कुर्ग - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/60600
कुर्ग सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/60628
पण घरी पोहोचण्या आधी एक दोन जागांबद्दल
आधी काही फोटो कुशल नगरच्या गोल्डन टेंपल मधले
१)
२)
३)
४)
५)
६) तिथली भित्तीचित्रे
७)
८) तिथला परीसर भव्य आणि रम्य आहे
९) तिथलीच फुले
१०)
११)
नंतर आम्ही निसर्गधाम नावाच्या एका पार्क ला भेट दिली. कावेरी नदीत तयार झालेल्या एका बेटावर ही जागा आहे. एका बंदीस्त जागेत तिथे काही हरणे आहेत. पण एकंदर ही जागा मला फार काही आवडली नाही.
१२ )
१३)
१४)
१५)
१६)
१७)
१८)
तिथल्या एका बांबूच्या बनात असे आकार दिसले
१९)
२०)
मग आम्ही मडीकेरी गावात जेवलो. तिथे शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन्ही प्रकारची अनेक हॉटेल्स आहेत.
माफक दरात उत्तम जेवण तिथे मिळते.
मग मात्र कुर्ग चा चार्म रस्त्यातूनही जाणवू लागला
२१)
२२)
आणि त्या परीवार घरात ...
२३)
२४)
२५)
२६) घरासभोवती
२७) घराभोवतीची बाग.. अशा विविध फुलांनी सजलेली होती
२८)
२९)
३०)
३१)
३२)
३३) तेरड्याचे अनेक प्रकार मी बघितले तिथे मी
३४)
रात्री जेवणात काय हवे असे रोहिणीने विचारले. मी अक्की रोटी हवीय असे सांगितले ( हि रोटी शिजलेल्या भातात तांदळाचे पिठ मिसळून करतात. ) मी सांगितलेल्या वेळेवर गरमागरम जेवण त्यांनी आणून दिले. अक्की रोटी, रानतील कारल्यांची भाजी, वांगी ( काचमपुल्ली घालून केलेली ) कुर्गी पद्धतीची डाळ, घरच्या दूधाचे दही, भात, लोणचे असा भरगच्च बेत होता. सर्वच पदार्थ अत्यंत चवदार होते.
काका आल्यावर त्यांनी मला सर्व घर फिरून दाखवले. ते कुठूनतरी सुपभरून स्थानिक मश्रुम्स घेऊन आले होते.
आपल्याकडची समुद्री मेथी जशी दिसते तसे ते दिसत होते. मला उद्याच्या नाश्त्यासाठी ते मिळणार होते.
परत एकदा कॉफीचा आग्रह झाला. ड्रिंक्स घेणार का, असे पण विचारले. मी अंगणात शतपावली करु लागलो.
जंगलातून जेवढे दिसत होते तेवढे आभाळ चांदण्यांनी गच्च भरलेले होते.
झोपण्यापुर्वी रोहिणी मला येऊन सांगून गेली की, अगदी शांत झोप, खाली आम्ही आहोत, अजिबात काळजी नको !
क्रमश :
कसली मस्त झाडी आहे , मस्त
कसली मस्त झाडी आहे , मस्त फोटोज.
मस्त चाललीय मालिका, तुम्ही
मस्त चाललीय मालिका, तुम्ही काढलेले फोटो म्हणजे डोळ्यांना मेजवानी असते , तसेच अतिशय मुद्देसूद लिखाण !!!
मस्तच
मस्तच
किती सुंदर अनुभव.. खूप छान!!!
किती सुंदर अनुभव.. खूप छान!!! कूर्ग ला जावसं वाटू लागलंय आता..
किती सुंदर फुल आहेत सगळीच.
किती सुंदर फुल आहेत सगळीच.
मला फोटो दिसत नाहि आहेत
मला फोटो दिसत नाहि आहेत
दिनेश, मस्तच आहे ते घर. २९
दिनेश, मस्तच आहे ते घर.
२९ मधली फूलं आइस्क्रिम क्रीपरची जांभळी व्हरायटी आहे का?
गोल्डन टेंपल आणि सभोवतालचा
गोल्डन टेंपल आणि सभोवतालचा परिसर सुरेखच!!!!
तोरडा आणि केशरी कृष्ण कमळ खुप सुरेख..., जांभळी हार्ट शेपची फुले प्र.ची. २९ खुप गोड आहेत..
आभार सर्वांचे, माधव, सायु ---
आभार सर्वांचे,
माधव, सायु --- ती आईसक्रीम क्रीपर नाही, वेगळीच वेल आहे. फुले साधारण वांग्याच्या फुलासारखी आहेत.
वर्षू, नक्की जा !
वाह!!
वाह!!
घराचे फोटो सुरेख
घराचे फोटो सुरेख आहेत.
दापोलीत जालगावात तवसाळकर कुटुंबाचं घर अगदी असंच आहे. त्यांच्याकडे पण होम स्टेची सोय होते. आता बरीच वर्षं झाली जाऊन, पण आधी नियमीत जाणं होत होतं.
सुंदर अनुभव. सर्वच फोटो छान.
सुंदर अनुभव. सर्वच फोटो छान.