डिअर जिंदगी - नॉट ए रिव्यू - एक अनुभव

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 November, 2016 - 07:42

काल याच नोड नंबर वर मी धागा काढला होता, "डिअर जिंदगीच्या निमित्ताने - क्लास विरुद्ध मास !"
आज तो संपादीत केला, कारण आज माझ्या प्रश्नाचे उत्तर मलाच सापडले..,

आज जेव्हा चित्रपट बघून झाल्यावर मी गर्लफ्रेंडला फोन केला. तिने मला पिक्चर कसा आहे हे विचारले. आणि मी एवढेच म्हणालो, "क्लास मूवी आहे ! Happy ... क्लास !

येस्स!, मी गर्लफ्रेंडला बरोबर न नेता एकटाच गेलो होतो. आणि हा अखेरीस एक उत्तम निर्णय ठरला. कारण मुळात हा गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून बघायचा रोमांटीक चित्रपट नाहीच आहे. हा तुमच्या आयुष्यावर बोलणारा चित्रपट आहे. डिअर जिंदगी. जिथे तुम्हाला तुमच्या आयुष्यासोबतचे रोमांटीक नाते उलगडताना अनुभवायचे आहे तिथे ईतर कोणाची गरज काय. तुमची लाईफ हीच तुमची गर्लफ्रेंड.

(नाही म्हणायला माझ्या दोन्ही बाजूंना दोन प्रेमिकांच्या जोड्याच बसल्या होत्या. पण त्या दोन्ही मुलांची तोंडे आपापल्या जानूकडे असल्याने मला डिस्टर्ब करणारे असे कोणीच नव्हते.)

तर एका फार मोठ्या अफवेला उराशी कवटाळून मी हा चित्रपट बघायला गेलो होतो - चित्रपट संथ आहे !

घरात रोज संध्याकाळी आठ ते दहा टिव्हीसमोर बसून डेलीसोप बघणारे, पण चित्रपटाचे कथानक मात्र वेगवान असेल तरच पैसा वसूल आहे असे समजणार्‍यांच्या या मताला मान देत मी आपल्यालाही कंटाळा येऊ शकतो याची मनाची तयारी करूनच गेलो होतो. भारत-ईंग्लंड कसोटी क्रिकेट सामन्याचा आज निकाल लागणार होता, कंटाळा आलाच तर अधूनमधून त्याचा स्कोअर चेक करायचे हे ठरवले होते. पण प्रत्यक्षात मात्र ईंटरवलला सुद्धा मी त्या मॅचचा स्कोअर चेक करायला विसरून गेलो. एकटाच असल्याने कोणासाठी पॉपकॉर्न आणायचे नसल्याने जागेवरून उठणेही झाले नाही. तसेच ईतर चित्रपटांच्या दोनतीन ट्रेलर लागल्या, पण त्या आधीच यूट्यूब वर पाहून झाल्याने तितकेच कोरडेपणाने पाहिल्या गेल्या आणि चित्रपट सुरु होताच पुन्हा त्यात गुंतून गेलो. थोडक्यात चित्रपट कुठल्याही अ‍ॅंगनले स्लो, रटाळ, कंटाळवाणा असा कुठेही नाही. प्रत्येक दृश्यातून आलिया भट आणि तिचे आयुष्य उलगडत असल्याने आवर्जून बघितले जातेच. आणि जिथे शाहरूख पडद्यावर येतो तिथे तर नो कॉमेंटस!, स्क्रीनवरून लक्ष हटणे हा गुन्हा ठरतो.

अजून एक अफवा कम मिथ म्हणजे शाहरूखचे नेहमीचे चाळे यात नसल्याने त्यांच्या फॅन्सची निराशा होईल. मुळात शाहरूखचे फॅन्स हे शाहरूखचे फॅन्स असतात. तो पडद्यावर जी काही जादू करतो त्याचे फॅन्स असतात. जे निव्वळ चाळे बघायला जातात त्यांना शाहरूख काय आणि रणवीर काय. ते चाळ्यांचे फॅन्स असतात, कोणीही करून दाखवले तरी खुश होतात.

