: मला आलेला एक थरारक अनुभव:

Submitted by Abhishek Sawant on 20 November, 2016 - 11:07

: मला आलेला एक थरारक अनुभव:
कॉलेज संपवून जॉबच्या शोधार्थ बाहेर पडलो. शोधाशोध केल्यानंतर अखेरीस दोन तीन महीन्याने गोव्याला जॉब मिळाला. सगळे सामान घेऊन गोव्याला (मडगांव) आलो. कंपनीतील ओळखीने शहराच्या मद्यवर्ती ठिकाणी एका अपार्टमेंट मध्ये रूम मिळाली. गोव्यातील अपार्टमेंट सहसा सुनसानच असतात. दिवसा देखील तुम्हाला बिल्डींग मध्ये जास्तीत जास्त एक नाहीतर दोन माणसे दिसतील. मी जॉब करत असलेली कंपनी फार्मा कंपनी असल्याने तिथे दोन शिफ्ट मध्ये काम चालत असे. त्यातील फर्स्ट शिफ्ट म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळी 4, दुपारी 4 ते रात्री 12 सेकेंड शिफ्ट.
मी नवीनच जॉईन झालो होतो म्हणून मला पहिले दोन आठवडे फर्स्ट शिफ्ट दिली. नंतर सेकंड शिफ्ट आल्यावर माझी जाम तंतरली. एक तर मी कुत्र्यांना जाम घाबरतो आणि दूसरे म्हणजे रात्री बारा वाजता एकटा मला बस स्टॉप वरून रूम पर्यंत चालत यायचे होते तशी न्यायला सोडायला कंपनी ची गाडी असते त्याची काही काळजी नसायची.
माझ्या अपार्टमेंट पासून बस स्टॉपचे अंतर जेमतेम पाच मिनिटांचे आहे,पण या पाच मिनीटांच्या अंतरामध्ये मला २५-३० कुत्र्यांचा सामना करायला लागत होता. गोवा सरकारला माझी कळकळीची विनंती आहे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. असो त्याच्यावर एक स्वतंत्र लेख होईल एवढे अनुभव आहेत .तर त्या झेड प्लस सेक्युरीटी मधून जीव मुठीत घेऊन निसटण्याच्या नादात कधी आपण एकटे आहोत कींवा भुतांची खेतांची भिती अशी कधी वाटलीच नाही.
पहिल्या तीन दिवसानंतर कुत्री ओळखायला लागली त्याबद्दल कुत्र्यांना मनापासुन धन्यवाद त्यामुळं माझ एक मोठं टेंशन गेलं. आणि त्याचा तोटा असा झाला की रात्री मी एकटाच असतो आणि भूत वैगेरे पण असतात याची जाणीव होऊ लागली. मग एकापाठोपाठ एक हॉरर सीन पाहिलेत कींवा जेवढ्या भयकथा मायबोलीवर वाचल्यात ते सगळ आठवू लागले.
पण पुढचे दोन दिवस शांततेत गेल्यानंतर,असाच एका रात्री मी अशीच सेकंड शिफ्ट सम्पवून रूमवर परतत असताना. जेव्हा मी आमच्या अपार्टमेंट च्या गेट मध्ये प्रवेश केला तेव्हा असे जाणवले की सगळी कुत्री आमच्याच बिल्डींगच्या दिशेने पाहून भुंकताहेत. मला थोडं विचीत्र वाटले पण त्यापेक्षा कुत्र्यांची भिती जास्त वाटली. पण आश्चर्यकारक त्यांनी माझ्याकडे पहिले आणि रडू लागले.आता मात्र मला फारच भेसुर आणि भयाण वाटू लागले. आपल्याकडे कुत्र्यांचे रडणे याचा अर्थ एकच काढला जातो आजुबाजुला कुठे तरी भूत आहे. आता खूपच भयाण आणि विचीत्र वातावरण निर्माण झाले होते. बिल्डींगच्या कोपऱ्यात एक छोटसं चर्च होते त्याच्या लाइटीन्ग च्या माळा अजूनही चमकत होत्या तेवढाच धीर वाटला. मी त्या क्रॉस कडे पाहिले आणि चालू लागलो.
