कुर्ग सहल - भाग १

Submitted by दिनेश. on 24 October, 2016 - 02:39

कुर्ग ला जायचे नक्की झाल्यावर मी कुर्ग च्या सहलीबद्दल शोधाशोध सुरु केली.
http://www.coorg.com/coorg-tour-package-2-nights-3-days/ वर बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तोपर्यंत मी
होम स्टे बद्दल निर्णय घेतला नव्हता. पण या साईटवर तसे बरेच पर्याय दिसत होते.
आधी मी हॉटेल्स बघत होतो. वेकंटेश्वरा हॉटेल्स बद्दल लोकांनी फार चांगले लिहिले नव्हते.
http://www.coorg.com/the-coorg-hideout-swiss-tent-package-tour/ मग मी हा तंबूत रहायचा पर्याय निवडला. तोपर्यंत त्याचे काही रिव्यूज नव्हते. क्रेडीट कार्डाने पैसेही भरले ( आधी मला हव्या असलेल्या तारखांना
ते उपलब्ध आहे का तेही बघितले.) थोड्याच वेळात टॅक्सी ऑपरेटर चा फोन आला आणि कुठे पिक अप हवाय ते विचारले त्यांनी. मग स्विस टेंट चालवण्यार्‍या बाईंचा पण फोन आला. व माझ्या काही रिक्वेस्ट्स आहेत का त्याची
चौकशी केली. सगळे कन्फर्म झाल्यावर मी विमानाची तिकिटे काढली.

पण दोन दिवसांनी परत त्या बाईंची ईमेल आली कि पावसाने टेंट च्या आजूबाजूचा भाग चिखलाने खराब झालाय
आणि मला तिथे राहता येणार नाही. माझे पुर्ण पैसे परत करायची त्यांची तयारी होती किंवा पर्याय म्हणून
दुसर्‍या ठिकाणी माझी सोय ते करणार होते. तेही कुठलाही जादा चार्ज न लावता.
त्यांनी दिलेला पर्याय हा होता. http://www.coorg.com/2-nights-3-days-wstay-parivar-homestay/

मी तो पर्याय स्वीकारल्यावर लगेच परत त्यांची मेल आली, टॅक्सी ऑपरेटर राजेंद्रचा फोन आला आणि परिवार मधूनही रोहिणीचा फोन आला.

त्यादिवशीचा माझा कार्यक्रम भरगच्च होता. मी रात्री मुंबईहून निघून टॅक्सीने पुण्याला गेलो. तिथून मी सवारी डॉट कॉम वरून टॅक्सी बूक केली होती. तिने ब्राम्हणी ( राहुरी ) ला गेलो. तिथे मित्राच्या घरी कांद्यापोह्याचा कार्यक्रम होता.
११ वाजता तिथून निघून ३ वाजता बावधनला पोहोचलो, तिथे भाचीच्या घरी तिच्या लेकीसोबत धुडगूस घातला आणि मग सात वाजता मायबोलीकर शांकली च्या घरी गेलो, तिथे सुग्रास जेवण करून रात्री नऊ वाजता सईच्या घरी
गेलो तिच्या घरी दक्षिणा पण भेटली परत जेवणाचा आग्रह. असे करत एकाच दिवसात ४ सुगरणींच्या हातचे जेवलो.

तिथून रात्री अकरा वाजता निघून पूण्याच्या विमानतळावर पोहोचलो. या एअरपोर्टचे रिव्यूज पण काही चांगले नाहीत.
पण त्या मानाने मला तिथे बरी परिस्थिती दिसली. चेक ईन नंतर वरच्या मजल्यावर जाता येते आणि तिथे काही
चांगले स्टॉल्स आहेत.

पण बोर्डींग ची व्यवस्था मात्र ढीसाळ आहे. एकतर एअरोब्रिज पुरेसे नाहीत. बहुतेक प्रवाश्यांना चालत विमानापर्यंत
जावे लागते आणि तिथे मार्गदर्शन करायला पुरेसे सेवक नाहीत. काही प्रवासी भरकटतात. माझे पुणे बँगलोर
विमान जेट कनेक्ट चे होते. माझ्याकडे फक्त केबिन लगेज होते त्यामूळे चेक ईन मीच किऑस्क वर केले. विमान
वेळेवर सुटले आणि मी बँगलोर ला पोहोचलो.

तिथे राजेंद्र गाडी घेऊन हजर होता. माझा ब्रेकफास्ट विमानातच झाल्याने वेळ न दवडता आम्ही कुर्ग च्या रस्त्याला
लागलो. शहरातून बाहेर पडण्यात बराच वेळ गेला. पण एकदा मँगलोर हायवे ला लागल्यावर मात्र अगदी उत्तम
वेग पकडता आला. तो रस्ता उत्तम राखलाय.