तर हा चित्रपट आलियाचाच आहे, पण यातून शाहरूखला तुम्ही वेगळे करू शकत नाहीत. एकतर त्याचे स्क्रीन प्रेझेंस असे काही जबरदस्त आहे, की तो कॅमेर्‍यासमोर घरच्यासारखा वावरला तरी ते लक्षवेधक असते. पण ही भुमिका देखील जर ईतर कोणीही करू शकला असता तर अश्या चित्रपटात शाहरूखसारख्या स्टारडम असलेल्या अभिनेत्याला घ्यायचे धाडस केले गेले नसते. माझ्यामते या आधीही शाहरूखने अश्याच पठडीतील भुमिका दोन चित्रपटांत साकारल्या आहेत. चक दे आणि मोहोब्बते. एकात तो प्रेम शिकवत होता, तर एकात खेळ, आणि ईथे जगणे.. फरक ईतकाच या तीनही चित्रपटांची जातकुळी वेगळी होती. त्यामुळे भुमिका साकारायची पद्धत त्यानुसारच वेगवेगळी.

चित्रपटाची स्टोरी मात्र मी सांगणार नाही. त्यात काही स्पॉयरल आहे म्हणून नाही तर ती तुम्हाला कुठेही सापडेल. पण चित्रपटात जी दाखवली आहे ती आलियाची स्टोरी आहे. त्या जागी तुम्ही तुमची रिलेट करू शकता. त्याच दृष्टीकोनातून चित्रपट बघू शकता. किंबहुना असेच होते. त्यामुळे चित्रपटात कुठेही आलियाचे पुढे काय होणार याचे टेंशन आपल्याला येतच नाही. एकदा का तिने आपला आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोन बदलला की तिचे चांगलेच होणार हे आपल्याला समजते. किंबहुना हे प्रेक्षकांना समजणे हेच या चित्रपटाचे यश आहे.

चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे ते यातली फिलॉसॉफी. जीवनविषयक तत्वज्ञान. आणि ते सुविचार म्हणून ऐकण्यावाचण्यापेक्षा चित्रपटासोबत उलगडले जाण्यात मजा आहे. आयुष्यात निवडलेला कठीण पर्याय विरुद्ध सोपा पर्याय, तसेच यातील कुर्सी का तत्वज्ञान सध्या सोशल साईटवर प्रसिद्ध झाले आहे. मला पुढचे जास्त आवडले. जेव्हा आलिया शाहरूखला म्हणते की ही खुर्चीची फिलॉसॉफी सर्वांनाच माहीत असती तर बरे झाले असते, कोणी कोणाला यावरून जज केले नसते, आणि त्यावर याची काय गरज म्हणत शाहरूखने दिलेले उत्तर! (मला या शॉटला थिएटरमध्ये काही महिला "बरोबर आहे" असे म्हणताना स्पष्ट ऐकू आले) असो, माझे आणखी एक फेव्हरेट म्हणजे शेवटी आलियाचे गुंतलेले मन बाहेर काढताना जेव्हा शाहरूख तिला समजावतो, कशी काही नाती आपल्याला विविध प्रकारचा पण ठराविक आनंद देण्यासाठीच असतात आणि त्या त्या ठिकाणीच त्यांची मजा असते, पण आपण मात्र या सर्व प्रकारच्या आनंदाच्या अपेक्षा आपल्या रोमॅंटीक रिलेशनशिपकडून म्हणजे लाईफ पार्टनर या एकाच नात्याकडून पुर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा करून त्यावर ओझे टाकतो.. वगैरे वगैरे.. अजून बरंच काही आहे, पण मुद्दाम ते सारे नेमक्या त्याच शब्दांत सांगत नाही अन्यथा ते स्पॉयलर होईल. कारण हाच चित्रपटाचा आत्मा आहे. चित्रपट तुम्हाला त्यासाठीच बघायचा आहे Happy