बिल्डिंग ला एक छोटं लोखंडी गेट होते. ते नेहमीच एकतर बाहेरुन कींवा आतून लावलेले असते पण आज ते सताड उघडं होते. गेट मधून आत शिरले की उजव्या हाताला पायऱ्या तर समोरच्या बाजूला १५-२०पावलांवर लिफ्ट होती. बिल्डिंग मध्ये सगळीकडे ट्युबलाइट लावल्या असल्याने तसा अंधार वैगेरे काहीच न्हवता पण एवढी शांतता होती की पूर्ण बिल्डिंग मध्ये मी एकटाच आहे असे वाटत होते. तसेही रात्रीचे एक वाजता कोण जागे असणार आहे म्हणा. जिन्याने जाताना प्रत्येक फ्लोर वर समोर काचा होत्या त्या आरश्या सारख्याच होत्या आणि मी हॉरर मूव्ही मध्ये पाहील्याप्रमाणे आरश्यात कोणीतरी मागे उभे राहिलेले दिसेल या भितीने मी जीन्याने जायचा नाद सोडलाआणि लिफ्ट ने जायच ठरवलं
लिफ्ट तशी छोटीच होती आणि जुनी पण वर्किंग कन्डीशन मधे होती. लिफ्टचा जसा दरवाजा उघडला तसा त्याचा मोठा आवाज त्या कुत्र्यांच्या रडन्यात मिसळला. लिफ्ट मध्ये शिरल्यावर असे वाटले की आत कोणीतरी आधीपासूनच आहे. श्वासांचे आवाज कींवा वातावरणात बदल जाणवत होता. मी चौथ्या फ्लोर चे बटण दाबले आणि वरती बघू लागलो लिफ्ट चालू झाली कुत्र्यांचे रडणे आत्ता थांबले होते. पहिला फ्लोर झाला दुसरा झाला तिसऱ्या फ्लोर ला लिफ्ट अचानक थांबली मला आता जाम भिती वाटू लागली लिफ्ट बंद पड़ते की काय पण लिफ्टचा दरवाजा आपोआपच उघडला जसे काही कोणीतरी तिसऱ्या फ्लोरवर कोणीतरी थाम्बनार होते. लगेच दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट चालू झाली. तिसऱ्या मजल्यावरुन जायला लिफ्टला साधारणपणे 1-2 मिनिटं लागतात.पण लिफ्ट चालू होऊन पाच मिनीट झाले तरी अजून चौथा मजला आला नाही आता मात्र मला कळाले की हा काहितरी वेगळाच प्रकार आहे. मी दरवाज्यात असणाऱ्या छोट्याश्या फटीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला आणि मला धक्काच बसला. जे फ्लोर येऊन जात होते ते आमच्या बिल्डींग चे न्हवतेच. आणि प्रत्येक प्लोर वर खूप माणसं दिसत होती. आता मात्र भितीने मला दरदरून घाम सुटला असे कित्येक फ्लोर येऊन गेले आता प्रत्येक फ्लोर वरची माणसे लिफ्ट कडे झेपावत असल्यासारखे वाटू लागले. हळूहळू सर्वत्र अंधार दाटून आला, मला काहीच दीसेनासे झाले. फक्त लिफ्ट चा आवाज आणि अवर्णनीय अशी दुर्गंध इतकी की श्वास घेण्यासाठी धडपड करावी लागत होती. शेवटी कितीतरी वेळाने मी बेशुद्ध झालो. जाग आली तेव्हा एक वयस्कर माणूस मला हलवून उठवत होता.मी त्याला धक्का देऊन बाजूला सारत तरी त्यांनी मला सोडले नाही. ते काका जोगीँग ला जात होते त्यांनी मला लिफ्ट च्या दारात पडलेले पाहिले आणि मला मदत करायला आले होते. नंतर मला तिथल्या लोकांनी सांगीतले की लिफ्ट संध्याकाळीच बंद पडली होती. पण बहुतेक हॉरर मूवी सारख या लिफ्टचा इतिहास काही वाईट नव्हता पण मलाच कसा हा अनुभव आला माहिती नाही की हा माझा भास होता देव जाणे पण त्यादिवसापासून मी सेकंड शिफ्टला मित्राच्या रूमवर झोपतो आणि सकाळी उठून माझ्या रूमला येतो. कधीही एकटा असताना त्या लिफ्टचा वापर करत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधीही एकटा असताना त्या लिफ्टचा वापर करत नाही.
>>>
जर तुम्ही अजूनही तिथेच राहत असाल तर हे असे ईथे लिहायला नको होते.
त्या लोकांना हे नाही आवडत.
माझी विनंती आहे की प्लीज आपण हा धागा उडवा किंवा संपादीत करा. तुम्ही अनुभव घेऊन झालाच आहे, आणखी काय बोलू Sad

