Submitted by सत्यजित... on 30 December, 2016 - 17:59
हे बरे झाले तुझेही फावले...
ग्लास वेटरने तुझेही लावले!
टेबलावर स्नॅक्स होते फार पण...
नाव ओठांनी तिचे मी चावले!
फार नाही घेत मी थोडीच दे...
ओठ तृष्णेला अता लल्हावले!
मी जरासा झिंगलेला पाहुनी...
केवढे कुत्रे उरावर धावले!
वर्ष आले,वर्ष गेले..हे खरे...
'त्या' क्षणाच्या आत सारे मावले!
—सत्यजित
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त लिहिलंस सत्यजित
मस्त लिहिलंस सत्यजित सर...
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! ! !
सत्या तुला आणि संपदाला आणि
सत्या तुला आणि संपदाला आणि तुझ्या चिमुकल्यांना नविन वर्ष सुखासमाधानाचं आणि समृद्धिचं जावो