डिअर जिंदगी - नॉट ए रिव्यू - एक अनुभव

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 November, 2016 - 07:42

काल याच नोड नंबर वर मी धागा काढला होता, "डिअर जिंदगीच्या निमित्ताने - क्लास विरुद्ध मास !"
आज तो संपादीत केला, कारण आज माझ्या प्रश्नाचे उत्तर मलाच सापडले..,

आज जेव्हा चित्रपट बघून झाल्यावर मी गर्लफ्रेंडला फोन केला. तिने मला पिक्चर कसा आहे हे विचारले. आणि मी एवढेच म्हणालो, "क्लास मूवी आहे ! Happy ... क्लास !

येस्स!, मी गर्लफ्रेंडला बरोबर न नेता एकटाच गेलो होतो. आणि हा अखेरीस एक उत्तम निर्णय ठरला. कारण मुळात हा गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून बघायचा रोमांटीक चित्रपट नाहीच आहे. हा तुमच्या आयुष्यावर बोलणारा चित्रपट आहे. डिअर जिंदगी. जिथे तुम्हाला तुमच्या आयुष्यासोबतचे रोमांटीक नाते उलगडताना अनुभवायचे आहे तिथे ईतर कोणाची गरज काय. तुमची लाईफ हीच तुमची गर्लफ्रेंड.

(नाही म्हणायला माझ्या दोन्ही बाजूंना दोन प्रेमिकांच्या जोड्याच बसल्या होत्या. पण त्या दोन्ही मुलांची तोंडे आपापल्या जानूकडे असल्याने मला डिस्टर्ब करणारे असे कोणीच नव्हते.)

तर एका फार मोठ्या अफवेला उराशी कवटाळून मी हा चित्रपट बघायला गेलो होतो - चित्रपट संथ आहे !

घरात रोज संध्याकाळी आठ ते दहा टिव्हीसमोर बसून डेलीसोप बघणारे, पण चित्रपटाचे कथानक मात्र वेगवान असेल तरच पैसा वसूल आहे असे समजणार्‍यांच्या या मताला मान देत मी आपल्यालाही कंटाळा येऊ शकतो याची मनाची तयारी करूनच गेलो होतो. भारत-ईंग्लंड कसोटी क्रिकेट सामन्याचा आज निकाल लागणार होता, कंटाळा आलाच तर अधूनमधून त्याचा स्कोअर चेक करायचे हे ठरवले होते. पण प्रत्यक्षात मात्र ईंटरवलला सुद्धा मी त्या मॅचचा स्कोअर चेक करायला विसरून गेलो. एकटाच असल्याने कोणासाठी पॉपकॉर्न आणायचे नसल्याने जागेवरून उठणेही झाले नाही. तसेच ईतर चित्रपटांच्या दोनतीन ट्रेलर लागल्या, पण त्या आधीच यूट्यूब वर पाहून झाल्याने तितकेच कोरडेपणाने पाहिल्या गेल्या आणि चित्रपट सुरु होताच पुन्हा त्यात गुंतून गेलो. थोडक्यात चित्रपट कुठल्याही अ‍ॅंगनले स्लो, रटाळ, कंटाळवाणा असा कुठेही नाही. प्रत्येक दृश्यातून आलिया भट आणि तिचे आयुष्य उलगडत असल्याने आवर्जून बघितले जातेच. आणि जिथे शाहरूख पडद्यावर येतो तिथे तर नो कॉमेंटस!, स्क्रीनवरून लक्ष हटणे हा गुन्हा ठरतो.

अजून एक अफवा कम मिथ म्हणजे शाहरूखचे नेहमीचे चाळे यात नसल्याने त्यांच्या फॅन्सची निराशा होईल. मुळात शाहरूखचे फॅन्स हे शाहरूखचे फॅन्स असतात. तो पडद्यावर जी काही जादू करतो त्याचे फॅन्स असतात. जे निव्वळ चाळे बघायला जातात त्यांना शाहरूख काय आणि रणवीर काय. ते चाळ्यांचे फॅन्स असतात, कोणीही करून दाखवले तरी खुश होतात.