ऋन्मेऽऽष ' त्या लोकांना ' म्हणजे नेमके कोणाला? बिल्डींग मधल्या रहिवाश्यांना कि लेखकाला दिसलेल्या व्यक्तींंना? मला उत्सुकता आहे म्हणून विचारले. तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे?

अर्थात, त्या लोकांनाच. सर्वांनाच नाही दिसत ते. ज्यांना ते दिसतात त्यांना ते देखील बघू शकतात. ते एक समांतर विश्व असते. आपण चूकून त्यात शिरतो. आणि मग ते दिसतात. जिथे तुमचा तीन ते चार माळा होता तिथेच त्यांच्या समांतर विश्वात कैक होते. तुम्ही लिफ्टच्या दरवाज्यात बेशुद्ध असेच नाही पडत तर ते तुम्हाला आपल्या विश्वातून फेकून देतात. त्यांच्या मर्जीने. तुम्ही मग बाहेर आलात तरी पाऊलखुणा सोडतच येतात. आता कोणी तुम्हाला बघो न बघो ते बघत आहेत. आणि जे तुम्हाला त्यांच्या विश्वातून आपल्या विश्वात फेकू शकतात, ते पुन्हा आपल्या विश्वातून त्यांच्या विश्वात खेचूही शकतात!

कऊ बेफिकीर, लिफ्टचा ईतिहास माहिती नाही, म्हणजे मी तीन महिने आधी इथे रहायला आलो. माझे मित्र इथे दोन वर्षे झाली राहत आहेत तरी त्यांना असा कोणताही अनुभव आला नाही. आणि लिलिफ्ट मध्ये काही वाईट घटना घडल्याचे त्यांना पण माहिती नाही.

"मद्यवर्ती" मध्ये सगळी मेख दडली आहे हो!!! मद्यवर्ती जागा सोडून मध्यवर्ती घ्या...सर्व ठीक होईल.

>>>>कऊ बेफिकीर, लिफ्टचा ईतिहास माहिती नाही<<<<

नाही नाही, मी नाही विचारलेले तसए, की तुम्हाला लिफ्टचा इतिहास माहीत आहे का! ते विचारले जाण्याचे मला फक्त थोडेसे हसू आले इतकेच.

मद्यवर्ती" मध्ये सगळी मेख दडली आहे हो!!! मद्यवर्ती जागा सोडून मध्यवर्ती घ्या...सर्व ठीक होईल.>> ताई मी घेत नाही. या बिल्डींग च्या एंट्रेन्स ला पाच बीयर बार आहेत हे एकच कारण आहे मद्यवर्ती लिहिण्याचे

कदाचीत हा भास असेल कारण मी आदल्या दिवशी फर्स्ट सेकेंड शिफ्ट कंटिन्यूस त्यानंतर दुसरया दिवशी सेकेंड शिफ्ट झोप जेवण नीट झाले नव्हते. त्यामुळे मला चक्कर वैगेरे आली असेल.

असे काहीच नसते.... कदाचीत तुम्हाला कामाचा जास्त लोड असेल, टेन्शन असेल, आणि नेमका त्याच वेळी तुमच्या मनात भयानक विचार चालु असतील, आणि तुम्ही त्या विचारात लिफ्ट मध्ये शिरला असतील, आणि आत शिरल्या शिरल्या तुम्हाला चक्कर आली असेल, आणि तुम्हाला असे एखादे स्वप्न पडले असेल......बाकी काहीही नाही...!!! अस होताय बर्याच दा.....!!!

Abhishek Sawant तुम्हाला आलेला अनुभव खरच चित्तथरारक आहे. कुत्री रड्तात याला असन्ख्य कारणे आहेत.