पण जसजसे उन चढू लागले तसा त्रासही होऊ लागला. गाडीची दिशा अशी होती कि माझ्या अंगावर थेट ऊन
येत होते. तिथे बर्‍याच दिवसात पाऊस न झाल्याने तपमानही जास्त होते. राजेंद्रला काही खायचे होते म्हणून
आम्ही थोडा वेळ मधे थांबलो. तिथल्या एका छोट्या दुकानात मला मस्त चहा मिळाला आणि तिथे भाषेची
अडचण येणार नाही, हे पण समजले. वाटेत एक शंकराचे देऊळही लागले.

एकदा कुर्ग मधे शिरलो कि उन्हाचा त्रास होणार नाही, असे मला राजेंद्र सांगत होता आणि त्याचा प्रत्ययही लगेच आला. कुर्ग मधे शिरताना एक तिबेटीयन मॉनेस्ट्री लागते ( तिथे त्याला गोल्डन टेंपल म्हणतात ) तिथे मोठी बुद्ध प्रतिमा आहे. तो परीसरही छान आहे.

कुर्ग मधे शिरताना मडीकेरी हे गाव लागते. त्याचा पसारा फार नाही आणि तिथे फार मोठ्या इमारतीही नाहीत. पण
बरीच दुकाने आहेत. ते गाव सोडल्यावर मात्र आपण खर्‍याखुर्‍या कुर्ग मधे शिरतो. वळणावळणाचे रस्ते, दुतर्फा जंगल, त्यातच कॉफीच्या बागा. आणि क्वचित कुठे दिसणारे घर.

असे करत करत आम्ही एकदाचे मुक्कामी पोहोचलो. लगेच रोहिणी आणि तिची दोन मूले स्वागताला आली.
आणि मला एकदम आपल्या घरी आल्यासारखे वाटले. ते घर तर मला खुप आवडलेच आणि ती माणसेही.
मस्त वाफाळता कॉफीचा मग समोर आला, आणि ती सुगंधी कॉफी पिऊन माझा शीण कुठल्या कुठे पळाला.
घराभोवती सुंदर बाग होती शिवाय कॉफीचा मळाही. मी आराम करायच्या फंदात न पडता तिथेच फोटो काढत
राहिलो.

ते सगळे विस्ताराने येईलच पुढे

१) हा रस्ता

DSCN2476

२)

DSCN2477

३)

DSCN2478

४) नारळाची शेती

DSCN2479

५) या सुंदर रस्त्यामूळे सहा तासाचा प्रवास कंटाळवाणा झाला नाही

DSCN2480

६) वाटेत लागलेले शंकराचे देऊळ

DSCN2481

७) कुर्ग ची सुरवात

DSCN2482

८)

DSCN2483

९)

DSCN2484

१०)

DSCN2485

११) गोल्डन टेंपल चे प्रवेशद्वार

DSCN2487

१२ ) तिथले वसतीगृह

DSCN2488

१३)

DSCN2491

१४ ) तिथली फुले

DSCN2489

१५)

DSCN2490

१६)

DSCN2493

१७)

DSCN2494

१८)

DSCN2495

१९)

DSCN2497

२०) गोल्डन टेंपल

DSCN2498

२१)

DSCN2499

२२) हा परीवार होम स्टे

DSCN2548

२३) ही तिथली काही फुले ( अजून बरीच मग येणार आहेत )

DSCN2546

२४)

DSCN2545

२५)

DSCN2544

२६)

DSCN2543

२७)

DSCN2542

क्रमश :

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा.. किती सुंदर, शांत, हिरवागार परिसर.. त्या घराचे फोटो पाहायची उत्सुकता लागून राहिलीये

तो हायवे इतका देखणा दिसतोय की तेथपासूनच कूर्गच्या प्रेमात पडायला होइल. इतका प्रशस्त चौपदरी रस्ता आणि भोवती डोळे निववणारी हिरवळ असे कॉम्बो भारतात फार कमी आढळते.

कूर्ग मधला रस्ता पण चांगला दिसतोय. तिथे जीपीएसने आपले गंतव्य सापडू शकेल ना ?

मस्त माहिती मिळतेय. फोटो सुंदर आहेतच Happy

रच्याकने जगात जसे स्पोर्ट्स बार, डिस्को बार वगैरे असतात तसे तुम्ही निसर्ग आणि खादंतीची सांगड घालून रेस्टराँ सुरू करा Happy

@ दिनेश., व्वा:!! छान प्रवासवर्णन आहे. फोटोही आवडले. पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!!

अपेक्षा होती तसंच सुंदर. येवूंद्या पुढचं !
[ << त्यादिवशीचा माझा कार्यक्रम भरगच्च होता.>> मागेही तुमच्या दोन दिवसांच्या भारत भेटीचा कार्यक्रम वाचून छाती दडपून गेली होती ! Wink ]

वळणदार रस्ते , निरभ्र आकाश!!! वा
आणि ते शिव मंदिर कीत्ती छान.. जास्वंदाचे रंग आणि ईतरही फुले खुप सुरेख...
आता फक्त प्र.ची बघतेय.. लेख निवांत वाचेन..