तर हा चित्रपट आलियाचाच आहे, पण यातून शाहरूखला तुम्ही वेगळे करू शकत नाहीत. एकतर त्याचे स्क्रीन प्रेझेंस असे काही जबरदस्त आहे, की तो कॅमेर्‍यासमोर घरच्यासारखा वावरला तरी ते लक्षवेधक असते. पण ही भुमिका देखील जर ईतर कोणीही करू शकला असता तर अश्या चित्रपटात शाहरूखसारख्या स्टारडम असलेल्या अभिनेत्याला घ्यायचे धाडस केले गेले नसते. माझ्यामते या आधीही शाहरूखने अश्याच पठडीतील भुमिका दोन चित्रपटांत साकारल्या आहेत. चक दे आणि मोहोब्बते. एकात तो प्रेम शिकवत होता, तर एकात खेळ, आणि ईथे जगणे.. फरक ईतकाच या तीनही चित्रपटांची जातकुळी वेगळी होती. त्यामुळे भुमिका साकारायची पद्धत त्यानुसारच वेगवेगळी.

चित्रपटाची स्टोरी मात्र मी सांगणार नाही. त्यात काही स्पॉयरल आहे म्हणून नाही तर ती तुम्हाला कुठेही सापडेल. पण चित्रपटात जी दाखवली आहे ती आलियाची स्टोरी आहे. त्या जागी तुम्ही तुमची रिलेट करू शकता. त्याच दृष्टीकोनातून चित्रपट बघू शकता. किंबहुना असेच होते. त्यामुळे चित्रपटात कुठेही आलियाचे पुढे काय होणार याचे टेंशन आपल्याला येतच नाही. एकदा का तिने आपला आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोन बदलला की तिचे चांगलेच होणार हे आपल्याला समजते. किंबहुना हे प्रेक्षकांना समजणे हेच या चित्रपटाचे यश आहे.

चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे ते यातली फिलॉसॉफी. जीवनविषयक तत्वज्ञान. आणि ते सुविचार म्हणून ऐकण्यावाचण्यापेक्षा चित्रपटासोबत उलगडले जाण्यात मजा आहे. आयुष्यात निवडलेला कठीण पर्याय विरुद्ध सोपा पर्याय, तसेच यातील कुर्सी का तत्वज्ञान सध्या सोशल साईटवर प्रसिद्ध झाले आहे. मला पुढचे जास्त आवडले. जेव्हा आलिया शाहरूखला म्हणते की ही खुर्चीची फिलॉसॉफी सर्वांनाच माहीत असती तर बरे झाले असते, कोणी कोणाला यावरून जज केले नसते, आणि त्यावर याची काय गरज म्हणत शाहरूखने दिलेले उत्तर! (मला या शॉटला थिएटरमध्ये काही महिला "बरोबर आहे" असे म्हणताना स्पष्ट ऐकू आले) असो, माझे आणखी एक फेव्हरेट म्हणजे शेवटी आलियाचे गुंतलेले मन बाहेर काढताना जेव्हा शाहरूख तिला समजावतो, कशी काही नाती आपल्याला विविध प्रकारचा पण ठराविक आनंद देण्यासाठीच असतात आणि त्या त्या ठिकाणीच त्यांची मजा असते, पण आपण मात्र या सर्व प्रकारच्या आनंदाच्या अपेक्षा आपल्या रोमॅंटीक रिलेशनशिपकडून म्हणजे लाईफ पार्टनर या एकाच नात्याकडून पुर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा करून त्यावर ओझे टाकतो.. वगैरे वगैरे.. अजून बरंच काही आहे, पण मुद्दाम ते सारे नेमक्या त्याच शब्दांत सांगत नाही अन्यथा ते स्पॉयलर होईल. कारण हाच चित्रपटाचा आत्मा आहे. चित्रपट तुम्हाला त्यासाठीच बघायचा आहे Happy