आलिया एवढी गोड आणि इनोसंट मुलगी आहे की तिच्यासाठी सर्वात कठीण अभिनय वल्गर आणि ईरीटेटींग दिसण्याचा असेल. तसं काही दिसायचे नसल्याने ईतर सर्व एक्स्प्रेशन दाखवत ती आपल्या भुमिकेला खाऊन टाकते. एवढे सहजपणे सारे येते की कुठेही तो अभिनय आहे असे वाटतच नाही. आणि हे शाहरूख तसेच आलिया दोघांनाही लागू होते,. त्यामुळे दोघांची एकत्रित द्रुश्ये ईतकी सहज चित्रित झाली आहेत की कोणी आपल्या अभिनयाने आणि अदाकारीने समोरच्याशी स्पर्धा करतेय असे कुठेच जाणवत नाही. या दोघांची ही केमिस्ट्री बघून एक मनात आल्यावाचून राहिले नाही, शाहरूखच्या ऐन तारुण्यात जेव्हा त्याला रोमांटीक हिरोच्या भुमिका शोभायच्या तेव्हा आलिया असती तर आपल्याला या दोघांचे काही धमाल चित्रपट अनुभवायला मिळाले असते.

ईतर सहकलाकार, संगीत, दिग्दर्शक गौरी शिंदे यांच्याबद्दल फारसे काही लिहिणार नाही कारण शीर्षकात नमूद केल्याप्रमाणे हे परीक्षण नाहीये Happy
तरीही ‘लव्ह यू जिंदगी’ या गाण्याचे बीट्स एवढे सही आणि रिफ्रेशिंग आहेत की जेव्हा आलियाचे ऑल इझ वेल होताना चित्रपटात ते गाणे वाजते तेव्हा आपलाही मूड लव्ह यू जिंदगी होतो.

जाता जाता - शाहरूखचा कमालीचा उत्कृष्ट ड्रेसिंग सेन्स आणि ते कॅरी करणे या चित्रपटातही जाणवल्यावाचून राहात नाही. त्याची जीन्स, शर्ट, वाढलेली दाढी या गेट अप मधून उभे राहिलेले जहांगीर खानचे कॅरेक्टर चित्रपट संपल्यावरही दृश्यम बनत आपल्या मनावर छापले जाते.. त्यामुळे शाहरूख फॅन्सनी त्याचे हे कॅरेक्टर पर्यायाने हा चित्रपट चुकवू नये. तसेच या चित्रपटानंतर आलिया भटचाही स्वत:चा एक फॅन क्लब व्हायला सुरुवात होईल हे नक्की Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Movie is very good ruru. Shah rukh has acted in an understated controlled manner. Must see. Aalia has done a great job.

देवकी, कलाकारांमध्येही चित्रपट शाहरूखच्या आधी आलियाचा आहे.

सपना, लेखात शाहरूख नावाची जुनी दारू आहे, पाणी नाही टाकले तर किक नाही लागणार Wink

अमा, धन्यवाद. आपल्या पोस्टवरून वाटते हा चित्रपट "क्लास" गटातील असावा Happy

बाकी, - धागा या चित्रपटाच्या निमित्ताने सुचला आहे, पण आहे मात्र मास आणि क्लास या विषयावरच

मास क्लास चं काही माहित नाही.
पण हा सिनेमा छान आहे.
सारुक्खान बराच बरा आहे यात.

अलिया भटचं काम मस्तं आहे.
Happy

आम्ही आपले नेहमी मध्यात पडणारे लोक आहोत.

आमची चॉईस कधी क्लासेसबरोबर जाते तर कधी मासेस बरोबर.

सिनेमा मस्त आहे...शाखाने अगदी मस्त mature काम केलय.. .. क्लास आणि मास असे कही नसते हो...कुणीही ह्या दोन गटाम्त आपापल्या सोयीप्रमाणे येऊन जाऊन असते...

काय वाचते ? रिव्यू नाहीये हा..
पण आताच मी मंगळवारच्या शो ची तिकीटे बूक केलीत.. हेच लिहायला ईथे आलेलो Happy

वर अमा माऊ साती यांनी सिनेमा आणि सोबत शाहरूखलाही चांगले म्हटलेय हे पुरेसे आहे... अलग अलग चोईस असणार्‍या महिला आहेत त्या.. त्यांच्या प्रतिसादाचा एवरेज बघून जा बिनधास्त Happy

शिर्षकात टाक हा रिव्यु नाही म्हणुन
>>>
काही लोकं रिव्यूच लिहितात पण तरीही शीर्षकात नॉट ए रिव्ह्यू असे लिहितात.. अशीही फॅशन आहे माबोवर.. त्यामुळे असे शीर्षकही कामाचे नाही.

