पुण्या तील चमत्कारिक जागा भाग 1

Submitted by SanjeevBhide on 8 October, 2016 - 05:43

पुण्यातील चमत्कारिक जागा भाग 1
प्राचीन इतिहास रामायण, महाभारत, पौराणिक कथा आणि अनेक रहस्यमय गोष्टी ची परम्परा भारतात पूर्वी पासून आहेच. साधू ,महात्मे ,अघोरी, तांत्रिक, भुत ,खेत गुप्त धन ई0 संबधित असंख्य कथा घटना लोकांची झालेली फसवणूक ई0 ची , आपल्या देशात रेलचेल आहे.
मात्र परदेशतील हॉरर चित्रपटा प्रमाणे आपले चित्रपट बुरी आत्म्या च्या पलीकडे फरसे गेलेले दिसत नाहीत.
हवेली किल्ला बंगला नागिण ई0 भोवती आपले चित्रपट रेंगाळ त राहतात.
नुकताच प्रदर्शित झालेला The Counjuring 2 भाग या हॉरर चित्रपटाने जवळजवळ 300 मिलियन डॉलर चा गल्ला जमावला हे वाचून नवल वाटते.
The Ring ही हॉरर सीक्वल चा आता 3 रा भाग येईल. जो हा चित्रपट बघतो त्याला कही तरी चमत्कारिक अनुभव आले ई0 गोष्टी वाचायला मिळतात.
ज्याना अश्या रहस्यमय जगताची आवड़ आहे त्यांच्या साठी ही लेखन मालिका
ज्याना अश्या हॉन्टेड किंवा बाधिक जागना भेट द्यायला आवडत असेल त्यांनी हा लेख जरूर वाचवा
(१) पुण्यातील शनिवार वाड़ा
अतिशय आखिव रेखीव बांधकाम व् पेशव्यांचे वैभवाची साक्ष देत असलेला हा किल्यात आज ही चमत्कारिक गोष्टी न चे अनुभव घेतलेले लोक आहेत.
30 ओ गस्ट १७३३ अनंत चतुर्दशी च्या दिवशी सुमेर सिंग गार्दया ने नारायण रावा चा खून केला
दर पौर्णिमेस "काका मला वाचवा अशी नारायणराव पेशव्यांची आर्त हाक" , आज ही एकु येते असे अनुभव आहेत, पण या वर संशोधन व्हायला हव. १७ फे0 १८२८ शनिवार वाड्या स लागलेल्या आगीत होरप ळू न मेलेल्या लोकांच्या आर्त किंकाळ्या आज ज ही रात्रि बेरात्रि एकु येतात असे काही लोकांचे सांगणे आहे
(2) होळकर पूल पुणे
18 व्या शतकात माधवराव पेशव्यानी हा पूल बांधला
पुला खाली ख्रीशन लोकांची स्मशान भूमि आहे व् आजही तिथे दफन होते. इथे कायम वातावरणात उदासीन ता भरलेली असते सहसा रात्रि या पुला वरुन कोणी जात नाही
जर तुम्हाला नाईट ड्राइविंग चा शोक असेल तर होळकर पुला वरुन रात्रि 12 च्या पुढे जरूर ड्राइविंग करा ह्या पुलावर आज पर्यन्त अनेक चमत्कारिक अपघात व् मृत्यु झाले त्याचा तपास करून हाती काही लागले नाही अगदी अलीकडे येथे नदीच्या पात्रता डोक हाताचे पंजे कापून टाकलेल धड़ सापडले होते
माझा स्वतः चा अनुभव म्हणजे मी संध्याकाळी मुद्दाम या पुला वर कैमरा घेऊन गेलो होतो पुलच्या माधोमध आल्या वर मला भीति वाटायला लागली मनात चमत्कारिक विचार यायला लागले वाटा यच या पुला वरून खाली उडी मारावी. शेवटी कसा तरी पुला वरून मागे परत आलो .
(3)विक्टोरिया थिएटर थिमैया रोड रे बॅन स्टोर
जव ळ
हे एक छान थिएटर असले व् दिवस भर कल्चरल एक्टिविटीज चालु असल्या तरी कधी भीति वाटत नाही रात्रि 12 न0 मात्र हस ण्या चे आवाज गोंगा ट बऱ्याच जणा नी ऐकला आहे आजु बाजू च्या लोकांनी ही त्याला दुजोरा दिला. लोकांनी कुणी तरी टवाळ पो र रि कामे उद्दोग करीत असावेत म्हणून शोधून बघितले पण तसे काही आढळ ल नाही ।
मी विक्टोरिया थिएटर मधे अनेक शोज पण दिवसा बघितले आहेत पण काही च जाणवत नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> 30 ओ गस्ट १७३३ अनंत चतुर्दशी च्या दिवशी सुमेर सिंग गार्दया ने नारायण रावा चा खून केला <<<
१७३३???? या सनामध्ये गडबड वाटत्ये. तपासाल का प्लिज?