आलिया एवढी गोड आणि इनोसंट मुलगी आहे की तिच्यासाठी सर्वात कठीण अभिनय वल्गर आणि ईरीटेटींग दिसण्याचा असेल. तसं काही दिसायचे नसल्याने ईतर सर्व एक्स्प्रेशन दाखवत ती आपल्या भुमिकेला खाऊन टाकते. एवढे सहजपणे सारे येते की कुठेही तो अभिनय आहे असे वाटतच नाही. आणि हे शाहरूख तसेच आलिया दोघांनाही लागू होते,. त्यामुळे दोघांची एकत्रित द्रुश्ये ईतकी सहज चित्रित झाली आहेत की कोणी आपल्या अभिनयाने आणि अदाकारीने समोरच्याशी स्पर्धा करतेय असे कुठेच जाणवत नाही. या दोघांची ही केमिस्ट्री बघून एक मनात आल्यावाचून राहिले नाही, शाहरूखच्या ऐन तारुण्यात जेव्हा त्याला रोमांटीक हिरोच्या भुमिका शोभायच्या तेव्हा आलिया असती तर आपल्याला या दोघांचे काही धमाल चित्रपट अनुभवायला मिळाले असते.

ईतर सहकलाकार, संगीत, दिग्दर्शक गौरी शिंदे यांच्याबद्दल फारसे काही लिहिणार नाही कारण शीर्षकात नमूद केल्याप्रमाणे हे परीक्षण नाहीये Happy
तरीही ‘लव्ह यू जिंदगी’ या गाण्याचे बीट्स एवढे सही आणि रिफ्रेशिंग आहेत की जेव्हा आलियाचे ऑल इझ वेल होताना चित्रपटात ते गाणे वाजते तेव्हा आपलाही मूड लव्ह यू जिंदगी होतो.

जाता जाता - शाहरूखचा कमालीचा उत्कृष्ट ड्रेसिंग सेन्स आणि ते कॅरी करणे या चित्रपटातही जाणवल्यावाचून राहात नाही. त्याची जीन्स, शर्ट, वाढलेली दाढी या गेट अप मधून उभे राहिलेले जहांगीर खानचे कॅरेक्टर चित्रपट संपल्यावरही दृश्यम बनत आपल्या मनावर छापले जाते.. त्यामुळे शाहरूख फॅन्सनी त्याचे हे कॅरेक्टर पर्यायाने हा चित्रपट चुकवू नये. तसेच या चित्रपटानंतर आलिया भटचाही स्वत:चा एक फॅन क्लब व्हायला सुरुवात होईल हे नक्की Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sampoornesh Babu is an Indian film actor who works predominantly in Telugu cinema. He made his acting debut through the 2014 Telugu film Hrudaya Kaleyam, which has earned him CineMAA Award for Best Actor in Comic Role.

ओके, फिल्लमस्टार आहे Happy

ओके.. रात्री यूट्यूब करतो.. जर भाषेची अडचण येणार नसेल तर.. कदाचित चार नवीन धाग्यांचे मटीरीअल मिळेल Happy

हिंदीच हवा असेल तर राजेश खन्ना, वहिदाचा खामोशी क्लासिक आहे. "वो शाम अजीब थी" असं जरा सुरात गाणे पण आहे.

ऋन्मेष!

तुझ्यातही काय ड्रास्टिक चेंज झाला रे सिनेमा पाहून !

आपला एक अख्खा चालू धागा खोडून आणि नवा धागा न काढता त्याच नोडवर तू पूर्ण नवा धागा लिहिलास!

नक्कीच अमेझिंग इफेक्ट आहे हा सिनेमाचा.

