मायबोली मास्टरशेफ - साक्षी - ब्रेड फिंगर्स

Submitted by साक्षी on 15 September, 2016 - 09:25

साहित्य :
स्लाईस ब्रेड : ५-६
उकडलेले टाटे : मध्यम ४-५
वाफवलेले क्याचे दाणे : १/४ वाटी
वाफवलेले टार : १/४ वाटी
लोणी : ३-४ चमचे
आलं - सूण - मिरची (ठेचून) - १ मोठा चमचा
अर्ध्या लिंबाचा रस
कोथिंबीर : १/२ वाटी
मीठ : चवीनुसार
साखर : चिमुटभर (ऐच्छिक)
रवा / ब्रेड्क्रम्स : (ऐच्छिक) २ चमचे
टोमॅटो सॉस

ingrediants.jpg
कृती :
१) मक्याचे दाणे व मटार थोडे चेचून घ्या. बटाटे किसून किंवा मॅश करून घ्या. त्यात चेचलेले मक्याचे दाणे व मटार घाला. ठेचलेली आलं - लसूण - मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला. मीठ, साखर घाला.
mixing.jpg

२) सगळं नीट एकत्र करून घ्या. स्लाईसला एका बाजूला लोणी लावून त्याचे उभे तुकडे करून घ्या. उगीच कडा काढू बिढू नका. उलट कडा असलेल्या सोप्या जातात. Happy दुसर्‍या बाजूला हे बटाट्याचं मिश्रण लावा. मिश्रण लावलेली बाजू रव्यात / ब्रेड्क्रम्स मधे घोळवा.
processing.jpg

३) तव्यावर लोणी लावलेली बाजू आधी आणि मिश्रणाची बाजू नंतर अशा खमंग भाजून घ्या.
टोमॅटो सॉस किंवा कुठ्ल्याही डीप बरोबर वाढा.
final.jpg

४) तळले तर अजून छान लागेल, पण डाएट बाजूला ठेऊन खावे. बटाटा आणि ब्रेड दोघही तेलपिपासू आहेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत,
धन्यवाद!
आधी लोणी लवून कट केली, मग बटाटा मिश्रण लावले, मग रव्यात घोळवून भाजली. आधी भा़ऊन कट करणे थोडे कठीण जाईल.

~साक्षी