मला व्यवहार ज्ञान नाही,माझे डोके कुठेच चालत नाही ,मी काय करावे?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 23 November, 2016 - 10:50

नमस्कार मायबोलीकरांनो ,मी थोडक्यात माझा प्रॉब्लेम मांडणार आहे.
मी आहे ३१ वर्षाचा तरुण( केस पांढरे व्हायला लागले आहेत) .तसा मी बक्कळ शिकलो आहे.अगदी बी एस्सी विथ फर्स्टक्लास.पण मी कधीही नोकरी केलेली नाही.घरची शेती आहे पाच एकर ,त्यात मी कॉलेज झाल्यानंतर लक्ष घातले.लहानपणापासून शेतात जात असल्याने मला शेतीची थोडीफार माहीती आहे ,त्यावरच माझा चरितार्थ चालतो.आईवडील दोघेही शासकीय नोकरी करत होते ,ते दोघेही सध्या माझ्यावर अवलंबुन नाहीत.
माझा प्रश्न असा आहे की माझे व्यवहारात व इतर ठीकाणी कुठेच डोके चालत नाही.मित्रांमध्ये गप्पा मारताना ,घरात,ईतर ठीकाणी काही इंटेलेक्च्युल चर्चा चालत असेल तर मला त्यातले ओ की ठो कळत नाही
आपले डोके चालत नाही ,आपल्याला अक्कल नाही हे मला आंतरजालावर् आलो तेव्हा प्रकर्षाने जाणवू लागले.मायबोलीची गोडी मला २०११ साली लागली.इथे झडणार्या चर्चामध्ये मी भाग घेऊ लागलो,पण मुळात लॉजिकल आर्ग्युमेंटेशन करता येण्याजोगी अक्कल नसल्याने साईडलाईन झालो,मग मी एकामागोमाग आयडी घेऊन इथे बिन्डोक प्रतिसाद व नळावरची भांडणं करु लागलो.आताशा मी असल्या चर्चांमध्ये भाग घेत नाही.
आंतरजालावरचे मी फारसे मनावर घेत नाही,पण जगताना प्रत्यक्ष व्यवहारात अक्कल असल्याशिवाय तुमचा निभाव लागत नाही.या मठ्ठपणामुळे जगण्याचा कंटाळा येऊन एकदा मी आत्महत्येचा बालिश प्रयत्नही केला होता.
सध्या शेती करत असल्याने मला आत्तातरी चरितार्थाची काळजी नाही,पण भविष्यात शेती विकावी लागली व नोकरी धंदा करण्याची वेळ आली तर माझ्यासारख्या डोकं न चालणार्या व्यक्तीचा निभाव लागेल का ? याविचाराने मी अस्वस्थ होतो.
तर मी काय करावे याविषयी अनुभवी मायबोलीकरांची मते हवी आहेत.
१. डोकं चालत नाही ,व्यवहार ज्ञान नाही यावर काही उपाय आहे का?
२. मी सध्या सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट घेत आहे ,त्याचा कितपत उपयोग होतो.?
३. आज आई वडील आहेत त्यामुळे मी निर्धास्त असतो,उद्या त्यांच्या माघारी माझ्यासारख्या बिंडोकाने काय करावे?
४. बिंडोक असणे गुन्हा आहे का?
५.की सरळ आत्महत्या करुन प्रश्न कायमचा मिटवून टाकावा?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्कलेच्या संदर्भात नेमकी काय कन्सेप्ट आहे तुमची?>>>>>>fluid intelligence व Crystallized
Intelligence दोन्ही बुद्यांक माझे खुप कमी आहेत,पैकी मला fluid intelligence नाही असे माझे मत आहे.

सिंजि

बिंडोक असता तर तुम्हाला समजले नसते कि तुम्ही बिंडोक आहात ते++++१

आणि साधे पणाला बिंडोक बोलु नका.

असुद्या कि आयुष्य साध सरळ काय फरक पड्तो. सगळ्यानिच काय इंटेलेक्च्युल चर्चा करायलाच हवि असे नाहि. साधे पणाचा आनंद घ्या कि जगण्यात आम्चा सारखा खुप छान असतो.

नेहमि आनंदि रहा सोप आहे ते करुन बघा.

ऋन्मेष चा प्रतिसाद आवड्ला.

तुमच्या आई वडिलांशी तुम्ही याबाबत मोकळेपणाने बोललात का? नसेल तर बोलून पहा. किडुक मिडूक व्यवहार जमत नसतील तरी त्याने तुमच्या जवळच्यांना काही फरक पडत नाही. त्यापेक्षा तुमची जगण्याची उमेद नष्ट होतेय याचे दुःख त्यांना जास्त असेल.

सगळ्या इंटलेक्चुअल चर्चा वांझोट्या असतात. नै कळले तरी चालते.