अमा! दिपिका मॉडर्न कॉन्फिडन्ट आजच्या युवतिचे रोल फार मस्त करते .. जस पिकु किवा कॉकटेल मधे ती १०० % पर्फेक्ट वाटली होती... रामलिला मधेही ती ट्रॅडीशनल कपड्यात असली तरी रोल बन्डखोर मुलिचाच होता, एतिहासिक कॅरेक्टर मात्र पार फसत ..

साती, अहो मला थिएटरात चित्रपट बघायला मुश्कीलीनेच वेळ काढता येतो. त्यामुळे एखादा बघण्याआधी कसा आहे हे जाणून घ्यायचे होते. रसपचा धागा आला नव्हता. म्हणून म्हटले आपणच काहीतरी मास क्लास त्रांगडे टाकून काढूया धागा.. काढला आणि फायदा झाला.. चित्रपट चांगला असल्याच्या आपल्या सर्वांच्या पोस्ट पाहून गेलो बघायला आणि आवडला ..

आणि आता हा ईतरांना बघायला सुचवायला म्हणून लिहूनही काढले .. तेवढेच शाहरूखचीही लाल करता येते, आणि ती नवीन धागा काढून केली तर लोकं मारणार नाहीत का. मला मनाची नाही पण जनाची लाज आहे हो Happy

एक शंका आहे - आलिया प्रत्येक गोष्ट नेहमी उलट सुलट करून ठेवताना दाखवलीय. त्यामागे काही अर्थ आहे की नुसता हाताला चाळा

परीक्षण आवडले. खूप सुंदर चित्रपट आहे. आलिया सुपर्ब. अतिशय मॅच्युअर्ड अभिनय केला आहे. चित्रपटाच्या कथेनुसार तिच्यात घडणारा बदल उगाच अगदी कायापालट झाल्यासारखा न दाखवता ती आहे तशीच ठेवून नेमका टिपला आहे. याचे मार्क्स गौरी शिंदेलाही जातात. या चित्रपटाची तुलना ईंग्लिश विंग्लिशशी करणे हा तिच्यावर अन्याय होईल. पण आपण प्रेक्षक हा नेहमीच आनंदाने करतो. कारण दोन चित्रपटांची, दोन हिरोंची, दोन हिरोईनींची तुलना करण्यासारखी दुसरी मजा नाही. शाहरूख खान खास आवडीचा नाही. पण त्याची मुलाखत आवर्जून बघते. त्याची बोलायची पद्धत आणि त्यातून झळकणारा सेन्स ऑफ ह्युमर चांगला वाटतो. या त्याच्या रोलमध्ये ते पैलू वापरले गेले असल्याने यात तो आवडला. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय हे बॉलीवूडचा प्रेक्षक अश्या चित्रपटांना स्विकारू लागलाय याचे लक्षण आहे आणि हे चांगले लक्षण आहे.

छान लिहिलंय. चित्रपट पहावासा वाटतोय. आलिया मधे जबरदस्त potential आहे. फक्त दिग्दर्शक म्हणून तिला करण जोहर मिळतो का गौरी शिंदे हाच प्रश्न आहे. जबरदस्त काम करते.

कशी काही नाती आपल्याला विविध प्रकारचा पण ठराविक आनंद देण्यासाठीच असतात आणि त्या त्या ठिकाणीच त्यांची मजा असते, पण आपण मात्र या सर्व प्रकारच्या आनंदाच्या अपेक्षा आपल्या रोमॅंटीक रिलेशनशिपकडून म्हणजे लाईफ पार्टनर या एकाच नात्याकडून पुर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा करून त्यावर ओझे टाकतो +१

ते फोलपणा नव्हता, ती एक स्ट्रॅटेजी होती Happy
सुडोमि म्हणजे? स्पेलिंग काय आहे? "sudomi" or "tsudomi" ?

