अमरप्रेम

Submitted by Poetic_ashish on 22 September, 2016 - 10:29

ती होती एक सुंदर जोडी, कधी करायची लाडीगोडी,
कुसूमांप्रमाणे त्यांच्यातही होती,निरासगता थोडीथोडी,
मनात त्यांच्या वसंत नांदत होता बाराही महीने,
मनात घायाळ झालं नव्हतं शंकाद्वेषाच्या सुईने,

प्रेम होते तयांचे वासनारहीत, अमर,
काया धवल होती जसा दुधाचा सागर,
लाखात एक असा, प्रणय होता लोभस,
पक्षीपक्षीण राजस, प्रेमी होते गोंडस,

पण हाय रे दैवा, पारधी , वैर्‍याने त्या साधला डाव,
न देता थोडाही अवधी, वर्मावरच घातला घाव,
आज हंसांची जोडी, वियोगात डुंबली,
जशी ताज्या जखमेला मिरची झोंबली,

पक्षिणीची शिकार झाली, त्या दोघांची कहाणीच संपली,
भयानक वास्तवाची भिषणता, आता त्याची सखी झाली,
काळच सोकावला, दुनियाच दुरावली,
आज हंसिणीची त्याच्या सावलीच विलग झाली,

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान..