पक्ष्यांची दुनिया..

Submitted by रोहित ..एक मावळा on 13 December, 2016 - 09:23

किती रंग,रुप ...किती प्रजाती....
ही तर ईश्वराची गोड निर्मिती...

पहाटेच्या प्रहरी किलबिलाट करती....
जणु आळवतात देवाची सुरेल आरती...

होउन स्वार वार्‍यावर उड्डाण करती...
दाणा पाणी पिऊन मजेत राहती...

निसर्गाच्या सानिध्यात असते यांची वस्ती...
झाडे,फुले,वेलींबरोबर करतात घट्ट दोस्ती....

पक्ष्यांची दुनिया अनुभवुन वाढवु खरी श्रीमंती...
विसराल मग आयुष्यातली खोटी मतलबी नाती.....

चला तर मग पक्ष्यांच्या दुनियेच्या अनोख्या सफरीवर...

१. भारद्वाज ( Greater coucal )

२. शिळकरी कस्तुर , पर्वत कस्तुर (Malabar Whistling Thrush )

३. कवडा गप्पीदास(Pied bush chat male)

४.शेकाट्या ( Black-winged stilt )

५. बगळा (Great egret)

६. पाणकावळा (Great Cormorant)

७. शेकाट्या, पाणटिलवा, ढांगाळ्या ( Pied Stilt )

८. शिक्रा (Shikra )

९. छोटा खंड्या, धिंदळा (Common Kingfisher)

१०. ठिपकेदार मुनिया (Scaly-breasted Munia)

११. गप्पीदास, गोजा (Common Stonechat)

१२. वंचक, भुरा बगळा, कोक, ढोकरी, खरबा बगळा (Indian Pond Heron)

१३. पाणबगळा (little egret)

१४. कुदळ्या, पांढरा शराटी ( Black-Headed Ibis)

१५. तुतवार, तुतारी (Common Sandpiper)

१६. कुरव चोचीचा सुरय, हिवाळी सुरय (Gull billed turn)

१७. वेडा राघू (Little Green Bee-eater)

१८. चिमणी (sparrow)

१९.गांधारी, छोटा खाटीक( Bay-backed Shrik)

२०. लालबुड्या बुलबुल (Red-vented Bulbul)

२१. खंड्या, धीवर (White-throated Kingfisher)

मजा आली ना..
मग सिमेंट काँक्रिटच्या दुनियेतुन बाहेर पडा अन अनुभवा पक्ष्यांची रम्य दुनिया....

पुन्हा भेटु...

झाडे जगवा... पक्षी वाचवा

- रोहित ..एक मावळा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद लोक्स..
मायबोलीकर मातब्बर फोटुग्राफर लोकांकडुन मार्गदर्शन मिळाल आणि हा पक्ष्यांना फक्त कॅमेरात पकडण्याचा पहिलाच प्रयत्न केलाय.तुम्हाला आवडल अन तुमच्या प्रतिसादामुळे हुरुप आलाय.

गांधारी लय आवडली Lol
हायला लोक काय बघून नाव ठेवतील सांगता येत नाही.
रच्याकने गांधारीच्या नरला धृतराष्ट्र नाही म्हणत ना ????:P
apart from joke
फोटो खूपच सुंदर
अजून एका पक्ष्याचा फोटो असेल तर टाका 'चष्मेवाला'

"मायबोलीबर मातब्बर फोटुग्राफर लोकांकडुन मार्गदर्शन मिळाल आणि हा पक्ष्यांना फक्त कॅमेरात पकडण्याचा पहिलाच प्रयत्न केलाय.तुम्हाला आवडल अन तुमच्या प्रतिसादामुळे हुरुप "
..... मस्त फोटो आहेत. वाटत नाही पहिला प्रयत्न आहे अस. क्यामेरा कुठला आहे रोहित ?

Pages