काही नाती आपल्याला विविध प्रकारचा पण ठराविक आनंद देण्यासाठीच असतात आणि त्या त्या ठिकाणीच त्यांची मजा असते, पण आपण मात्र या सर्व प्रकारच्या आनंदाच्या अपेक्षा आपल्या रोमॅंटीक रिलेशनशिपकडून म्हणजे लाईफ पार्टनर या एकाच नात्याकडून पुर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा करून त्यावर ओझे टाकतो.>>>हे पटलं..कॉपी पेस्ट करून कोणाला तरी पाठवल...

कऊ, सोबत पिक्चर सुद्धा बघायला सांगा. शाहरूखच्या तोण्डून ही फिलॉसॉफी ऐकण्यात जास्त मजा आहे Happy

सुडोमि- सुखाने डोळे मिटतो >>> ओह्ह धन्यवाद, मी डो वरून डोके समजून नको नको ते घाणेरडे अर्थ काढत बसलेलो Happy

बघितला. आवडला. शाखाचे नविन आणि आभ चे जुने (स्टुडंट ..) चित्रपट सोडलेत तर मला दोघही आवडतात. जिंदगी मधे दोघांचा अभिनय आवडला.

सारुक आहे सिनेमात म्हणून ऋन्मेष इतकं गॉड गॉड लिहितोय पण फिल्म पकाऊ आहे असे काही सामान्य लोकांचे रिव्ह्यू . तस्मात नाही बघणार Happy

सारुक आहे सिनेमात म्हणून ऋन्मेष इतकं गॉड गॉड लिहितोय
>>>>

हा आरोप अमान्य सुजा Happy

१) ईथल्या प्रतिसादांत, वा रसप यांच्या परीक्षणात, तसेच तिथल्याही प्रतिसादांत, ईतर काही लोकांनीही, ज्यात काहींना शाहरूख जर्राही आवडत नाही अश्यांनीही, या चित्रपटाचे बरेपैकी कौतुकच केले आहे.

२) हे माझे शाहरूखच्या आणखी एका चित्रपटाबद्दल लिहिलेले वाचा. यात कौतुक थोडेसेच आणि बरीच टिकाच सापडेल.
FAN - एका फॅनच्या नजरेतून .. - http://www.maayboli.com/node/59016
मी आवडलेल्याला आवडले बोलणारा माणूस आहे. आणि नाही आवडत ते शाहरूखलाही तोंडावर सुनावू शकतो. यालाच खरा फ्यान बोलतात Happy

३) मी माझ्या गर्लफ्रेंडला आणि तिच्या बहिणींना, मैत्रीणींनाही हा चित्रपट बघा म्हणून सांगितले आहे आणि माझ्या विश्वासावर ते या रविवारी जातही आहेत. याचा अर्थ हाच की त्यांना हा चित्रपट आवडेल याची मला प्रचंडा खात्री असणार कारण जर तसे नसेल तर त्या मला धू धू धुतील.

४) हा असा चित्रपट आहे की तुम्ही कोणाकडून रिव्यू ऐकला हे यात जास्त मॅटर करते. म्हणून मी आधी ईथे क्लास विरुद्ध मास असा धागा काढलेला. यात कोणाला क्लास म्हणावे आणि कोणाला मास हे मलाही माहीत नाही. पण दोन टोकाचे पब्लिक रिव्यू मी तुम्हाला या खालच्या लिंकावर दाखवतो.
कौतुक करणारे - https://www.youtube.com/watch?v=6DkdqaR-bwU
टिका करणारे - https://www.youtube.com/watch?v=CXlKzsdwHt4

आज पाहिला. आवडला. बारीक सारीक डीटेलिंग खूप आवडले. खूर्च्ची फिलॉसॉफी भारी. शेवटी ती त्या फर्निचरवाल्याबरोबर चालत असताना धडपडते ...... मस्त स्वतःच सावरते! सिनेमा अलियाचाच आहे ... फुल्ल मार्क्स टु अलिया ! शहरुख सुसह्य!

Pages