पाच एकरवर तुमची व बायको मुलाची उपजिविका व्यवस्थीत चालेल. आत्मविश्वासान रहा

लॉजिकल आर्ग्युमेंटेशन करता येण्याजोगी अक्कल नसल्याने
त्याचा मायबोलीवर लिहिण्याशी काय संबंध? +१११११
इथे सगळे जण थोडेच लॉजिकली लिहीत असतात? Happy
ॠन्मेSSष सुरेख प्रतिसाद Happy

व्यवहार ज्ञान नाही, डोके कुठेच चालत नाही असं खरा प्रॉब्लेम असणारे सध्या देश संभाळताहेत. तेही फुशारक्या मारीत.

एवढा न्यूनगंड बरा नाही. लवकर बरे व्हाल हि सदिच्छा!

धागा व धाग्यातील प्रश्न जेन्युईन आहेत असे समजुन पुढे काही विश्लेषण देऊ पहातो.
[अर्थात, "Without prejudice" with a hope that this is not a "Trap".]

१. डोकं चालत नाही ,व्यवहार ज्ञान नाही यावर काही उपाय आहे का?

तुमचे डोकं चालत नाही "हे समजण्या इतपत" डोकं आहेच्चे हे धागा काढलात त्यावरुन नक्की होतय. व इतके असलेले डो़कं यशस्वी जगण्याकरता पुरेसे ठरते.

२. मी सध्या सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट घेत आहे ,त्याचा कितपत उपयोग होतो.?
याबाबत तुम्हाला सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट देणार्‍या डॉक्टरांचेच मत ग्राह्य धरावे लागेल. पण माझ्या माहितीप्रमाणे, दारूचे/इतर व्यसने ही देखिल चक्क मानसिक्/शारिरीक रोग समजुन त्यावर औषधयोजनेद्वारे/समुपदेशनाद्वारे उपाय केले जातात व त्याचा उपयोग होतो, तर या ट्रीटमेंटचाही होईलच असा विश्वास वाटतो. (ट्रीटमेंटचा तपशील दिला नाहीये, त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणे न लगे)

३. आज आई वडील आहेत त्यामुळे मी निर्धास्त असतो,उद्या त्यांच्या माघारी माझ्यासारख्या बिंडोकाने काय करावे?
आज निर्धास्त असता, तसेच निर्धास्तपणे जगा, उद्याच्या विवंचना/चिंतेमधे आजचे जगणे बरबाद करु नका. "भित्यापाठी ब्रह्मराक्षस" या म्हणी प्रमाणे होऊ देऊ नका.

४. बिंडोक असणे गुन्हा आहे का?
नाही.

५.की सरळ आत्महत्या करुन प्रश्न कायमचा मिटवून टाकावा?
नाही. आत्महत्या हा केवळ कायदेशीर गुन्हा नसुन नैतिक (पळपुटेपणाचा) गुन्हाही मानला गेला आहे. तो करु नये.
जीवनात पुढे येणार्‍या प्रत्येक क्षणास सामोरेच जावे.

ज्याक्षणी तुम्ही "स्वतःकरताचे जगणे" सोडुन, "दुसर्‍याकरता जगण्यास" सुरुवात कराल, त्यावेळेस बहुधा हे प्रश्न उरणार नाहीत.

|| शुभंभवतु ||
(Without prejudice )

सिंतेटिक जिनियस स्वतः ला कमी समजने हा सर्वात मोठा गुन्हा आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचा रिस्पेक्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही पण काहीतरी स्पेशल आहात. राहिला प्रश्न बिन्डोक पणाचा इथे अनेक लोक आहेत ज्यांनी भरपूर शिक्षण घेतलेय, पण त्यांना शेती बद्दल काही ज्ञान नसेल जितके तुम्हाला आहे. स्वतः कमी समजू नका आणि कोणाशीही तुलना करू नका.
तुम्हाला फरक जाणवेल.

सिंथेटिक जिनियस,

तुमच्या ह्या धाग्यातील मजकूर मला खोटा वाटत आहे. चुकुनमाकुन तो अंशतः खरा असला तर मी मला स्वतःला तुमचा एक सच्चा मित्र म्हणून ऑफर करत आहे. आपण भेटू, भरपूर गप्पा मारू, एकमेकांना उत्स्फुर्त शिवीगाळ करू आणि लाईफ एन्जॉयही करू.

तुम्ही मागे मला उद्देशून अतिशय पर्सनल आणि संतापजनक प्रतिसाद दिला होतात. त्यामुळेच मला ह्या धाग्यातील मजकूर खोटा वाटत आहे. तसेच, त्यामुळेच मी तुमच्याशी (म्हणजे तुमच्या ह्या आय डी शी) संवाद ठेवलेला नव्हता. तुम्ही तसा प्रतिसाद दिलेला होतात हे लिहिण्याची संधी ह्या धाग्यामार्फत मला दिलीत ह्याबद्दल मी आभार मानतो. पण तुम्ही विश्वास ठेवू शकता की एक मित्र म्हणून मी केव्हाही हाकेला ओ देईन.