>> जर तुम्हाला नाईट ड्राइविंग चा शोक असेल तर होळकर पुला वरुन रात्रि 12 च्या पुढे जरूर ड्राइविंग करा ह्या पुलावर आज पर्यन्त अनेक चमत्कारिक अपघात व् मृत्यु झाले

????? Uhoh Uhoh Uhoh

>> विक्टोरिया थिएटर थिमैया रोड रे बॅन स्टोर जव ळ

पुण्यात विक्टोरिया थिएटर नाही थिमैया रोड पण नाही. कॅम्प मध्ये इस्ट स्ट्रीट वर ई-स्क्वेअर व्हिक्टरी थिएटर आहे तेच का?

होळकर पुलाबद्दल या निव्वळ फेकाफेकीच्या गप्पा आहेत. जर तुम्हाला तिथे काही चमत्कारिक जाणवलं असेल तर तो तुमच्या मनाचा खेळ आहे...

वरदा,
व्हाय ओन्ली होळकर पूल? बाकीच्या ठिकाणी फेकाफेकी किंवा मनाचे खेळ नाही, असं आपलं म्हणणं आहे का? कृपया स्पष्ट करावे. धन्यवाद. कृपया.

अतुल पाटील, जनरल थिमय्या रोड असे त्या रस्त्याचे नाव आहे. पुण्यातच कॅम्प मध्ये ईस्ट स्ट्रीट जवळ आहे आणि ते थिएटर व्हिक्टोरिया नाही व्हिक्टरी आहे.
बाकी लेख म्हणजे फेकफेकीच आहे. प्रत्येक गावात काही जागांबद्दल अश्या दंतकथा असतातच, वाचून कुणाला मजा येत असेल तर येवो बापडी :p

मॅगी,
हो असल्या सगळ्या गोष्टी म्हणजे फेकाफेकीच असते हे तर झालेच. पण ठिकाणे तरी नीट द्यायला हवीत ना. हि सगळी यादी नेटवर अनेक फोरम्स वर आहे. पत्ते पण हेच आहेत. जनरल थिमय्या रोडवर विक्टोरिया थीएटर फक्त पुण्यातील बाधित जागांच्या फोरम्स मधूनच दिसते (प्रत्यक्षात अस्तित्वात आहे ते इस्ट स्ट्रीट वर ई-स्क्वेअर व्हिक्टरी थिएटर).

म्हणे होळकर पुलावरून जरूर जा, आणि लगेच पुढचेच वाक्य "तिथे अनेक चमत्कारिक अपघात व् मृत्यु झालेत" Proud

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया न बद्दल आभार
(1) ते विक्टरी थिएटर आहे लिहितना विक्टोरिया लिहिले गेले , (कैंप) मधील Esquare Victory
(2)होळकर पुला खाली क्रिचन समेट्री आहे इंग्रजांनी खड़की ची लढाई जिंकल्यावर तो पुढे खड़की cantonment चा भाग झाला कदाचित cemetry मुळे तिथे उदास व् भीतिदायक वातावरण असाव
(3)foreign countries मधे पैरानॉर्मल इंस्टिट्यूट एसतात व् त्यांचे अश्या विषयावर आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकर्णे घेऊन संशोधन होत असते
paranormal activity sensors 20 Hz freq जी आपल्या ऐकन्याच्या रेंज च्या पलीकडे असते रिकॉर्ड करु शकतात ऎसे संशोधन व्हायला हव
दुर्दैवाने आपल्या इथे अश्या सोई नाहीत
(4)मृत्यु अपघात कुठे ना कुठे होत असतात च पण ह्याचा अर्थ अपघाताचे ठिकाणी काही तरी गूढ़ गोष्टी असतील च ऎसे म्हणण चुकीचे आहे
असो आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया न बद्दल धन्यवाद

>> पण संशोधन केल्याशिवाय या गोष्टी खोट्या आहेत हे ठामपणे कसे म्हणू शकता?

Heart never listens brain. या गोष्टी मन आणि भावनेचे खेळ आहेत. त्या होत्या, आहेत व राहतील. संशोधन केले तरी.

जर प्रश्न भूताखेतांचाच असेल तर पुण्यापेक्षा आमचे कोकण यात भारी आहे. त्यामुळे पुण्यातल्या अश्या दोनचार जागांचे कौतुक आम्हाला सांगू नका Happy

तरी तुम्हाला शौक असेल अनुभव घ्यायचा तर कोकणात जरूर या, कोकण आपलाच आहे !

