ट्रिक ऑर ट्रीट

Submitted by विद्या भुतकर on 10 November, 2016 - 00:20

परवा हॅलोवीनला मुले ट्रिक ऑर ट्रीट ला जाऊन आली. पहिल्या १० चॉकलेटनंतर त्याचा विश्वास बसत नव्हता की त्याला इतके चॉकलेट्स मिळाले आहे. त्याचे हावभाव बघून खरंच मजा वाटत होती. अजून दोनेक तासात त्याची आक्खी बकेट भरली आणि सर्व चॉकलेट्स घरी आले. दरवर्षी ते सर्व ठेवून टाकणे आणि त्याची विल्हेवाट लावणे मोठं कष्टाचं काम असतं. थोडे एका पिशवीत घालून बाहेर काढून ठेवले होते. त्यातलेच मग कधी हट्ट केला तर द्यायचे असे चालू आहे. आणि कधी कधी खूप छान वाटते जेव्हा ती पिशवी समोर असूनही काढून आणून स्वनिक आम्हाला विचारतो की 'मी हे खाऊ का?' .

आजकाल मुलांना गोळ्या, बिस्किटे, चिप्स हे इतक्या सहजपणे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर दिसते की साधे किराणा आणायला गेल्यावरही एकतर त्यांची रडारड होते किंवा आम्हाला समोर दिसणारे चॉकलेट किंवा बिस्कीट घ्यावे तरी लागते. सुदैवाने मुले बरेचवेळा ऐकतात. पण प्रत्येकवेळी शक्य होत नाही. आणि जसे जसे ते मोठे होत आहेत, त्यांना समजावणे किंवा नकार देणे अवघड जात आहे. त्यात शाळेत मुलांच्या डब्यात कधी कधी अगदीच 'जंक फूड' येते, तेव्हा 'मला का ते मिळत नाही?' यावर उत्तर देणे अवघड जातेय. एक-दोन वेळा आम्ही स्वनिकला मग डब्यात जेवणासोबत चिप्सही दिले होते. बरं, पुढे जाऊन याच सर्व गोष्टी वाढदिवसालाही मिळतात. चिप्स, चॉकलेट हे प्रत्येक पार्टीत असतेच. त्यातून बाहेर पडणे अजूनच अवघड जातेय.

घरी असताना बरेचदा त्यांना जे खातोय ते योग्य का आहे हे समजावून सांगतो. इतके की एक-दोन वेळा मी काहीतरी विसरले असताना स्वनिकने मला 'बदाम खाण्याचा' सल्ला दिला. Happy सुदैवाने त्यांना सलाड आणि फळे खूप आवडते. तरीही मी केलेल्या भाज्या, वरण, चपाती खाणे अगदी तिखट जेवणही करणे यात थोडे वाद होतात. पण त्यांना आता वेगवेगळे सूप, सलाड, भाज्या आवडत आहेत. कधी सान्वी डाळ भाताची खिचडी करायला सांगते किंवा स्वनिक भेंडीची भाजी. अशावेळी आपण जे त्यांना शिकवत आहोत त्याचा खूप आनंद होतो. पण त्यासाठी तितकाच पेशन्स ठेवावा लागतो.

परवाच मी डब्यात दिलेला चपातीचा रोल तसाच परत आला. त्यात सान्वीनेही पावभाजी खायला नाटक केले. हे सर्व इतके वैतागवाणे होते की चिडचिड झाली खूप. डब्यात दिलेले बरेचसे जेवण तसेच परत आल्यावर किती आणि काय समजवायचे असा प्रश्न पडतो. कधी ते मोठे होतील आणि स्वतःची काळजी घेतील या विचार वैताग येतो. काळ मात्र मला एक मोठा आनंदाचा धक्का मिळाला. डबा पूर्ण संपलेला होता. म्हटले काय विशेष आज? स्वनिकने शाळेत माझ्यासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवले होते. कार्ड मध्ये लिहिले होते, "Aai tu best cook aahe". Happy तेही त्याने मराठी मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला होता. मला वाटले मी केलेला पास्ता आवडतो म्हणून त्याने लिहिलेय कि काय? तर म्हणे,"तू परवा केलेलं वरण खूप छान झालं होतं म्हणून मी हे ग्रीटिंग केलं तुझ्यासाठी".

आता एक आई म्हणून मला झालेला आनंद तर होताच. पण अनेकदा त्यांच्या न खाल्लेल्या डब्याकडे पाहून होणारी चिडचिड, त्यांना अनेक भारतीय पदार्थातील असलेला आनंद ना समजणं, चॉकलेट-चिप्स, जंक फूड पासून वाचवण्यासाठी कष्ट घेणे इ यावरून खूप दमायला होते. पुढे जाऊन कधी त्यांना आपल्या जेवणाची किंमत राहील का असे वाटतेही. त्यात कधी कधी हे असे क्षण मात्र एक नवीन आशा नक्कीच देतात, पुढेही योग्य ते करत राहण्याची. Happy त्यांना योग्य-अयोग्य शिकवण्यासाठी कितीही ट्रिक्स वापराव्या लागल्या तरी चालेल हे अशी ट्रीट मिळणार असेल तर. होय ना?

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
14947551_1300447543362551_5541917821666903145_n.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !
रच्याकने, जपानी बेन्तो स्टाईल डब्बा देउन पाहा....असे चालू केल्यापासून माझी मुलं ९०% वेळेस डब्बा सम्पवून आणत आहेत..

