देऊलमय रत्नागिरी

Submitted by प्रियान्का कर्पे on 3 December, 2016 - 02:01

प्रवास वर्णन लिहिण्यात एक वेगळीच गम्मत असते ती म्हणजे पुन्हा एकदा नकळत का होईना आपण तो प्रवास करतो. अगदी लहान लहान गोष्टी सुद्धा कागदावर येतात. सगळं काही आठवायला लागत. आठवायची गरज पण भासत नाही कारण माणसाला आठवण तेव्हा येते जेव्हा तो विसरतो. आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येकाला आपण तो प्रवास करवत असतो. आणि जेव्हा ऐकणारी माणसं संपतात, तेव्हा आपोआपच सांगणारा पेन आणि वही जवळ करतो. जसं आता मी केलय. रत्नागिरी चा प्रवास थोडक्यात.
प्रवासाला जाण्याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतात. प्रत्येकजण वेगळी स्वप्न रंगवत असतो. आजी आजोबा देव दर्शनाची तर लहन मुलं समुद्रावर खेळण्याची. पण जर या गोष्टी उलट घडल्या तर मज्जा येईल. आजी आजोबा समुद्रावर आणि लहान मुलं, डोळे बंद करून आणि हात जोडून देवळात. असंच काहीसं माझ्याही बाबतीत घडलं. तसं रत्नागिरी हे काही खूप मोठं ठिकाण नाहीये, नाही त्याची सर्वत्र चर्चा आहे पण अश्याच बहुचर्चित नसलेल्या, गावाच गावपण दाखवणाऱ्या, पर्यटक येणार म्हणून मुद्दाम न सजवलेल्या ठिकाणीच जाण मी पसंत करते. रत्नागिरी अगदी तसंच आहे. रत्नागिरी शहर जरी सुधारलेलं आणि शहरासारख वाटत असलं तरी आतली गावं अजूनही तशीच आहेत. शहरातल्या प्रदूषणापासून, आवाजापासून दूर जायचं असेल तर, रत्नागिरी हा खूपच चांगला पर्याय ठरू शकतो. ज्यांच त्या गावात कोणी नाही त्यांना सुद्धा गावच्या घरांची मज्जा अनुभवता येते. जागोजागी राहण्याची उत्तम सुविधा असते. उत्तम या साठी म्हटल कारण खोलीच्या खिडकीचा पडदा उघडल्यानंतर बिल्डींग्स न दिसता थेट झाडं, डोंगर दिसतात, ती शोधावी लागत नाहीत. आणि मग सुरु होतो प्रवास. रत्नागिरी हे खऱ्या अर्थाने देऊलमय आहे आणि म्हणून कदाचित इथलं वातावरण शांत आणि प्रसन्न आहे. स्वयंभू गणपती मंदिर जे गणपतीपुळे ला आहे, सर्वांच्याच परिचयाच आहे. सुंदर असं मंदिर आणि समोर समुद्र. या मंदीराच खास आकर्षण म्हणजे मंदिराभोवतीची प्रदक्षिणा. इतकी मोठी आणि मन प्रसन्न करणारी प्रदक्षिणा कधीच घातली नव्हती. परशुराम मंदिर, श्री भैरव देव मंदिर, लक्ष्मी केशव मंदिर, शिव मंदिर, दक्षिणमुखी मारुती मंदिर, मार्लेश्वर मंदिर तसंच स्वामी स्वरूपानंदांचा मठ ही रत्नागिरी ची काही खास आकर्षणे आहेत. सहलीला गेलो म्हणजे समुद्रा वर जाण आलंच. मंदिरांप्रमाणे रत्नागिरी चे समुद्र सुद्धा नारळांच्या झाडांनी, शांततेने, आकाशात उंच उडणाऱ्या पक्ष्यांनी समृद्ध आहेत. रत्नागिरी ने काही प्रमाणात इतिहास पण जपला आहे. खुद्द टिळक आणि केशवसुतांच घर तिथे आहे. रत्नदुर्ग किल्ला हा खऱ्या अर्थाने त्या काळची किल्ला संस्कृती दाखवतो. शिवाजी महाराजांचा पुतळा हे तिथलं खास आकर्षण. ही तांब्याची मूर्ती, सूर्याच्या किरणांनी अजूनच जास्त उठून दिसते. शिवाजी महाराजांचा थाट त्या मूर्तीतही दिसतो. किल्ल्यावरून दिसणारा समुद्र हा फक्त किल्ल्यावरुनच दिसू शकतो. किल्ल्यांबद्दल वाचण आणि ते प्रत्यक्षात अनुभवणं यात किल्ल्याएवढा फरक आहे.
लेखकाने किती हि मन ओतून लिहिलं तरी वाचक त्याला पाहिजे तेवढच घेणार पण निदान वाचनाने प्रभावित होऊन तो त्या ठिकाणाला भेट देईल आणि लेखकासाठी हि खूप आनंदाची गोष्ट असते.

प्रियांका करपे
priyankakarpe92@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे................
पु.ले.शु.!!!!!!!!!!!!!!

छान लिहिलंय!

समस्त रत्नांग्रिकरांकडून धन्यवाद तुम्हाला!

फोटो असतील तर ते पण टाका ना!

छान लिहिलंयत.

समस्त रत्नांग्रिकरांकडून धन्यवाद तुम्हाला!>> +१. Happy

फोटो टाका म्हणजे वाचणार्‍यांना पण तुमच्यासोबत फिरल्यासारखं वाटेल. Happy

फोटो टाका म्हणजे वाचणार्‍यांना पण तुमच्यासोबत फिरल्यासारखं वाटेल.>>>>+१११११११११११११११११११११११११११११

फोटो टाका म्हणजे वाचणार्‍यांना पण तुमच्यासोबत फिरल्यासारखं वाटेल. स्मित +११११११११