तुम्ही देव मानता का? ती संकल्पना भावनेचे खेळ नाहीत का?
>>>>

देव वगैरे संकल्पनाच आहे. असे काही नसते. देव असण्याला काही लॉजिक नाही. कोणीतरी शक्ती वा व्यक्ती आपली मदत करते, आपले भविष्य घडवते, आपल्या पापपुण्याचा हिशोब ठेवते, आपल्या मनातील ओळखते, तिला अमुकतमुक करून बोले तो पूजा अर्चा वगैरे करून खुश करता येते यामागे काहीही पटण्यासारखे नाही. ना कुठल्याही ठोस प्रकारे हे पटवता येते. फार तर पुराणकाळात ज्यांनी पराक्रम गाजवले त्यांच्या कथा देव म्हणून पुढे नेल्या ईतकेच.

मात्र भूत असू शकते. (माझ्यामते असतेच) भूत या संकल्पनेला लॉजिक आहे. भूत म्हणजे आत्मा! मग तो त्रास देणारा असू शकतो. नव्हे बरेचदा असतोच. शेवटी माणसाचाच आत्मा तो..

चिनूक्स Proud
होळकर पुलावरून अनेक वर्षे वेगवेगळ्या वेळांना गेलेय, जवळजवळ मध्यरात्रीसुद्धा. तिथे, मुळारोडच्या ख्रिश्चन दफनभूमीत कधीही काहीही 'वेगळं' वाटलेलं नाही. अतिशय रमणीय निवांत रस्ता आहे. इतकी वर्षं फारसा सुरक्षित नव्हता कारण वर्द्ळ फारशी नसे. त्यामुळे ही सगळी फेकाफेक आहे असे ठामपणे म्हणू शकते. इतर जागांचा अनुभव घ्यायची संधी आली नाहीये (विक्टरीला असंख्य वेळा सिनेमे बघूनही) म्हणून इतर जागांविषयी लिहिले नाही पण त्याही नुसत्याच आवया आहेत हे मला माहित आहे... Wink

शनिपाराच्या झाडावर अमावास्येला एक पिशाच्च बसलेले असते. ते अतिशय शांत स्वभावाचे पिशाच्च आहे. लोकं तरीही त्याला घाबरतात ह्याचे कारण थोडे वेगळे आहे. झाडावर बसलेल्या ह्या पिशाच्चाचे दोन्ही पाय मात्र जमीनीपर्यंत खाली आलेले असतात.

'येथे प्रतिसाद कसे द्यावेत' ह्याचे तंत्र मी तेथेच शिकलो हेही सहज आठवले

मायबोलीवरील "चमत्कारीक जागा असलेले" गृप/धागे कुणी सांगु शकेल काय?
नै म्हणजे गचकलेल्या मूळ आयड्यांचे आत्मे ड्युप्लिकेट आयडीने फिरतात अशा जागा सांगा....
अन त्या गचकलेल्या आयड्यांच्या आत्मारुपी/पिशाच्चरुपी आयडीमुळे कुणाकुणाला काय काय त्रास होतो, ते ही सांगा...
अन त्या त्रासावर लिंबुमिरची आदी उपाय काय ते पण येऊद्यात... Proud

खरं म्हणजे प्रत्येक मंदिर हि सुद्धा चमत्कारिक जागा म्हणावी लागेल. कारण भूत आणि देव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

एका ठिकाणी कारण नसताना जाऊन लोक गर्दी करतात आणि दुसऱ्या ठिकाणी जायला मात्र कारण नसताना घाबरतात.

पण दोन्हीकडे प्रकार मात्र तोच.

"शनिपाराच्या झाडावर अमावास्येला एक पिशाच्च बसलेले असते."
मी ही य झाडाबद्दल ऐकलय..... "झाडावर बसलेल्या ह्या पिशाच्चाचे दोन्ही पाय मात्र जमीनीपर्यंत खाली आलेले असतात. "

>>>>या गोष्टी मन आणि भावनेचे खेळ आहेत.
>>तुम्ही देव मानता का? ती संकल्पना भावनेचे खेळ नाहीत का?

नाही. आहेत.

मला तर असल्या विषयावर वाचायला नेहमीच आवडतं. या गोष्टी खोट्या असल्या तरी सुसंगत सांगितल्या गेल्या तर मजा येते. संशोधना अंती त्यातली मजा निघून जाईल असे वाटते. कारण वास्तव कोरडे असते. असो.विषय चांगला आहे. लिहा.

Pages