माय आर्ट इज डूडलींग (भाग ३)

Submitted by rar on 19 October, 2016 - 12:19

जितकी माझी बाहेर भटकंती चाललेली असते, त्याही पेक्षा जास्त मी मनात, अंतरंगात, विचारात भटकत असते असं माझं मलाच खूपदा जाणवतं. आजूबाजूला गोष्टी घडत असतात, त्यावर डोक्यात विचार चालू असतो. काही सांगायचं असतं. एक्प्रेस व्हायचं असतं. ती गरज असते, ओढ असते. सतत कसलातरी शोध चालू असतो, बाहेर पण त्याहीपेक्षा माझ्या आतच. काय शोधते माहित नाही. पण हल्ली असं वाटतं जे शोधतीये ते ह्या रेषांमधेच आहे कुठतरी. कोणतातरी फॉर्म व्यक्त होण्याचा.
कधी क्वचित तसा तो सापडतो पण बहुतेक वेळा हुलकावणी देऊन नाहीसा होतो. मग मनात, डोक्यात मागे उरतात नुसते विचार. कधी कधी या आळसावून सुस्तावलेल्या विचारांना जागं करण्याची किंवा कधी सुसाट धावणार्‍या विचारांना लगाम लावण्याची वेळ आली की मी आपसुकच 'डूडल्स' कडे वळते. Untangling through zentangle !
स्वतःला मनानं आणि शरीरानही पूर्णतः या रेषांच्या स्वाधीन करते.
अनुभवते त्यांना भावणारे आकार, टेक्चर्स, त्यांचा भवताल, त्यांचा आसमंत.
चालते त्यांच्या वाटा, पाहते त्यांची स्वप्न, आणि पोचतेही ह्या रेषा नेतील तिथेच.

-------------------------
डूडलींग सीरीज :
माय आर्ट इज डूडलींग (भाग १) - http://www.maayboli.com/node/56424

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती पिवळी वर्तुळं आवडली वेगवेगळी असली तरी त्यात एक प्रकारची साखळी आहे ते मस्त वाटतं !

अजून येऊ देत. अशी छोटी छोटी डुडल्स काढताना त्याचा एक मोठा कॅन्वास नाही करता येत का ? माझी एक शंका Wink

१, ५ , ६, आणि ८ सगळ्यात जास्त आवडली. अर्थात बाकीची डूडल्स पण छानच आहेत.
हे पॅटर्न काढताना कश्या प्रकारच्या रेषा काढायच्या यासाठी सुरूवातीला कुठलं पुस्तक वगैरे रेफर केलं होतंस का? का जसं वाटेल तसं काढत जातेस तू?

मस्त. पिवळी वर्तुळं मला पण आवडली. त्यात शेवटाकडची डाव्या आणि उजव्या बाजूची वर्तुळं जरा तुटक वाटली. ती पण एकमेकांत गुंतातील असं वाटत होतं.
पाहिलं पण आवडलं.
परवाच एक अशाच आकृत्या काढलेलं पुस्तक बघितलं, ते पुस्तक विकत घेऊन अधे मध्ये रंगवण अपेक्षित असावं. एकदम मराठी मोर किंवा कुयऱ्या टाईप काही काढलंयस का? ते पण आवडेल बघायला.

Nice. Black and white jast aawadle. Frame kara.
Mi pan zentangles karat aste. Telephonic meeting madhe tar hamkhas. Barech da te kagad fekun dete. karan mostly vaparlelya kagdachya mag chya bajuwar karte. Kadhi ekhade faar aawadle tar thevte. Photo takaycha muhurt kevha lagel baghu.