कम्माल गाण्यांचे धम्माल रसग्रहण

Submitted by मानव पृथ्वीकर on 3 September, 2016 - 05:53

इथे आपणास भावलेल्या कम्माल गाण्यांचे धम्माल रसग्रहण करावे.

उदाहरणार्थ:

रसग्रहण: पप्पी दे पारुला -

अहाहा! गाणं असावं तर असं!
काय तो मंजुळ आवाज! मंत्रमुग्ध करणारं सुंदर संगीत!
आणि काव्या बद्दल तर काय बोलावे!
इतक्या सुटसुटीत सोप्या शब्दात इतके अफलातून गीत लिहिण्याच्या प्रतिभेचे कौतुक करण्यास शब्दच सापडत नाहीत.

सुरवातीला 'ए देना रे! आता तरी देना रे!'
असे शब्द कानावर पडल्या पडल्याच श्रोत्यांचं प्रचंड कुतुहल जागृत होतं आणि सहाजिकच कान टवकारले जातात.
आणि सुरु होतं दणकेदार मंजुळ संगीत आणि त्या संगीतातच सहज पणे विरघुळन जाणारे शब्द
'पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे.........'
आणि या मंजुळ शब्दनादाने श्रोते डुलायलाच लागतात. असं वाटतं हे असंच सुरु रहावं, कधी संपुच नये.
आणि हेच नेमके हेरुन संगीतकार हेच दोन शब्द लांबत ठेवुन श्रोत्यांचे मन सहज जिंकतो.

याची धुंदी उतरत नाही तोच, पुढला अप्रतिम शब्द "पारुला" आणि त्याचाच एक इको... 'पारुला!'
वा! वा! श्रोते मनातल्या मनात दाद देतात.
पुढे 'प्रेमवेडीला!' हे ऐकल्यावर मात्र श्रोत्यांच्या हृदयाचा ठोका क्षणभर चुकतो, की आता पुढं काय असावं?
उगाच काही भारदस्त शब्द घुसडले तर नसतील?
पण नाही! हीच गीतकाराची खरी कमाल आहे.
पुढे परत तेच मंत्रमुग्ध करणारे शब्द रिपीट होतात 'या प्रेमवेडीला!'

वा किती सहज! उगाच फालतु मोठे मोठे शब्द नाही, 'या प्रेम वेडीला' बस्स!

पहिल्याच ऐकण्यात श्रोत्यांना शब्द पाठ होतात आणि कोरस सोबत तेही गुणगुणु लागतात ... ' पप्पी दे पप्पी दे.....".
या गीताला आणि संगीताला लोक विसरणेच अशक्य.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मा पृ जी
'पप्पी दे' चे रसग्रहण लेखांत उदाहरणार्थ म्हणून टाका लेख मोठा दिसेल व लोकांना पण कळेल म्हणजे काय ........

'शांताबाई' नावाचे महान कवण आहे पण त्याचे रसग्रहण करण्यासाठी त्या गीताचे बोल नीट कळले पाहिजे हि मोठी पंचाईत आहे. माझ्या लहान मुलीला येते ते गीत मी तिला विचारून बघेन. थँक यु बदल केल्याबद्दल.

अपर्णा. >>

शांताबाई,शांताबाई,शांताबाई
रूपाची खाण, दिसती छान,
लाखात छान, नजरेचा बाण,
तिरकमाण मारीती चकरा तुझा गं नखरा,
इकडून तिकडं मारीती चकरा,
चकरा-नखरा, चकरा-नखरा,चकरा-नखरा

शांताबाई,शांताबाई,शांताबाई

तेरा ये जलवा,
माहीमचा हलवा,
जिवाचा कालवा,
मनाला भूलवा,
मामाला बोलवा,
"कालवा-हलवा, कालवा-हलवा, कालवा-हलवा"

शांताबाई,शांताबाई,शांताबाई

अटक मटक चवळी चटक,
लटक मटक वा-यानं उडती केस झटक,
"लटक-मटक,लटक-मटक,लटक-मटक"

शांताबाई,शांताबाई,शांताबाई

खटापटा हीचा नटापटा,
आहो पटापटा कसा झटापटा,
जीव लटापटा आहो लटापटा,
हीचा नटापटा बघा पटापटा,
"कसा-नटापटा, कसा लटापटा,कसा-नटापटा, कसा लटापटा"

शांताबाई,शांताबाई,शांताबाई

गिरकी घेतीया गरा गरा,
पदर उडतोय भरा भरा,
हिरोनी दिसती जरा जरा,
तरर रारी रराररा,

शांताबाई,शांताबाई,शांताबाई

अटक मटक चवळी चटक,
लटक मटक वा-यानं उडती केस झटक,
"लटक-मटक,लटक-मटक,लटक-मटक"
>>>> बरचसं बड्बडगीतासारखं वाटतंय.

बरचसं बड्बडगीतासारखं वाटतंय.

>> ते त्यांनी (संजय लोंढे) स्वतःच्या मुलीला झोपवण्यासाठी बनवलेलं गीतच आहे सचिनजी.