धाग्यातील मजकूर खोटा असो व धागा टीआरपीसाठी काढलेला असो अशी आशा व्यक्त करतो. Happy

-'बेफिकीर'!

हा धागा चेष्टा, टिंगल, टाईमपास म्हणून काढला आहे का ?
ही समस्या कुणाची तरी असूही शकते. जर एखाद्याने खरोखर अशा समस्येसाठी धागा काढला तर त्याला असेच प्रतिसाद मिळतील ही भीती वाटते.

त्यामुळेच मांडलेली समस्या गंभीर आहे असं पहिल्या प्रतिसादात म्हटलं होतं. ती धागाकर्त्याची असेक तर अशा धाग्यावर व्यवस्थित प्रसाद हवेत.

बेफि ,तुम्हाला मी अतिशय पर्सनल प्रतिसाद दिला होता,त्यानंतर सातींनी माझी कान उघडणी केल्यावर मी माफीही मागितली होती.तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमच्या नजरेतून ती सुटली असेल तर् परत माफी मागतो.
राजकीय मतभेद असले तरी मायबोलीवर प्रत्येकाचा आदर मी करतो.मी मानसिक रुग्ण आहे हे वर लिहलेच आहे,मधेआधे हार्ड लिकर घेतो ,त्यावेळीस जर ऑनलाईन असेन तर कुणालाही वाटेल ते बोलतो.अगदी अड्ड्यावर देखिल विक्षिप्तपणा करत असतो.तिथे बहुतांश डॉक लोक असल्याने मला ते प्रेमाने सहनहि करतात.
आता धाग्याविषयी,धाग्यात मी प्राजळपणे मत मांडले आहे ,तुम्हाला ते खोटे वाटू शकते .पण तसे नाही आहे.

आपलं रडगाणं घेऊन मायबोलीकरांना वेठीस धरुन टाईमपास करण्याइतका मी गयागुजरा नाही याची खात्री बाळगा.

>>>>बेफि ,तुम्हाला मी अतिशय पर्सनल प्रतिसाद दिला होता,त्यानंतर सातींनी माझी कान उघडणी केल्यावर मी माफीही मागितली होती<<<<

अवांतर - सातींनी कानउघाडणी केलेली मायबोलीवर दिसली नाही. सातींचे वाक्य असे होते:

"वैयक्तीक स्वरुपाचे प्रतिसाद देणे अड्डेकरी बंद करतील तो सुदिन"

तुम्ही माफी मागीतलेली मी पाहिलेली नाही.

हे सगळे येथे लिहिण्याचे कारणच नाही असे काहीजण म्हणतील. पण जालीय वादविवाद सोडून मी माझी मैत्री ऑफर केलेली आहे. त्यामुळे पूर्ण क्लॅरिटी आवश्यक आहे असे मला वाटते. माझी मैत्री म्हणजे काही ग्रेट बाब नव्हे हे मी जाणतो, पण मी तेवढेच ऑफर करू शकतो.

धाग्यातील मजकूर खरा असेल तर ऋन्मेषच्या प्रतिसादातील संदेश अनुकरणीय आहे एवढे बोलून थांबतो.

Happy

>>
आपलं रडगाणं घेऊन मायबोलीकरांना वेठीस धरुन टाईमपास करण्याइतका मी गयागुजरा नाही याची खात्री बाळगा.>> नुसतं मायबोली नाही, मिसळपाववाल्यांनाही तुम्ही हेच लिहून वेठीला धरलं आहे. तिथे >>मायबोलीची गोडी मला २०११ साली लागली>> ऐवजी मिसळपावची करायलाही विसरला नाहीत.

जिनीयस, मला तरी तुमचा प्राॅब्लेम जेन्युइन वाटतोय, एरव्हि नॅशनल टिवीसारख्या माध्यमातुन आपली समस्या मांडली नसतीत (फेक आय्डि घेउनहि तुमची खरी ओळख आंतरजालावर लपुन राहु शकत नाहि).

दुर्दैवाने तुम्हाला संगत/मित्रपरिवार पाॅझिटिव विचार करणार्यांचा लाभलेला नाहि जो अशा परिस्थितीत अत्यंत आवश्यक आहे. माझ्यासारखे फुकटचे सल्ले देणारे आंतरजालावर भरपुर आहेत परंतु प्रत्यक्शात भेटुन मदतीचा हात पुढे करणारे आत्तापर्यंत फक्त बेफिकिर आहेत. त्यांच्या भेटिने तुमच्या मनावरचा ताण हलका/निघुन जाण्यास नक्कि मदत होईल. गुड लक!

( वाचत असाल तर सध्या मौसम मस्त आहे.. सगळे एकत्र करुन शेकोटी करा म्हणजे असले प्रश्न पडणार नाहीत व संसारात लक्ष लागेल. )

Pages