पहिल्यांदाच पाककलेच्या पानावर यायचे म्हणून खरे तर ही धडपड!
गेले ४ दिवस ह्या हैदराबादेत दमदार पाऊस सुरु आहे त्यामुळे ह्यापेक्षा चांगला पदार्थ सुचलाच नसता! काय करणार??
काय काय करावे म य ब ल चे विचारान्ती सर्वपरिचित पारंपारीक पण कुरकुरीत खुसखुशीत अशी रेसिपी डो़क्यात अवतरली आणि पार पाडली केवळ अर्ध्या तासात सुचल्या पासुन बनवे पर्यंत!
काल शेवटच्या क्षणी सुचलेला हा...
आता पटापट साधने सांगतो! सगळी उपलब्ध हाताशीच होती..
१. मक्याचे कणीस १ ( माझ्या पाशी गोड मका होता साधा सुद्धा उत्तम!)
२. बेसन पीठ - जेवढे बसेल तेवढे साधारण १ मोठा चमचा.
३. लसणाच्या पाकळ्या- ७-८
४. मैदा - अर्धा चमचा
५. आल्याचा तुकडा पाव इंच (मी पट्टी ने मोजला नाही)
६. कोथिंबीर
७. एक कांदा मध्यम लांबट चिरून
८ मिरच्या 2-3 (तिखट हवे असेल तर झेपतील तेवढ्या)
९. मीठ चवी नुसार.
१०. धने जीरे पूड
११ कढीलिंब
१२. तेल तळण्यासाठी
कृती:
१. मक्याचे कणीस सोलून दाणे काढा.
२. मिक्सर मध्ये २ फिरक्या मारा. (जरा जाडसरच हवे)
३. कढीपत्ता, कोथिंबीर हिरव्या मिरच्या दळून घ्या.
४. आले लसणाची ची छान पेस्ट बनवा..
५. कांदा चिरुन घ्या.
६. एका भांड्यात दळलेला मका घेऊन त्यात सर्व घटक द्रव्ये छान मिसळून घ्या.
७. तेल तापवत ठेवा.
८. तापलेल्या तेलात आपल्याला हव्या तेवढ्या आकाराचे छान खरपूस तळावे.
९. गरमा गरम प्लेट मध्ये घेऊन तळलेल्या मिरच्या / सॉस चा सोस असल्यास सॉस /कोणतीही चटणी अथवा तसाच देखील फडशा पाडू शकता.
१० जेवताना, नाष्ट्याला, स्वीट डीश सोबत तोंडी लावणे. किंवा जेवणापुर्वी बसणार असाल तर तेंव्हा देखिल ह्याचा आस्वाद लुटु शकता...
११. हे अत्यंत कुरकुरीत झाले होते!
धन्यवाद!
वा ! मस्तच !!!
वा ! मस्तच !!!
वाह! तोंपासु. एकदम खमंग
वाह! तोंपासु.
एकदम खमंग दिसताहेत भजी.
छान प्रकार.
छान प्रकार.
धरुन हाणा या माणसाला.
धरुन हाणा या माणसाला.:फिदी: पकोड्यांची प्लेट एकदम तोंडात टाकावीसी वाटतेय. स्पर्धेसाठी शुभेच्छा.:स्मित:
मका पकोडे अगदीच मस्तवाल
मका पकोडे अगदीच मस्तवाल दिसतायत !
मस्तच.! कल्पक आहेत माबोकर..
मस्तच.!
कल्पक आहेत माबोकर.. खरचं.
मस्तं दिसताय्त पकोडे.
मस्तं दिसताय्त पकोडे.
वाह! तोंपासु.
वाह! तोंपासु.
मस्त आणि कमी त्रासाची.
मस्त आणि कमी त्रासाची.
एक नंबर तोंपासू
एक नंबर तोंपासू
मस्त. ह्यात उकडलेला बटाटा
मस्त. ह्यात उकडलेला बटाटा घालता येइल. मका , बटाटा, लसूण व चीज घालून असे काही करावे इतकेच माझ्या डोक्यात आले होते. सादरीकरण पण मस्त झाले आहे. इसको बक्षिस मिलना चाहिये.
तोंपासु
तोंपासु
मस्तच कृष्णा! येतोच खायला.
मस्तच कृष्णा! येतोच खायला.
मस्तं! आमच्याकडे पण पाऊस
मस्तं!
आमच्याकडे पण पाऊस पडतोय.
नक्की करून बघणार.
सर्वांना खूप खूप धन्यवाद!
सर्वांना खूप खूप धन्यवाद!
धरुन हाणा या माणसाला>> हाणू नको हो खायला केंव्हाही या!
मानव, कधी येताय? भरपूर कणसं आणून ठेवायला!
वा, मस्त.. ही कृती खरच करुन
वा, मस्त.. ही कृती खरच करुन पहाण्यासारखी आहे म्हणून करणार. जमेलच
अहाहा, कसली खमंग भजी! आजच्या
अहाहा, कसली खमंग भजी! आजच्या पावसाळी वातावरणात हा फोटो बघून तोंपासु.
कृष्णा तु खरोखरी ना...
कृष्णा तु खरोखरी ना... :रागः
का छ्ळतोयस?
अगदी तोंपासु भजी झालीत !
अगदी तोंपासु भजी झालीत !
यम्मी!
यम्मी!
मस्त!
मस्त!
तोंपासू एकदम
तोंपासू एकदम
अरे मस्त.. एक नंबर दिसत
अरे मस्त.. एक नंबर दिसत आहेत.. खाल्याशिवाय जाएनाच
खमंग.
खमंग.
सही दिसतायत. शुभेच्छा
सही दिसतायत. शुभेच्छा स्पर्धेसाठी,
छानच!
छानच!
वाह वाह.... बाहेर पाऊस कोसळत
वाह वाह.... बाहेर पाऊस कोसळत असता ही क्रिस्पी रेस्पी वाचली.. नुस्तं तोंपासु झालंय..
मस्तं..
तोंपासु!
तोंपासु!
छान ...
छान ...:)
तोंपासु!
तोंपासु!
Pages