मला हा मूवी आवडला. स्टोरीत नवीन काहीच नाहीच. सेन्सिबल विषय आहे तरी.

पण सारूकचा संयमित अभिनय आणि उगाच प्रत्येक फ्रेम मध्ये असण्या साठी अट्टाहास न्हवता.

उगाच तेच तेच वळण नाही घेतलेय. मला वाटल , डॉक अडकणार त्या नात्यात. पण नाही. . असो.

मला कुर्सी कन्सेप्ट आवडले खूपच. पिपल श्युड बी इग्नोर्ड.

-------

आता ऋ,

तुम्ही तुमचा लेख न वाचता टाकलाय का? किती ती मास आणि क्लास ची शाब्दिक मारामारी.

मूळात एखादी कला किंवा चित्रकृती उच्च आहे की फक्त मास अपील हे ठरवतच कोण? आणि मास का क्लास गटात बसायची इतकी उठाउठेव कशाला त्या जजमेंट ( उच्च वा मास अपील ह्या जजमेंट ) नुसार?

काही लोकं रिव्यूच लिहितात पण तरीही शीर्षकात नॉट ए रिव्ह्यू असे लिहितात.. अशीही फॅशन आहे माबोवर.. >>> Rofl

काही ब्लॉग लेखक आपला लेख परीक्षण या व्याख्येत बसेल कि नाही या काळजीपोटी नॉट अ रिव्ह्यू असं लिहीत असतात. पण म्हणतात ना अज्ञानात सुख असतं.. .. मी तर म्हणते कॉन्फिडन्स पण असतो.

खरंच रे ऋन्मेष !! तुझं कौतुक करणा-यां तुझ्या मैत्रिणींचंही कौतुक करायला हवं. मला तू मायबोलीचा संपूर्णेश बाबू बाटत होतास. पण तू तर ओरिजिनल निघालास...

मस्त आहे सिनेमा. मला पण आवडला. इतका इमोशनल भूतकाळ नसता तरीही अशीच वागू शकली असती ती, बरेच बघीतलेत! "अगदी अगदी" होतं कधीकधी Happy

काही लोकं रिव्यूच लिहितात पण तरीही शीर्षकात नॉट ए रिव्ह्यू असे लिहितात.. अशीही फॅशन आहे माबोवर.. >>>

एकच मारा पण क्या मारा!

मीठ मोहर्‍या रे ऋबाळा तुझ्यावरून!

मी पाहिला , मला तरी आवडला.
मुळात चित्रपट आलियाचा आहे . शाहरूखला अगदी २०% च प्रेझेन्स असेल , पण त्याने काम छान केलय . Happy

मला आवडला चित्रपट....बरेच दिवसांनी शाहरुख ने जरा शहाण्यासारखा चित्रपट स्वीकारुन शहाण्यासारखं काम केलय म्हणुन बरं वाटलं..
आलिया दिवसेंदिवस मला जास्तच आवडायला लागली आहे....

इतका इमोशनल भूतकाळ नसता तरीही अशीच वागू शकली असती ती, >> असं मला पण वाटलं...उलट असं वाटलं की ईमोशनल भूतकाळ जोडायला नको होता.त्यामुळे ही केस खुप स्पेसिफिक होउन जाते....सगळं ओके असुनही असं होउ शकतंच की.

शाहरुख चा कपडे पट अतिशय योग्य,वयाला शोभेसा आणि लेड बॅक आहे. कॉटनचे शर्ट व पँट. रुन्मेश तसे कपडे घेउन बघ. केस पण नीट जमले आहेत. आणि थोडे पांढरे ते शोभून दिसतात. अगदी साधी गोष्ट म्हणजे तिच्याशी बोलताना तो डोळ्यात औषध घालत असतो. व मग डोळे थोडे चोळून तिच्याकडे बघतो. पन्नाशी उलटली की अश्या काही विचित्र सवई आपोआप येत जातात वागणुकीत. ते त्याने बरोबर दाखवले आहे. ते मला जाम आवडले.

