपासाठी पुरावे द्यावे लागतात. तेही सबळ. आपण लग्न केलं नाही ह्याचा कोणता पुरावा कोणी देऊ शकतं काय? केल्याचा देऊ शकतो. न केल्याचा काय पुरावा असतो? त्या दोघांचे एकत्र फोटो हा काही पुरावा होत नाही, लग्नाचाच फोटो हवा, मॅरेज सर्टिफिकेट हवे,

तो मित्र फारच संशयास्पद वागत आहे.

तुम्ही एक एक क्लू देत असल्यासारखी माहिती हळू हळू देत आहात. खरा काय तो किस्सा पूर्ण सांगाल तर व्यवस्थित सल्ला मिळेल. माझ्यामते आता घरच्यांपासून लपवून ह्या गोष्टी होणे शक्य नाही. बहुतेक माहेरी ह्याबद्दल काहीही माहित नाही असे दिसते.

Diverse?

डॉली,
केस तुमच्या मैत्रीणीच्या मित्राच्या विरुद्ध आहे. त्याचे तुमच्या मैत्रीणीशी लग्न झाले होते हे सिद्ध करायची जबाबदारी फिर्यादीची आणि पोलीसांची. असे कुणीही उठून म्हणेल की या दोघांचे लग्न झाले आहे. मित्राशी संपर्क तोडा. त्याला पुरावे वगैरे देत बसू नका. तो तुमच्या बाजूने नाही. त्याला त्याच्या घटस्फोटाच्या केसची काळजी आहे. त्या केसच्या बदल्यात त्याच्यावर बायकोने केस केलेय. त्या आरोपांचे खंडन करायला तो तुमच्या मैत्रीणीला लटकवतोय आणि आव असा आणतोय की मला पुरावे दे म्हणजे मी तुला यातून सोडवेन.
मैत्रीणीचा भाऊ तिच्या पाठीशी उभा रहायला तयार आहे ना? मग त्याला लोकल पोलीसांकडे जावू दे. विवाहित स्त्री, ती देखील एका बाळाची आई आहे. तिच्या संसारावर हे असे सावट आहे ही परीस्थिती पोलीसांना सांगितल्यावर पोलीसही सहानुभूतीने विचार करुन पुढे काय करायचे ते सांगतील. मी वर माहिती दिली आहे त्या पैकी कुठल्या संस्थेला /हॉटलाईनला संपर्क झाला का? घाबरु नका.
तुमचा खरा प्रॉब्लेन नवर्‍याला/सासरी कळू न देणे हा आहे. घटस्फोटाच्या केसेस मधे खूप गलिच्छ आरोप केले जातात. कारणाशिवाय संबंध नसलेली लोकं ओढली जातात हे लक्षात घ्या. नवर्‍याला विश्वासात घेतले तर या केसमधे घाबरण्यासारखे काहीच्न उरत नाही. खरे तर नवर्‍याच्या आणि भावाच्या मदतीने मनःस्तापाची आणि बदनामीची नुकसान भरपाई द्या म्हणून उलटी केस करायची धमकी द्यावी.

Dhanyawad saglyana.
Me amhi kay action ghenar ahot te sangate jar kahi kami jast asel tar please sanga
1. Saglyat adhi tichya bhavala vishwasat gheun case baddal mahiti denar ani tyala ekhada changala vakil shodhyala lavnar
2. Vakilasamor sagali baju mandnar
3. Marriage certificate, photo, balache birth certificate ect sagala proof mhanun dakhvnar.
Pan he punyachya police station la bhavane submit kel tar chalel na?
He sagal lagech karav ka ki tya polisachya call chi vaat baghavi?

Pages