विद्या.. मस्तंच मिळाली कि तुला ट्रीट.. सो स्वीट!!!

रच्याकने तुझ्या मुलांची नावं खूप सुंदर आहेत Happy

टिनिमिनि.. hoka hoka bento नावाने सर्च कर.. हे जॅपनीज फूड चे सेट मेन्यु आहे..सर्व्ड इन अ खणाचा ट्रे.. Teriyaki,Yakiniku,Karaage,Katsu..इ.इ.इ.
प्रकार मिळतात

रिलॅक्स! चॉकोलेट्स आणि कॅन्डीज खाण्याचा जो आनंद या वयात मिळतो तो कुठल्याच वयात मिळत नाही. खाल्ल्या चार-दोन कॅन्डीज तर आकाश कोसळत नाही. वजन वाढण्याच्या भितीनं, इतर कुठले विकार व्हायच्या भितीनं स्वतःहून डायेट रिस्ट्रिक्ट करण्याच्या वयाला ती पोचतीलच योग्य वेळी. तोपर्यंत तुम्ही सुपरमॉम सिन्ड्रोमला थोडा आवर घाला.

सर प्राइज पाहुणे -> इथे कुठ्ल्याही दुकानात मुलाना आवडेल अशा गोश्टी समोरच ठेवलेल्या असतात. बाकी येणारे पाहूणे देतील ते चॉकलेट्स असतात, वाढदिवस, फास्ट फूड होटेलमधे अनेक ठीकाणी हे सर्व मिळते. मुलाना डायट करायला सान्गत नाहीये. फक्त मी जे लहान असताना नियमित जेवले ते त्यानी खाव ही माफक अपेक्शा आहे. बाकी सुपरमॉम सिन्ड्रोम बद्द्ल काहीतरी करावे लागेल. Happy सर्व मिळत नाही आणि करु शकत नाही हे कळत आहे , वळायला वेळ लागेल.

विद्या.

जपानी बेन्तो स्टाईल डब्बा >> म्हणजे नेमका कसा? >> टीना, खुप सारे कप्पे असलेला टिफिन आणायचा आणि त्यात किमान ३/४ वेगवेगळ्या प्रकारचे खाउ द्यायचे....जसं की, २ खजूर, १ दोसा, चट्णी, १ कुकी,
किंवा, १ / अर्धी पोळी, भाजी, १ लाडू, १ सुकं अन्जीर
२ इड्लया, चटणी, फळांच्या फोडी, फराळाचा एखादा पदार्थ (शंकर्पाळी)
मी अस देते आणि माझ्या दोन्ही (वय ११, ५) मुलान्ना ते आवडत, पोट ही भरतं, तब्बेतीलाही मानवतय...

मी स्वतः साठी पोळी भाजी न्यायची ऑफिस मध्ये तेंव्हा मलाही बोर होत होतं एक ते एक खायला...त्यावर मुलांसाठी हा उपाय शोधला...

टीना, खुप सारे कप्पे असलेला टिफिन आणायचा आणि त्यात किमान ३/४ वेगवेगळ्या प्रकारचे खाउ द्यायचे....जसं की, २ खजूर, १ दोसा, चट्णी, १ कुकी,
किंवा, १ / अर्धी पोळी, भाजी, १ लाडू, १ सुकं अन्जीर
२ इड्लया, चटणी, फळांच्या फोडी, फराळाचा एखादा पदार्थ (शंकर्पाळी)
मी अस देते आणि माझ्या दोन्ही (वय ११, ५) मुलान्ना ते आवडत, पोट ही भरतं, तब्बेतीलाही मानवतय...

मी स्वतः साठी पोळी भाजी न्यायची ऑफिस मध्ये तेंव्हा मलाही बोर होत होतं एक ते एक खायला...त्यावर मुलांसाठी हा उपाय शोधला...>>
मी ही हेच करते. एक फळ, एक भाजी (काकडी, टोमाटो, ब्रोकोली इ. ), एक स्नाक (फराळ, बिस्कीटे, इ) आणि डोसा,इडली,सान्डविच, पास्ता, इ. मुलीचे सर्व सम्प्ते मुलगा अजून लहान आहे.

मुद्दा हा की त्याना योग्य खाण्याच्या सवयी लागणे मोठे काम आहे, सध्याच्या जगात जिथे बाकी लालुच सहज असते.

वर्षू अन सार्‍याजणी..धन्यवाद..
तस प्रश्न विचारल्या विचारल्या मी गुगलबाबाकडं जाउन विचारपुस केल्यावर समोर आलेल्या प्रचिंना पाहुन तोंपासु झाल..

अजुनही एक प्रश्न रेंगाळतोय पण...
हे वानावानाचं डब्यात दिल्यावर त्यातला आवडीचा पदार्थ खाऊन बाकीचं वापस नाही येत का?

हे वानावानाचं डब्यात दिल्यावर त्यातला आवडीचा पदार्थ खाऊन बाकीचं वापस नाही येत का?>>>> टीना एकदम अचुक विचारलस. मला ही हेच विचारावसं वाटलं. कारण माझ्याकडे हेच होण्याची शक्यता जास्त

२ आवडीच्या पदार्थांबरोबर १ नावडता सहज खाल्ला जातो असं लक्षात आलं आहे Happy त्याच बरोबर, एकुणच खाणं प्रमाणात दिलं गेल्यामुळे कुरकुर करत नाहीत..अर्थात काही वेळेस अन्दाज चुकतात...