त्याच्या ऑफिसातील वस्तू, तो जग. अगदी साधा पांढरा व वर झाकण ठेवलेला. हे त्याचेच प्रतीक आहे. कायम तो तिच्यात इन्वॉल्व्ह होत नाही. प्रोफेशनल सभ्यतेत बसत नाही हे क्लीअर करतो. हे शाहाणपण पण एका वयानंतरच येते. त्याचे घर आणि इतर भाग खूप रस्टिक व छान आहे. त्यामानाने आलियाचे घर व आईबाप गोवेकर वाट्त नाहीत. आलियाचे कपडे व दिसणे एकदम रॉकिंग आहे. चेहरा हलता आहे.

दीपिका मला आव्डत नाही कारण ती मॉडेल दिसते. अ‍ॅक्ट्रेस नाही. साहा फूट उंचीचा झाडू आहे. निव्वळ.
चांगले कपडॅ व मेकप करून सुंदर दिसते वाद नाही. पण अ‍ॅक्टिंग काहीच नाही. कुठेच नाही. मस्तानी पण तेच एक्स्प्रेशन्स पद्मावती पण तीच मॉडर्न मुलगी पण तीच सर्वत्र तेच. आलिया त्यामानने बघा चेहरा हलता आहे. वया प्रमाणे कामे घेत जाते. व्हल्नरेबल दिसू शकते.

चित्रपटाचा क्लायमॅक्सचा सीन अतिशय अंडरस्टेटेड आहे. तेव्हा शाहरूखचे एक्स्प्रेशन्स म्हणजे अगदी कमाल. त्याला तिला बोलत बोलत इथपरेन्त आणायचे होते पण अगदी घाई न करता, तिच्या स्पीडने.
व मग ते सर्व तिच्या समोर मांडून तो अलिप्त होतो. चित्रपट बघताना मी विशीतली एक मुलगी पण होते आणि पन्नाशीतली एक व्यक्ती पण. ही प्रक्रिया खूप एंजॉएबल आहे. म्हणूनच आपण चित्रपट बघतो कि नाही.

व मग ते सर्व तिच्या समोर मांडून तो अलिप्त होतो. चित्रपट बघताना मी विशीतली एक मुलगी पण होते आणि पन्नाशीतली एक व्यक्ती पण. ही प्रक्रिया खूप एंजॉएबल आहे. म्हणूनच आपण चित्रपट बघतो कि नाही.
>>

मस्तं प्रतिक्रीया!

आणि मी पेशंटही होते आणि डॉक्टरपण!

छान सिनेमा आहे.
पहावाच सगळ्यांनी एकदा.

(आमच्या गावात फ्लॉप गेला.)

अमा, काय मस्तं लिहिलंय तुम्ही. मूळ लेखापेक्षा मला तुमचा प्रतिसाद जास्त आवडला.
आणि रिया, बघ मुव्ही, आवडेल तुला, मला तर खूप आवडलाय. आलिया दिवसेंदिवस जास्त आवडायला लागलीये आणि शाहरुखला तर २०% स्क्रीन प्रेझेन्स असला तरी जेवढे काम आहे तेवढे मस्त आणि समरसून केलंय.

मुद्दाम तिकीट काढून बघावा असा नाही. लागला केबल्/नेटफ्लिक्स वर तर सोडू नये.
भूतकाळाचा वर्तमानावर प्रभाव व त्यामुळे उत्तम भविष्याकाळाचा अभाव ह्या आशयाचा सिनेमा बघायचाच असेल आणि हलते चेहरे हवे अशी अट असेल तर थेट गुडविल हंटींग बघावा. आशय पोहोचवण्यात गौरी शिंदेचा इंग्लिश-विंग्लिश अगदी सहज होता, इथे प्रयत्न जाणवतो.

संपूर्णेश बाबू >> सपना, कोण हा?

सस्मित, उद्या जाणारेयच

अमा छान पोस्ट

तर थेट गुडविल हंटींग बघावा. >> हा हिंदी आहे का? नसल्यास असा याआधी हिंदीत आलेला चित्रपट सुचवाल Happy

रसप केले, धन्यवाद, तरी मला शंका होतीच .. किंबहुना उद्याही मी चित्रपट पाहताना हिंदीत लिहिलेले नाव जिंदगी आहे की झिंदगी हे आवर्जून बघणार होतोच Happy

Pages