Dogs are naturally pack animals which have a strong sense of separation anxiety. When they feel separated from their pack, or any member from their pack is missing. They trigger howl to send a message to missing member which has a meaning "I am here, where are you"? Similar behavior is observed in stray dogs, when they found them-self separated from their pack or they observe any pack members is missing, they do howl. Dogs are always keen to get your attention and tender. When they lack physical exercise or feel nervous, then they need your more attention and sometimes they make different tricks to get your attention. But if their need is not getting fulfilled, they can reflect behavioral problems. That can be mild howl which is their natural way to request for your attention.

Abdul Hamid >>> मला पण तेच वाटतय. मी खूपच थकलेलो होतो बहुतेक त्यामुळेच असेल. कधी कधी आपल्याला स्वप्न खरे वाटायला लागते. माझा तर देवांवर विश्वास नाही तर भुतांवर कोठून असणार.पण जराशी भिती वाटते एव्हढंच

कोणतीही इमर्जन्सी किंवा तणावाच्या परिस्थितीत लिफ्ट वापरू नये. तुम्हाला आधीच तणाव, थकवा, भीती होती. चित्र विचित्र विचार मनात येत होते. त्यालाच अजून योगायोगाने "कुत्र्यांच्या रडण्याची" साथ मिळाली. तुमची भीती कैकपटीने वाढली. कदाचित रक्तदाब प्रमाणापेक्षा कमी/जास्त झाला असेल. ग्लानी आल्याने भास झाले. अशा तणावाखाली एकटे असताना जिन्यातील काल्पनिक भीती टाळण्यासाठी लिफ्टने जाण्याचा त्याहून मोठा धोका पत्करलात.

प्रत्यक्षातले जग फारच रुक्ष आहे. म्हणूनच मनाचे खेळ असलेल्या कथा केवळ मनोरंजन म्हणून ठीक असतात.. एकतर त्या वाचू नका किंवा वाचल्या तर इतक्या मनावर घेऊ नका.

atuldpatil>> सहमत >> मी कुठंतरी वाचले होते हे. बंद जागेत एकटे कोंडले गेल्याचा स्ट्रेस भरपूर असतो.

जर तुम्ही अजूनही तिथेच राहत असाल तर हे असे ईथे लिहायला नको होते.
त्या लोकांना हे नाही आवडत.>>>>>>>>>>>>>> Lol ते लोक मायबोली वाचतात का?

तुमचा माणूस गण आहे का हो? >> गण माहिती नाही. पण त्याने काय होतय?

जर तुम्ही अजूनही तिथेच राहत असाल तर हे असे ईथे लिहायला नको होते.
त्या लोकांना हे नाही आवडत.>>>>>>>>>>>>>> ते लोक मायबोली वाचतात का?>>>सगळ्या आय डी वर लक्ष ठेवायला पाहिजे आता.

लिफ्ट कोणत्या प्रकारची होती?>> म्हणजे नॉर्मल जशी लिफ्ट असते तशीच

स्वयंचलित बंद दरवाजा, जाळीचा दरवाजा, मॅन्यअल बंद दरवाजा अशा कोणत्या प्रकारात?>>> manual बंद दरवाजा पण त्याला डिज़ाइन आहे त्यातून थोडं बाहेरच दिसते.

अहो तुम्ही सोडून इतरांना हा अनुभव आला नाही, कदाचित तुमचा गण माणूस असेल. अशा लोकांना भूत वगैरे दिसते असं म्हणतात.

अहो तुम्ही सोडून इतरांना हा अनुभव आला नाही, कदाचित तुमचा गण माणूस असेल. अशा लोकांना भूत वगैरे दिसते असं म्हणतात.>>> ओके असेल कदाचीत पण एवढ्या वर्षात दिसले नाही आत्ताच दिसले म्हणजे माझा गण आत्ता चेंज झाला असेल.

जर तुम्ही अजूनही तिथेच राहत असाल तर हे असे ईथे लिहायला नको होते.
त्या लोकांना हे नाही आवडत.>>>>>>>>>>>>>> ते लोक मायबोली वाचतात का?>>> I'm reading.......

अहो तुम्ही सोडून इतरांना हा अनुभव आला नाही, कदाचित तुमचा गण माणूस असेल. अशा लोकांना भूत वगैरे दिसते असं म्हणतात. >>> दक्शे, कशाला घाबरवतीयेस त्याला?

Pages